राष्ट्रीय आपत्ति साठी संस्थान ने 51 कोटि रुपए देंयाचे जाहिर केल्याने सर्वत्र आनंद.

शिर्डी  श्री साईबाबा संस्थाने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या संकटात सापडलेल्या या राष्ट्रीय आपत्तीत मदत म्हणून ५१ कोटी रुपये  देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे शिर्डीकर व साईभक्तांना मधून स्वागत होत आहे,
     सध्या जगाला, भारत देशालाही कोरोनाच्या संकटामुळे हैराण करून सोडले आहे, दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण झपाट्याने देशात वाढत असून राज्यात ही संख्या सर्वात मोठी आहे, केंद्र सरकारा प्रमाणेच राज्य सरकारही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोठा प्रयत्न करीत असून शासनाने अनेक प्रतिबंधात्मक योजनाही आखून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे,
  देशात कोरोनाच संसर्ग वाढू नये म्हणून देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे देशात, राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद आहे, देशात, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत , त्यामुळे राज्यात सरकारने अनेक धाडसी पावले उचलली आहेत, अशा परिस्थितीत राज्यात आर्थिक संकट निर्माण होत आहे अशा राष्ट्रीय किंवा नैसर्गिक आपत्तीत श्री साईबाबा संस्थान नेहमीच मदतीसाठी पुढे आले आहे ,,सध्या देशात ,राज्यात  कोरोना विषाणूमुळे संकट उभे राहिले आहे, या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाला मदत म्हणून श्री साईबाबा संस्थानने ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे ,शिर्डीला श्री साई भक्त देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात येत असतात व साईबाबा संस्थानला देणगी देत असतात, या देणगीतूनच साई संस्थानने 51 कोटी रुपये कोरोना मुकाबल्यासाठी देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे, तसेच या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी अहोरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रयत्न करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, तसे पोलीस ,अत्यावश्यक सेवा वाहतूक करणारे ट्रक चालक, गरजू अशा विविध लोकांसाठी साईबाबा संस्थान नाश्ता ,भोजन सुद्धा पुरवणार आहे ,असा हा निर्णय साई संस्थान ने घेतल्यामुळे या  निर्णयाचे साईभक्त व शिर्डी करांमधून मोठे कौतुक होत आहे ,
   सध्या शिर्डीच्या श्री साई संस्थान वर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त गीता बनकर, अतिरिक्त विभागीय महसूल आयुक्त दिलीप स्वामी,  व श्री साई संस्थान चे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची एक कमिटी आहे ,या कमिटीने हा निर्णय घेतला असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे उपस्थित होते, श्री साईबाबा संस्थान नेहमी राष्ट्रीय आपत्ती च्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असते ,यावेळी पुढे येऊन साई संस्थानने या कोरोना मुकाबल्यासाठी 51 कोटी रुपये दिल्याबद्दल  श्री साईबाबा संस्थान चे व  संस्थांच्या या कमिटीचे शिर्डीकर व साई भक्तां तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे,
          ।।चौकट।।
    कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान प्रमाणेच श्री तिरुपती देवस्थानं 200 कोटी रुपये ,माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने 7 कोटी रूपये, श्री महावीर हनुमान मंदिर पटना तर्फे एक कोटी रुपये, तसेच देशातील विविध देवस्थानच्या वतीने ही  मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे ,त्याच प्रमाणे अभिनेते अक्षय कुमार यांनी अठरा कोटी ,अजय देवगन यांनी 15 कोटी ,त्याच प्रमाणे उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी 200 कोटी ,आनंद महिंद्रा यांनी तीनशे कोटी, मुकेश अंबानी यांनी 1000 कोटी रुपये मदत म्हणून या राष्ट्रीय आपत्तीत देण्याचे जाहीर केले आहे ,विविध संस्था,नेते, अभिनेते, उद्योगपती हे आर्थिक व इतर वेगवेगळ्या प्रकारांनी मदतीसाठी आता पुढे येत आहे, अशा बिकट समयी अहमदनगर जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, विविध खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी, आपला एक दिवसाचा पगार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत म्हणून देण्याची गरज असल्याचे व प्रत्येक नागरिकांनी आपणास याप्रसंगी काय मदत करता येईल त्याप्रमाणे ती करावी ,गर्दी टाळावी ,असही मत साई भक्त व जिल्हा वासिया मधून व्यक्त होत आहे,
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget