निवासी संपादक जितेश लोकचंदानी सोलापूर : संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी सोलापुरातील एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरातील औद्योगिक पोलीस चौकीत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सोलापूरतल्या अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने देखील बंद करून घरात बसावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण सोलापूरमध्ये बंद पाळण्यात आला. परंतु विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी संबंधीत पोलीस अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती. ही घटना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यापर्यत पोहोचली. त्यावरून पोलीस आयुक्तांनी त्याबाबत चौकशी केली आणि तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांना नियंत्रण कक्षात बसवल्याची माहिती मिळते आहे

Post a Comment