September 2023

बेलापुर (प्रतिनिधी )-गावात कुठलीही घटना घडली तर सर्वात आगोदर धावत येतात ते पोलीस दादा सर्वांच्या मदतीला कायम धावणाऱ्या पोलीस दादाने केलेल्या अचुक उपचारामुळे व आमदार लहु कानडे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नुकताच  एका नागरीकाला जीवदान मिळाले असुन आता तो रुग्ण दवाखान्यात व्यवस्थित उपचार घेत आहे .                             या बाबत घडलेली घटना अशी की बेलापुर येथील साई मंदिरांत आमदार लहु कानडे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाबाबत बैठक बोलविण्यात आली होती या बैठकीस अनेक ग्रामस्थ उपस्थित  होते मंदिरात आमदार लहु कानडे हे भाषण करत होते व त्या ठिकाणी तान्हाजी बापुराव शेलार वय ७८ वर्ष हे साई मंदिरांच्या पायरीवर बसले होते त्यांना अचानक हृदय विकाराचा तिव्र झटका आला सर्व जण त्यांच्या भोवती गोळा झाले होते तेथुन काही अंतरावर द्वारकामाई जवळ  बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे उभे होते गर्दी कशाची जमा झाली म्हणून पोलीस काँन्स्टेबल  हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे त्या ठिकाणी गेले त्या वेळी  हरिष पानसंबळ दादा तातडीने पुढे सरसावले त्यानी त्यांचा श्वास पाहीला  मानेजवळ बघीतले सर्व शरीर गार पडले होते त्यांनी तातडीने तान्हाजी शेलार यांची छाती दाबली ठरावीक पद्धतीने छाती पंपीग करताच त्यांनी जोराचा श्वास घेतला आमदार लहु कानडे यांनी आपले सुरु असलेले भाषण थांबवुन आपल्या वहानातुन शेलार यांना दवाखान्यात पाठवीले पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तसेच आमदार कानडे यांच्या सहकाऱ्यामुळे शेलार यांना वेळेवर उपचार मिळाले सध्या ते संत लुक हाँस्पीटल येथे उपचार घेत असुन त्यांची प्रकृती सुधारत आहे .या बाबत शेलार परिवाराने आमदार लहु कानडे तसेच बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ नंदु लोखंडे यांना धन्यवाद दिले आहे


 ( १)    " तेरावे सद्दीची पैगंबरी खुप ! दावीतो प्रमाण कुराणातं !!

               जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

   आनंद वतनी ज्योती म्हणे !! ".  समतेचा पुरस्कार करणारे   "राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले ...

        (२)"  एक ही सफमें खडे हो गयै , मेहमूद और अयाज ...!!

ना कोई बंदा रहा ,ना बंदा नवाज. ..!!! "

जगप्रसिद्ध साहित्यिक व ऊर्दू कवी डॉ.मुहम्मद इक्बाल सहाब..

      इतिहासाच्या कित्येक महान व्यक्तींनी ज्या महामानवाच्या कार्याविषयी , जीवनाविषयी , त्यांच्या  सामाजिक एकता विषयावर , क्रांतिकारक निर्णय विषयी कित्येकदा स्तुती केली ,ज्ञात -अज्ञात पणे आदर्श घेतला व आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा अंगिकार केला , 

 आशा महान महामानवाचा आज जन्मदिवस 

  मी लिहीताना  एक निरक्षर ,अनाथ , विश्व बंधुत्व ,संवेदनशील , समतेचा पुरोगामी प्रेषित मुहम्मद स्व . यांचा उल्लेख करतो.

.त्याचप्रमाणे पुरोगामी विचारांचे धगधगत्या मशाली चे महामानव च करतो .त्या पुरोगामी विचारांनी प्रभावित होऊन कित्येक संत ,पीर , बादशहा ,महान विचारवंत , विद्वान , समाजसुधारक या महात्म्यांनी आप- आपल्या देशात समाजात  ज्ञात , अज्ञात पणे क्रांती घडवून आणली .

              आगदी १५०० वर्षांपूर्वी पारंपरिक  वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक ईश्वरवादाची,  अल्लाहा ची शिकवण देवून , फक्त  "  एकच  अल्लाहा  समस्त ब्रम्हांडाचा नायक  आहे "  .त्या एकाच अल्लाहा ची प्रार्थना करा . व  अल्लाहाची   प्रार्थना करताना अनुयायींना थेट संपर्क साधण्यासाठी कोणत्याही प्रकारे मधे दलाल मुक्त धर्माची संकल्पना मांडली.      सोबतच कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही .

           इस्लामी संस्कृती नुसार कोणत्याही  प्रकारची साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज ठेवली नाही .

कोणी ही व्यक्ती  ती मग शुद्र ही असेल ती सुध्दा  इस्लामी ज्ञान घेवू शकतो , अलिम मौलाना , मुफ्ती , हाफीज ,बनु शकतो ,शिक्षण घेवू शकतो .  ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही  शिकण घेवु शकतात आसा पारंपरिक वाद त्यांनी एकदम नाकारला.  

ज्ञानी माणसांला प्रेषित मुहम्मद स्व.यांनी मोठे स्थान दिले आहे,एक विद्वान एका शहीदांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे ,हा विचार त्यांनीच दिला आहे , ईस्लाम मधे एका शहीदांचे फार मोठं महत्त्व आहे , तरी सुद्धा त्यांनी विद्वानांना जास्त महत्त्व दिले ,मग ते कोणत्याही प्रकारचे  उदा. ज्ञान असणारा व्यक्ती म्हणजेच विद्वान फक्त धार्मिक ज्ञान असणं च हे ज्ञान ईस्लाम मानत नाही तर उदा. अर्थ शास्त्रात , रसायनशास्त्र , वैद्यकीय शास्त्रात, क्रीडा क्षेत्रात , लष्कर क्षेत्रात आशा विविध क्षेत्रातील ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व यांनी सर्व मानवजातीला कायमची अगदी खुली केली .

त्याकाळी चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुप प्रगत देश होता तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " तुम्ही चीनला जावुन ज्ञान मिळवा  लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी जा " असा संदेश  त्याकाळी दिला .या पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल प्रेषित मुहम्मद स्व यांचा नेहमीच अभिमान बाळगावा तितके थोडेच.

           श्री.  गुरु नानक देवजी , आपल्या ( जन्म साखी विलायत वाला ,पेज नंबर १६८) ) मधे म्हणतात की,  " ले पैगंबरी आया , इस दुनिया माहे ! नाऊ .

                 मोहम्मद मुस्तफा ,हो आबे परवा हे !!!!)

( अर्थात , ज्यांचं नाव मुहम्मद आहे ,ते या जगात प्रेषित बनुन आलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकाच्या शैतानी शक्तींची भिती व भय नाही .ते बिलकुलच निर्भय  आहेत .)

         अल्लाह समोर सर्व मानव सम-समान, सारखेच आहेत हा पुरोगामी विचार मांडला .

              आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी कितीही मोठा होवू , बनू शकतो , कोणीही राजा ,प्रधान बनू शकतो हा अत्यंत पुरोगामी विचार मांडला .राजा होण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावा लागतो हा विचारच नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून देत .

      याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर व औरंगाबाद शहरांची ज्याने निर्मिती  केली ,शहर बसवले, चेहरा- मोहरा बदलला असे पंतप्रधान ,वजिर जो एक निग्रो गुलाम म्हणून विकत आणला होता व आपल्या कर्तृत्वाने मोठ्या पदावर गेला.  ते म्हणजेच मलिक अंबर हे होत .(उदाहरण . त्यांच्या महानिर्वाण नंतर ७००-८०० वर्षानंतर चे आहेत ).

   समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक हे प्रेषित मुहम्मद स्व.हेच . आपल्या २३ वर्षांच्या कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून , अरब देशात काळा -गोरा  हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात  केली जात होती ,ती  गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाचा आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोरयांचा भेदभावच  नष्ट केला .

तसेच ह.बिलाल नावाच्या तुच्छ समजले जाणारे गुलामगिरीतून मुक्त करून . नंतर मक्का विजयी दिवशी  पवित्र काबागृहावर चढून " अजान " देण्याचा आदेश दिला व समस्त जगाला दाखवून दिले की , कोणीही अपवित्र नसते.  समस्त मानव जात ही इस्लामच्या मुलभूत सिद्धांतानुसार एकच अल्लाहाची संतान आहेत. सर्व रंगाचे , वर्णाचे , वंशाचे ,एकच आहेत .हा भेदभाव ईस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय , हक्क , संधी आहेत .हा क्रांतिकारी विचार पहिल्यांदा प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व. यांनीच जगाला दिला.

