बेलापूर (प्रतिनिधी )- कोरोनाच्या धास्तीमुळे घरातच बसलेल्या गरीब कुटूंबाला आधार देण्याकरीता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असुन त्यांच्या योगदानातुन गरीबांना जिवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले कोरोनाचा फैलाव होवु नये म्हणून प्रत्येक जण घरात बसुन असुन जे लोक मोलमजुरी करुन आपली गुजराण करत होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवु नये म्हणून गावातील हाजी ईस्माईल शेख हाजी शोएब शेख अमीरसाहेब शेख कुरेशी फकीर आतार यांनी वैयक्तिक खर्चातुन किराणा सामान खरेदी करुन त्याचे गरजवंताना मोफत वाटप केले यात शेंगदाणे तेल तुप मीठ बेसन पीठ साबण निरमा
तांदूळ अशा वीस वस्तुचा समावेश होता या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक पत्रकार देविदास देसाई अजय डाकले सुभाष राजुळे चंद्रकांत नाईक शकील कुरेशी अमीरसाहेब आतार फकीर शेख अल्ताफ शेख सुभान शेख मुस्ताक शेख ईम्रान शेख बिलाल शेख सुभाष मोहीते संजय शेलार अमोलीक रफीक शेख ईलीयास शेख अल्लाऊद्दीन शेख रविंद्र करपे शरद देशपांडे पत्रकार गोविंद साळुंके उपस्थित होते
Post a Comment