बेलापूर (प्रतिनिधी )-शासनाच्या सुचने नुसार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातुन तीन महीन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार वाटपात कसुर करणार्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा ईशारा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिला आहे या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी पुढे म्हटले आहे की जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानदारांना एप्रिल मे जुन असे तीन महीन्याचे धान्य वाटप करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत सर्व प्रथम अत्यंत गरजु मोल मजुरी करणारे हातावर पोट भरणारे या सर्वांना पहील्या टप्प्यात प्राधान्याने धान्य द्यावयाचे असुन दुसर्या टप्प्यात गरजु उत्पन्नाचे मर्यादित साधने असणारे कार्डधारक यांना वाटप करावयाचे आहे त्या नंतर राहीलेल्या कार्डधारकांना वाटप करावयाचे असुन कुणीही धान्यापासुन वंचित राहु नये याची काळजी दुकानदाराने घ्यावयाची आहे काम चुकारपणा करणार्या तसेच धान्य वाटपात कसुर करणार्या दुकानदारावर कठोर कारवाई केली जाईल कार्डधारकांनी एकाच वेळेस दुकानावर गर्दी करु नये कुणाच्या वाटपा बाबत तक्रारी असल्यास पुरवठा निरीक्षक तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा असेही अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी केले आहे.
Post a Comment