           स्वामी विवेकानंद म्हणतात ,""' प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.आपल्या आदर्शवत जीवनात असं काही धडा घालून गेले की ,त्यांच्या अनुयायांनी , मुस्लिमांमध्ये संपूर्ण समता , बंधुभाव निरंतर नांदावयांस हवे , त्यांच्या मधे जातीचा , लिंगाचा , वर्णभेदाचा भेदभाव कदापी ही शिरू नये..""

                   स्त्रियांना वारसाहक्कात , मालमत्तेत वाटा आहे . तो देणारे जगभरात पहिला विद्रोही क्रांतीकारक विचार  प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनीच दिला.

      विश्वातील पहिला घटस्फोटीत , विधवा महिलांसाठी पुनर्विवाह  ही संकल्पना मांडली व जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलाशी  स्वतः विवाह करून तुच्छ समजलं जाणार्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी पत्नी बनवून बहुमान दिला .

       स्री भ्रुण हात्या हे पाप आहे ही सांगणारं ही प्रेषित मुहम्मद पैगंबर च .

 अरब जगतात १४००-१५०० वर्षांपूर्वी समाजमनावर नसानसात भिनलेली होतं की , जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जातं असतं .  त्या जन्म झालेल्या मुलीला जिवंत पुरायच्या क्रुर प्रथा होती , तेथील स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं समजलं जातं असतं.ती प्रथाच आपल्या २३ वर्षाच्या कालखंडात हद्दपार करून टाकली.

   स्त्रियांना  शिक्षणाचा अधिकार आहेत व त्या शिकल्या पाहिजेत असे ठणकावून सांगत दाखवून दिले आहे.

आपल्या वडिलांच्या संपत्ती तुन , पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतून मुलींचाही वाटा आहे हा क्रांतिकारी विचार अंमलात ही आणला.

जगप्रसिद्ध अंतिम प्रवचनातून (हॹतुल विदाह -खुतबा Farewell speech) मधे , त्यांनी महीलांच्या हक्काची काळजी घ्यावी असं तळमळीने सांगितले , " मित्रांनो ,पतीचे पत्नी वर हक्क आहे , तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला ,बायकांना प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर , निष्ठुर होवू नये ,दयाळु राहा , तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे ,तर काळजी घ्यावी . पत्नी चे जे काही आधिकर असतील  ते सर्व द्या . तुमच्या वर विश्वास टाकला आहे ,तर विश्वासघात करू नका , तुम्हाला महाप्रलयाच्या (कयामतच्या ) दिवशी अल्लाहा समोर हिशोब द्यावाच लागेल . या दिवसाची कायम आठवण ठेवा ."" 

  आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महीलांची  तळमळ व्यक्त केली , काळजी घेतली .

      महात्मा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे लिहीतात ,की, 

 ""    तेरावे सद्दीची पैंगंबरी खुण ! दावितो प्रमाण कुरआणात !

            जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

आनंद वतनी ज्योती म्हणे !! ""

             पुढे पुन्हा  महात्मा फुले  यांनी पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहिला व त्यात ते स्तुती करताना लिहीतात की , " 

     कोणी नाही श्रेष्ठ ! कोणी नाही दास !

जात प्रमादास खोडी बुडी ! मोडीला अधर्म आणि मतभेद !

सर्वात अभेद ठाम केला !!! " 

(   अर्थात ;- " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला , गुलामगिरी नाकारली , जातिभेद, जातीपाती बुडासकट नष्ट केले , अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला , सर्वात्र अभेद ,समता, बंधुभाव कायम केला !!')

      पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ इक्बाल लिहीतात  की ,.   

         " एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !!

         ना कोई बंदा रहा , ना बंदा नवाज ""!!!

( अर्थात :- मस्जिद मधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा , राष्ट्रपती ,च्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहिला ,कोणी गुलाम नाहीत कोणी मालक नाही ....)

