श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाची दखल घेत नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचार्यांनी शहरात घरोघर जाऊन पाहणी करायला सुरुवात केली आहे . यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांचा शोध घेतला जात आहे . विशेषतः पुणे, मुंबई येथून आलेल्या लोकांची नोंद घेऊन त्यांच्या हातावर शिक्के मारले जात असून त्यांना 14 दिवस घरांमध्येच थांबण्याचा सल्ला दिला जात आहे.
नगरपालिकेच्या सिस्टर सुनिता त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिका दवाखान्यातील नर्सेसची टीम शहराच्या विविध भागात जाऊन घराघरातून ही पाहणी करीत आहे .आज त्यांनी वार्ड नंबर दोन मध्ये घरोघरी भेटी देऊन बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती घेतली.आलेल्या लोकांची नावे व संपर्क क्रमांकाची नोंद घेण्यात आली .याशिवाय घरांमध्ये कोणाला ताप, कोरडा खोकला, सर्दी झाली आहे काय याचीही विचारणा करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या या पथकासोबत पोलीस बंदोबस्त ही देण्यात आला आहे.हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवे व त्यांचे सहकारी याकामी सहकार्य करीत आहेत .सदरची पाहणी आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरात आलेल्या नवीन पाहुण्यांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी . कोरोना पासून सर्व शहरवासीयांचे रक्षण करण्यासाठी ही पाहणी केली जात आहे त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुजफ्फरभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शाह, समीना अंजुम शेख, जायदाबी कुरेशी,तरन्नुम रईस जहागीरदार,कलीम कुरेशी, रज्जाक पठाण,निसारभाई कुरेशी, रईस जहागिरदार,अस्लमभाई सय्यद आदींनी केले आहे .
Post a Comment