। प्रतिनिधी ।। सावळीविहीर ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व्हायरसचा व इतर साथींचे रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे,
। सध्या सर्वत्र कोरोना या विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊनआहे, सर्व दुकाने ,कामकाज ठप्प आहे, लोक घरात आहेत, मात्र घरात डासांच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत, त्यामुळे येथील ग्रामपंचायती तर्फे गाव स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे, सावळीविहीर बुद्रुक येथे सध्याचे ढगाळ वातावरण, कधी अवकाळी पाऊस यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन
साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे , डासांमुळे मलेरिया थंडी ताप अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली , साथींचे आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे येथे जंतनाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती सावळीविहीर ग्रामपंचायतने ताबडतोब या मागणीची दखल घेऊन सावळीविहीर गावात जंतनाशक फवारणी सुरू केली, गावातील गल्ली ,रस्त्यावर ट्रॅक्टरच्या साह्याने फवारणी करण्यात येत होती, हि जंतुनाशक फवारणी गावात सर्वत्र व गल्या मध्ये करावी, वाड्या-वस्त्यांवर ही करावी ,असे नागरिक बोलत होते, यावेळी सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच रूपालीआगलावे, उपसरपंच वृषाली जपे, तसेच बाळासाहेब जपे ,संतोष आगलावे, चंद्रकांत जपे, विनोद भोसले, ग्रामसेवक खर्डे सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गागरे,सागर पगारे, पारडे, बाप्पु जपे, गणेश कापसे, अनिल वाघमारे राहुल गोपीनाथ आगलावे व सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी बबन आरणे, नाना पवार,अनिल त्रिभुवन यांनी स्वतः उभे राहून गावात ही फवारणी केली, जंतनाशक फवारणीमुळे येथील साथीच्या रोगाला आळा बसेल, त्यामुळे येथे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी येथील आरोग्य केंद्रानेही नियोजन व उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही मत येथे नागरिक व्यक्त करत आहेत,
Post a Comment