पैगंबर स्व.यांनी अभुतपुर्व क्रांती घडवताना संपूर्ण अरब देशात व्यसनापासुन कित्येक संसार उध्वस्त झालेली पाहून नशा मुक्त, व्यसनमुक्त  चळवळी चालवुन संपूर्ण अरब प्रदेश व्यसन मुक्ती केला . ""  दारू बनवणारा ,त्याची विक्री करणारा ,  ने आन, व्यापार  करणारा , मदत करणारे सर्व गुन्हेगार ठरवले , ""  अरब प्रदेश व्यसन मुक्त केले .

     अर्थ व्यवस्थेत अभुतपूर्व क्रांती घडवून आणली बिना व्याजी अर्थव्यवस्था निर्माण केली , व्याज घेणं- देणं दोन्हीला हराम करून बंद केले , सावकारी पध्दतीचा नायनाट केला .

त्यासाठी श्रीमंत वर्गात जकात पध्दत चालु केली ती अनिवार्य करण्यात आली . यामुळे त्याचे चांगले परिणामही दिसू लागले , समाजातील बहुसंख्य कुटूंब जकात देण्या ईतपत सक्षम झाली व अशा कित्येक गरीबांना त्याचा लाभ झाला.

साक्षरतेची , शिक्षणाची अदुतिय क्रांती घडवून आणली . समाजातील स्री शिक्षण अनिवार्य केले , मुलं-मुली, वृध्द व्यक्तींवर शिक्षण अनिवार्य करण्यात येवून. एका शिक्षीतांने  दहा निरक्षरांना  ज्ञान देण्याचं काम करावे . जेलमधील शिक्षीत,साक्षर कैदींना निरक्षर कैद्यांना शिक्षण देणे अनिवार्य केले . शिक्षणाची अभुतपूर्व क्रांती घडवून आणली.

       आति- विशेष बाब  म्हणजे  जगातील इतिहासात तोडच नाही आशी विषेश  म्हणजे  प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व . स्वतः एक निरक्षर , अशिक्षित असून , स्वतः ला लिहीता-वाचता येत नव्हते . तरी सुद्धा , सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व देवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला . याला एक अद्भुतीय  क्रांतीच घडवून आणली.

              या सर्व न भूतो न भविष्यते अशा घडवलेल्या क्रांती चे श्रेय स्वतः ला यतिकिंचतही न देता सर्व काही श्रेय जगत निर्मात्यां अल्लाहा रबबुल आलमीनला दिले !!! मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत .

ते स्वतः म्हणतं ,मी तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस , कार्यकर्ता आहे, हे सर्व यश अल्लाहा रबबुल आलमीन च्या कृपेने मिळालं आहे.आशी ठाम भूमिका घेउन स्वतः ची विनम्रता संपूर्ण जगासमोर मांडली ... केवढी मोठी विनम्रता ही जगाच्या इतिहासात तोडच नाही .

    प्रसिद्ध तत्वज्ञ ;- बर्नार्ड शॉ नोबेल पुरस्कार विजेते म्हणतात ,की ," मुहम्मद स्व .यांनी दिलेल्या शिकवणीबाबत माझ्या मनात आदर आहे .मी त्यांची प्रशंसा करतो कारण त्यांच्या मध्ये जबरदस्त तेज आहेत.प्रत्येक वयोगटास आवाहन करणारे आणि जीवनात होणारे परिवर्तन पोचविण्याचे सामर्थ्य असलेला हा एकमेव धर्म आहे असे मला वाटते .या व्यक्तींचा मी अभ्यास केला आहे, उद्याच्या युरोपला ईस्लामची तत्व प्रणाली मान्य होईल असे मी भाकीत केले आहे . कारण आजच्या युरोपने ते मान्य करण्यास सुरुवात केली आहे 



लेखक डॉ सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर 

९२७१६४००१४ .....

