शिर्डी -नेहमी रात्रंदिवस देश-विदेशातील साई भक्तांनी गजबजलेली श्री साईंची शिर्डी सध्या लॉक डाउनमुळे ठप्प असून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, ट्रॅव्हल्स, बसेस बंद असून देशातील मंदिराप्रमाणे श्री साईबाबा समाधी मंदिरही सन 1940 नंतर या परिस्थितीत 17 मार्चपासून दु,३ नंतर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे, शिर्डीत प्रथम च इतका सन्नाटा दिसत असून रस्ते ओस पडले आहेत, शिर्डीत राज्यव परराज्यातून येणाऱ्या एसटी बसेस ,
राज्यातून, देशातून येणाऱ्या रेल्वे, तसेच विमाने ही बंद आहेत, त्यामुळे शिर्डी बस स्टँड, साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक व श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळही सुने सुने दिसत आहे शिर्डी शहरातून जाणारा नगर मनमाड महामार्ग सुद्धा ओस पडला आहे, श्री साईबाबा संस्थानने आपले प्रसादालय व भक्त निवासे ही बंद केले आहेत ,परंतु येथील आरोग्य पोलीस कर्मचारी व रुग्णालयातील नातेवाईक , गरजूंना नाश्ता भोजन देण्याची व्यवस्था साई संस्थांनी केली आहे, सर्वत्र लॉक डाऊन मुळे शुकशुकाट असताना शिर्डी बस स्थानकावर मात्र येणारे जाणारे लोक दिसत आहे, शिर्डी परिसरातील गावे व वाड्या-वस्त्यांवर सकाळ, संध्याकाळ दुध डेअरी यांवर शेतकऱ्यांची, दूध उत्पादकांची थोडीफार गर्दी दिसून येत आहे,
किराणा दुकानात काहीतरी खरेदीसाठी बहाना करत लोकबाहेर येत असून अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क किंवा सोशल डिस्टंस, दक्षता घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे, शहरात लॉक डाउन पाळला जात असला तरी शिर्डी परिसरातील काही गावे खेडे वाड्या वस्त्या यावर या लॉक डाऊन चा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही, लोक दिवसभर घरात असले तरी सायंकाळी काही लोक दूध घालण्याच्या किराणा घेण्याच्या बहाण्याने बाहेर दिसतात, पोलिसही सकाळी आपल्या पोलिस वाहनांमधून मधून स्पीकर लावून गर्दी करू नका, मास्क लावा म्हणून सांगतात, सकाळी एकदा फेरी मारल्यानंतर परत त्यांचाही चक्कर होत नाही, ग्रामीण भागात सर्वत्र हीच परिस्थिती सध्या दिसून येते आहे, ग्रामीण भागात सध्या गहू ,मका ज्वारी काढण्यासाठी आल्याने व मजूर मिळत नसल्याने ग्रामीण भागातले शेतकरी हार्वेस्टर, मशीनद्वारे किंवा घरातील कुटुंबातील सदस्यांना घेऊन शेतात जाऊन काम करत आहे, पिके सोंगत आहेत, काही शेतकरी शेतातून काढलेले कांदे गोण्यांमध्ये भरण्याचे काम करत आहे, तर कोणी द्राक्षे काढण्याचे काम करताना दिसून येत आहे, अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसत असून लॉक डाऊन शहरात आहे तसाच तो ग्रामीण भागातही असला तरी शेतीत काम करणारे हे आपल्या कामात मग्न आहेत, वाड्या-वस्त्यांवर शेतीत दुर दुर असणारे मळ्यामध्ये लॉक डॉऊनचा प्रभाव फारसा दिसून येत नाही, दूध धंदा व दूध डेअरी सध्या जरी चालू असल्या तरी भविष्यात ग्रामीण भागातले दूध शहरांमध्ये जाणे खूपच कमी झाले असल्याने ग्रामीण भागातील दूध डेअरी ह्या लवकरच बंद करण्याची वेळ येणार असल्याचे दूध डेअरी चे मालक बोलत आहेत, दूध वाहतूक करणारे ट्रक चालक व इतर कर्मचारी ही शहरात जाण्यात उत्सुक नसल्याने दूध आता ग्रामीण भागातून शहरापर्यंत पोहोचले जाणे मुश्कील होत आहे ,त्यामुळे भविष्यात काही दिवसातच ग्रामीण भागातील दूध गावातच राहण्याची शक्यता आहे ,त्यामुळे शासनाने दूध उत्पादक का नाही ही यापुढे मदत करावी अशी मागणी होत आहे.
Post a Comment