शिर्डी,प्रतिनिधि राजकुमार गडकरी दि.30- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये आदेश पारित केले असून त्याची जिल्हात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिर्डी नगर पंचायत हद्दीतील स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्नदान व अन्न पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.
यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग ,शिर्डी श्री.गोविंद शिंदे यांनी, साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतूदीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 चे कलम 30 अन्वये लॉकडाऊन या उपाययोजनेमुळे शिर्डी शहर आणि पंचक्रोषी परिसरात अडकलेल्या, स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय देखभाल पुरविणे आवश्यक असल्यामुळे निघोज ता.राहाता येथील साई पालखी निवारा या संस्थेचे दोन हॉल 30 मार्च,2020 पासून पुढील आदेशापर्यत अधिग्रहीत केले आहेत. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Post a Comment