श्रीरामपूर-पूर्णवाद नगर येथील  म्हसोबा महाराज मित्र मंडळा येथे  आम आदमी पार्टीचे नेते  तिलक डुंगरवाल यांनी सपत्नीक सत्यनारायण व महाअर्थी करत असताना त्यांनी गणपती रायास रेल्वे प्रशासनाला सद्बुद्धी दे  असेही साकडे  घातले अनेक रहिवाशांनी रेल्वेच्या दोन्ही बाजूने लाखो  रुपये देऊन घर व्यापारी गाळे पन्नास वर्षांपूर्वी विकत घेतले त्यामध्ये व्यवसाय करून शहराच्या विकासाला हातभार लावला अनेकांनी आपले उद्योग व्यवसाय व्यवस्थितपणे चालू केले मात्र रेल्वे लाईन सेंटर पासून उत्तरेकडील व दक्षिणेकडील मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेण्याचे घाट घातला जात आहे यामुळे भयभीत झालेल्या शहर वासियांकडे राजकीय  पुढार्‍यांनी दुर्लक्ष केले मात्र आम्ही या विस्थापित होऊ पाहणाऱ्या  नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सुतवाच तिलक डुंगरवाल त्यांनी महाआरती प्रसंगी केले याप्रसंगी

म्हसोबा महाराज मित्र मंडळ

अध्यक्ष ऋषिकेश जऱ्हाड

सन्नी भिंगरदिवे, विनोद लोंढे, 

आपचे विकास डेंगळे,राहुल रण पिसे, बी एम पवार, रुपेश बिऱ्हाडे, दिनेश सोनवणे,नीरज वैद्य,गगन नितनवरे,अक्षय बिऱ्हाडे,सुनील पवार,गौतम त्रिभुवन,तोहित पिंजारी,नदीम पठाण, पियूष भांबुरे,आकाश म्हसे, निलेश हिवाळे आदी उपस्थित होते

बेलापुर (प्रतिनिधी  )-पंधरा आँगस्ट निमित्त तहकुब झालेली ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली असुन पहील्यांदाच तंटामूक्ती अध्यक्षांच्या निवडीवरुन तंटा पहावयास मिळाला असुन सरपंच महेंद्र साळवी यांनी कुठलीही निवड झाली नसल्याचे सांगीतल्यामुळे वादावर पडदा पडला    १५ आँगस्ट निमित्त घेण्यत येणारी ग्रामसभा ३१ आँगस्ट रोजी घेण्यात आली होती परंतु कोरम अभावी ती तहकुब करण्यात आली तहकुब करण्यात आलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते सुरुवातीस ग्रामविकास अधीकारी मेघशाम गायकवाड यांनी मागील सभेच प्रोसिडींग वाचुन दाखविले त्यानंतर शासनाच्या विविध योजना बाबत चर्चा करण्यात आली १५ व्या वित्तआयोगांतर्गत  सन २०२४-२५ च्या आराखड्याबाबतही चर्चा करण्यात आली स्री जन्माचे स्वागत करुन गाव बाल विवाह मुक्त करण्याचेही ठराव करण्यात आले ऐनवेळी येणाऱ्या विषयात चंद्रकांत नाईक यांनी तंटामुक्त अध्यक्ष पदाकरीता प्रकाश जाजु यांच्या नावाची सुचना मांडली त्या सुचनेस ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक हे अनुमोदन देत असतानाच गावकरी मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले हा विषय विषय पत्रीकेवर नसताना घेण्याचे कारणच नाही आम्ही तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांचे कामकाज चांगले असल्यामुळे त्यांनाच मुदतवाढ दिल्याचे जि प सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले त्यामुळे दोन्ही गटाकडून गदारोळ सुरु झाला त्यावर तोडगा काढत सरपंच महेंद्र साळवी यांनी हा विषय विषय पत्रीकेवर घेवुनच निवड करु असे सांगितले त्यानंतरही प्रफुल्ल डावरे व चंद्रकांत नाईक यांच्यात खडाजंगी झाली नेते मंडळीनी मध्यस्थी करुन दोघांनाही शांत केले या वेळी मारोतराव राशिनकर यांनी भंडारदरा धरणातुन के टी वेअर बंधारे भरण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात यावे तसेच गावात प्लँस्टीक बंदी करण्यात यावी अशी सुचना मांडली त्यास प्रकाश कुर्हे यांनी अनुमोदन दिले गेल्या काही दिवसापासून बेलापुर ग्रामपंचायत सत्ता बदला बाबत चर्चा सुरु होत्या सरपंच उपसरपंच यांच्याकडून दावे प्रतिदावे केले जात होते त्यामुळे आजच्या ग्रामसभेत नेकमे काय होणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती मात्र परस्पर दोन्ही विरोधी गटांना वाटत होते सरपंच आमचाच आहे त्यामुळे ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष पदाचा वाद सोडला तर सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ठरावीक लोकांनीच माईकच ताबा घेतल्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना आपल्य समस्या मांडताच आल्य नाही ग्रामसभेस जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले सदस्य रविंद्र खटोड भरत साळूंके चंद्रकांत नवले मुस्ताक शेख  रमेश आमोलीक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक दत्ता कुर्हे  प्रफुल्ल डावरे हाजी ईस्माईल शेख महेश कुर्हे अशोक प्रधान वैभव कुर्हे दादा कुताळ प्रसाद खरात सचिन अमोलीक कामगार तलाठी पी बी सुर्यवंशी गोपी दाणी आरुण अमोलीक एकनाथ नागले पुरुषोत्तम भराटे शफीक बागवान प्रभात कुर्हे राजेंद्र कुताळ द्वारकनाथ कुताळ नितीन नवले विशाल आंबेकर अजीज शेख संतोष शेलार आदिसह ग्रामस्थ उपस्थित होत

