शिर्डीतील सांडपाणी हे सर्रासपणे ड्रेनेज मधून थेट पाइपलाइन करून मोटर पंपाच्या साह्याने शेतीसाठी.

शिर्डी ।।राजकुमार गडकरी ।।शिर्डीतील सांडपाणी हे सर्रासपणे शेतीसाठी वापरले जात असून अनेकजन हे पाणी ड्रेनेज मधून थेट पाइपलाइन करून मोटर पंपाच्या साह्याने आपल्या शेतातील पिकांना देत असल्यामुळे या शेतीच्या आसपास व रस्त्याने जाणाऱ्यां येणारांना मोठ्या दुर्गंधी ला तोंड द्यावे लागत असून आरोग्यास ते धोकादायक ठरत आहे, त्याचप्रमाणे शेतीतील पिकेही या खराब पाण्यामुळे खाण्यास हानिकारक ठरत असल्याने याचा विचार करून तसेच या उघड्या ड्रेनेजमध्ये आत्तापर्यंत चार ते पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतीने हे उघडे ड्रेनेज बंद करावेत तसेच हे सांडपाणी
 उघड्यावर पिकांना देऊन दुर्गंधी करणाऱ्यांना प्रतिबंध करावा अशी मागणी शिर्डी करांनी केली आहे,
          शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून शिर्डीला देशातील स्वच्छ सुंदर शिर्डीचा विशेष पुरस्कारही यापूर्वी मिळालेला आहे ,शिर्डीत श्री साई संस्थान व शिर्डी नगरपंचायत स्वच्छतेबाबत अतिशय जागरूक आहे, असे असतानाही शिर्डीत मात्र जे शहराचे सांडपाणी अंडरग्राउंड नाल्यांमधून शहराबाहेर सोडले जाते मात्र या अंडरग्राउंड नाल्या अनेक ठिकाणी  उघड्या असल्याने आसपासचे शेतकरी पाइपलाइन करून मोटार पंपाच्या साह्याने हे सांडपाणी उपसून आपल्या शेतीसाठी वापरतात, हे सांडपाणी दुर्गंधीयुक्त असते ,ते शेतीत वापरल्यानंतर आसपास रहिवाशांना व या शेतीच्या आसपास असणाऱ्या रस्त्यांवरून जाणाऱ्या येणाऱ्यांना दुर्गंधीचा मोठा त्रास होतो, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनाही  या दुर्गंधीचा मोठा त्रास होतो,  हे आरोग्यास अपायकारक आहे ,हे सांडपाणी दूषित असते, ते शेतातील पिकांना दिल्यामुळे ही पिकेही खराब होतात, ते खाण्यास हानिकारक असतात, परंतु याचा कोणी विचार करत नाही ,शिवाय ज्या उघड्या ड्रेनेज मधून  हे सांडपाणी पाईप लाईनने मोटरपंप च्या साह्याने घेतले जाते, अशा उघड्या ड्रेनेज मध्ये आत्तापर्यंत शिर्डीतील चार ते पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे सर्व माहीत असतानाही अजूनही अशा उघड्या ड्रेनेज मधून मोटार पंप च्या साह्याने थेट पाइपलाइन करून आपल्या शेतात हे सांडपाणी घेतले जाते, मात्र याचा भविष्यात मोठा आरोग्यास धोका आहे, हे जाणून आपापल्यापरीने शेतकऱ्यांनी हे सांडपाणी घेणे बंद करावे, तसेच शिर्डी नगर पंचायतीने तरी त्याची दखल घेऊन उघडे ड्रेनेज बंद करावेत व सांडपाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना मनाई करावी आणि या सांडपाण्यामुळे परिसरात होणारी   रोगराई, डासांचा प्रादुर्भाव व दुर्गंधी टाळावी, अशी मागणी शिर्डी करानी केली आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget