बेलापूर (देविदास देसाई )-हिंगोलीहुन रोजी- रोटीच्या शोधार्थ निघालेल्या तीन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असुन माणुसकीच्या भावनेतुन बेलापूरकरांनी या कुटुंबाना आधार दिला आहे त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या मुक्कामाची व जेवाणाची व्यवस्था करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातुन पोट भरण्यासाठी तीन कुटुंब दर वर्षी प्रमाणे याही वर्षी अहमदनगर येथे आली होती केवळ एकच दिवस शेतकर्याकडे रोंजंदारीवर काम मिळाले त्यांनंतर कोरोनाचे थैमान सुरु झाले अन यांच्या पोटापाण्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला काम असुनही बाहेर जिल्ह्यातील म्हणून शेतकरी काम देईना रोजगाराच्या शोधार्थ मारुती झाडबा ईंगळे पत्नी दिक्षा मारुती ईंगळे , कळनु नारायण झरे पत्नी निर्मला झरे , विलास शालीग्राम कोसेकर त्याची साठ वर्षाची आई शिवकन्या कोसेकर रविंद्र सखाराम चौगुले पत्नी सुनिता तीन लहान मुली एक लहान मुलगा हे दहा जण अहमदनगर ते बेलापूर असा साठ पासष्ठ किलोमीटर पायी चालुन बेलापूरला पोहोचले गावात ही वार्ता समजताच आपत्ती व्यवस्थापन समीतीने त्यांची आस्थेने चौकशी करुन त्यांना नविन मराठी शाळेत राहण्याची व्यवस्था केली बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी देखभाल करण्याची तसेच रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घेतली गौरव सिकची दिपक खंडागळे लक्ष्मीकांत लखोटीया यशवंत नाईक यांनी किराणा सामान आणुन दिले जनसेवा झुणका भाकर केंद्राच्या वतीने सुवालाल लुक्कड अमीत लुक्कड प्रविण लुक्कड यांनी भोजनाची व्यवस्था करुन दिली प्राथमिक आरोग्याधिकारी देविदास चोखर यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली वातावरण ठिक होईपर्यंत याच ठिकाणी रहाण्याचा सल्ला बेलापूर ग्रामस्थांनी दिला असुन ग्रामस्थ या कुटुंबाच्या भोजनाची व्यवस्था करणार आहे बेलापूरचे ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे पोलीस पाटील अशोक प्रधान प्रकाश जाजु किरण भांड महावितरणचे चेतन जाधव आदिनी त्या सर्व कुटुंबाला धीर देवुन सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.
Post a Comment