नेवासा (गौरव डेंगळे): येथील त्रिमूर्ती प्रतिष्ठान येथे अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेंट मेरीज स्कूलच्या १४ वर्षाखालील मुले व मुली आणि १९ वर्षाखालील मुले या संघांनी दणदणीत विजेतेपद मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. शालेय तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये नेवासा तालुक्यातील १६ शाळांनी सहभाग नोंदवला होता. मुलांच्या १४ व १९ वर्षाखालील झालेल्या अंतिम सामन्यात सेंट मेरीज संघाने त्रिमूर्ती संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले तर मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट मेरी संघाने त्रिमूर्ती संघाचा २-१ पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या संघांना राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक पापा शेख व विष्णू खांदोडे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योसी, व्यवस्थापिका सिस्टर मोली, सिस्टर लीसा, सिस्टर मुक्ता तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुघलांसह विविध मुस्लिम शासकांच्या 900 वर्षाच्या इतिहासामध्ये देशांमध्ये कधीही हिंदू मुस्लिम वाद झाल्याचे इतिहासात नमूद नाही.परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये या देशाच्या एकोप्याला दृष्ट लागली. आज सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र होत असले तरी मुस्लिम समाजाने आपल्या पारंपारिक प्रथा आणि रीतींमध्ये बदल करून समाजाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासात योगदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्यातील जुन्या चाली,रीती, परंपरांचा आढावा घेऊन योग्य त्या ठिकाणी बदल करावा.आपले इतर देश बांधवांसोबत असलेले सलोख्याचे संबंध कायम ठेवून समाजाने आपला विकास साधावा. त्यासाठी मानवता संदेश फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्थांनी आता पुढे येण्याची गरज आहे. मशिदींचा वापर केवळ नमाजसाठी न करता स्टडी सेंटर म्हणून ही त्यांचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आर्किटेक अर्षद शेख यांनी व्यक्त केली.

येथील मानवता संदेश फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "हालात बदल सकते है" या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.मिल्लत नगर मधील मिल्लत मशिदीतझालेल्या या कार्यक्रमास समाजाच्या सर्व स्तरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या विकासाचा स्वातंत्र्यपूर्व व स्वतंत्र्योत्तर काळाचा आढावा घेताना शेख यांनी अनेक दाखले देत मुस्लिम समाजाचे योगदानाची सखोल चर्चा केली.देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व बहादूर शाह जफर यांनी केलेतर त्यांच्या पूर्वी अनेक मुस्लिम शासकांनी या देशांमध्ये विकासाचे पर्व सुरू केले.मुस्लिम शासकांच्या काळामध्ये कधीही हिंदू मुस्लिम वाद झाले नाहीत नऊशे वर्ष राज्य करताना त्यांनी कधीही कोणती नावे बदलली नाहीत उलट हिंदू मंदिरांना इनामी जमिनी दिल्याचा इतिहास अस्तित्वात आहे असे सांगून अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये140 कोटी लोकसंख्येमध्ये 25 कोटी असलेल्या मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे परंतु या देशातील लोकशाही अतिशय प्रबळ असल्याने योग्य वेळी योग्य ते बदल येथील जनता करीत असते ती वेळ आता आलेली आहे बदल निश्चितपणे होणार आहे त्यासाठी मुस्लिम समाजाने जागरूक राहावे आपल्या भावनांना आवर घालावा प्रतिक्रिया व्यक्त करू नये तर आपल्यामध्ये एकोपा निर्माण करून विकासाचे कार्य अव्याहतपणे पुढे न्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

प्रस्ताविक भाषणात मानवता संदेश फाउंडेशनचे प्रमुख सलीमखान पठाण यांनी आगामी काळामध्ये मुस्लिम समाजाची वाटचाल काय असावी समाजाचे मूलभूत प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबाबतची भूमिका निश्चित करणे आवश्यक असून त्यासाठीच अशा प्रकारची व्याख्याने आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास मुफ्ती मोहम्मद रिजवान,हाफिज अशपाक पठाण,

नगरसेवक अंजुमभाई शेख,मुख्तारभाई शाह, मशिद ट्रस्टचे अध्यक्ष रमजान पठाण,हाजी युसुफ शेख,अहमदभाई जहागीरदार, साजिद मिर्झा,ॲड.शफी शेख, ॲड.समीन बागवान, सलाउद्दीन शेख, सरवरअली मास्टर,

अजीज शेख,अझहर शेख, हाजी शरीफ खान,डॉ.सलीम शेख,सोहेल दारुवाला, युसूफ लाखाणी, रशीद शेख, रफिक शेख,

इरफान शेख टी सी, शकिल बागवान, जलील शेख,बदर शेख,फारुक पटेल, फिरोज पठाण, हुजेफखान पठाण, आरीफ पटेल,समीर शेख,रमजान शाह,अफरोज शाह, इम्रान पोपटिया, हाजी रियाज बागवान, शाहीन शेख आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नजीरमामू शेख,तन्वीर शेख, खालिद मोमीन, तोफिक शेख यांनी परिश्रम घेतले. इकबाल काकर यांनी आभार मानले.

श्रीरामपूर - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती निमित्त डी डी काचोळे माध्य. विद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेली कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक अभूतपूर्व व इतिहासिक ठरली. मिरवणुकीचे नियोजन व संयोजन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजींग कौन्सील सदस्या मीनाताई जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.  मिरवणूकीचे उदघाटन जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील यांच्या शुभ हस्ते झाले. जवळपास चार किमी लांबीच्या मिरवणुकीने शहरात विक्रम केला आहे. 

       मिरवणुकीमध्ये जवळपास ३००० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, पालक व नागरिक होते . सवाद्य मिरवणुकीमध्ये भव्य रथ, घोडे, उंट , बँड पथक, झांज पथक, लेझिम पथक, शिवराज्यभिषेक सोहळा , विज्ञान व तंत्रज्ञानाची गगन भरारी चंद्रयान, आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरांमधील चौकात चौकात संबंधित नृत्य व विविध पथकांचे सादरीकरण आकर्षक रित्या करण्यात आले. 

   राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन दर्शविणारे राजस्थान, कोळी, शेतकरी पंजाबी साउथ आदिवासी दक्षिणात्य संस्कृती वारकरी आदी नृत्यांचा अविष्कार सादर करण्यात आला. सजावलेल्या ट्रॉलिमध्ये सर्वधर्मीय वेशभूषा, विविध समाज सुधारक व साधू संतांची वेशभूषा यातून समानतेचा व सर्व धर्म समभाव याचा संदेश देण्यात आला. 

शहरात ठिकठिकाणी महिलांनी अण्णांच्या पुतळ्या


चं औक्षण केलं. श्रीरामपूर आतील नागरिकांनी कर्मवीर जयंतीच्या मिरवणुकीचे विशेष कौतुक केले. तसेच प्रांताधिकारी किरण सावंत, डी. वाय. एस. पी. डॉ. बसवराज शिवपूजे, तहसीलदार मिलिंद वाघ, कामगार हॉस्पिटल वैद्य अधिकारी डॉ. रवींद्र जगधने , प्राचार्य पी व्ही बडधे, प्राचार्य डॉ. एस.ए. निंबाळकर,  प्राचार्य डॉ.एम.एस.पोंधे, मुख्याध्यापक सुनिल साळवे, मुखाध्यापिका सोनाली पैठणे, सौ. जयश्री जगताप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना शहर प्रमुख सचिन बडधे, गणेश थोरात, सुनिल डहाळे, मेजर कृष्ण सरदार, बाळासाहेब भागडे, मा.नगरसेवक  आशिष धनवटे आदींनी मिरवणूकीत व कॉलेज रोडवरील कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी डी डी काचोळे विद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेला संस्कृतिक कार्यक्रमासह लेझिम व झांज पथकाचे सादरीकरण लक्षनीय ठरले.

मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव,  संस्कृती व संस्कृतिक वारसा, महापुरुषांचा आदर्श , महाराष्ट्राची लोकधारा, पर्यावरण रक्षण, विविध राज्यांची संस्कृती, विज्ञान व तंत्रज्ञानाची भरारी चंद्रयान, स्वच्छता व आरोग्य आदिविषयांचा संदेश देणारी मिरवणूक होती. तसेच एस.के.सोमैय्या प्राथ.विद्यामंदिर विद्यालयाची कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक, रा.ब.ना.बोरावके कॉलेज, सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र  महाविद्यालय व डी डी काचोळे विद्यालय आदिंच्या मिरवणुकीचा समारोप कर्मवीर चौकातील कर्मवीर पुतळ्या जवळ समारोप झाला. यावेळी श्रीरामपूर रयत संकुलाच्या वतीने व मान्यवरांच्या वतीने कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले.

       कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डी डी काचोळे माध्य. विद्यालय स्टाफ, एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थी वस्तीगृह, व पालक आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्रीरामपूर पोलीस स्टेशनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ट्राफिक पोलीस आदींनी मिरवणुकीचा चोख बंदोबस्त ठेवला.

     कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन दिले. मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

वांगी गावच्या हद्दीमध्ये असणार्‍या नदी मध्ये शासनाने वाळूचा डेपो चालु केला या डेपोचे ठेकेदार यांनी शासनाचे सर्व आदेशाचे उल्लंघन करून स्वतःच्या फायद्यासाठी वाळू उपसा करत आहे त्या ठेकेदारावर त्वरित फायदेशीर कारवाई व्हावी त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रांत अधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की शासनाने व महसूलमंत्र्यांनी नागरिकांना कमी दरात वाळू बांधकामासाठी मिळायला पाहिजे हा शासनाचा निर्णय व माननिय महसूल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील साहेब यांचा  या निर्णयाच्या आमच्या सह  संपूर्ण महाराष्ट्र तील नागरीकांनी कौतुक केले कारण की गेल्या अनेक वर्षापासून रात्री अपरात्री नदीतुन मोठ्या प्रमाणात अवैध्य रितीनी वाळू चोरी करुन नागरीकांना पाच हजार ते सात हजार रुपये ब्रास ने वाळू चोर विकायचे व वाळू चोर बेहीसाब वाळू रोजच चोरुन नेत असल्याने शासनाला त्याचा कुठलाही आर्थिक फायदा होत नव्हता व तसचे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीच्या कडेला असणार्‍या शेतकार्‍यांना नदीत वाळूचा साठा नसल्याने पाण्याचे साठवण होत नसल्याने शेतकर्‍यांना, शेती करण्यासाठी व तर कधी कधी मुक्या जनावरासाठी पाणी मिळत नव्हते. ह्या सर्व गोष्टीची महाराष्ट्र शासनाने व महसुल मंत्र्याने गंभीर दखल घेऊन शासनाला महसुल मिळावे व नागरिकांना कमी दरा मध्ये वाळू मिळावे व शेतकर्‍याच्या हीताचे विचार करुन नदीत वाळू साठा शिल्लक राहावे जेणे करुन पाण्याचे साठवण राहील व शेतकर्‍यांना याचा फायदा होईल ह्या सर्व गोष्टीच्या विचार करुन शासनाने ६०० रु. ब्रास ने नागरीकांना वाळू मिळावे असा कायदा बनवुन वाळू डेपो बनविले. या  डेपो चालक ठेकेदाराला नियम व अटी लावण्यात आले त्यामध्ये वाळू किती ब्रॉस उचलायचे आहे व तसेच वाळू कोठून उचलायचे ते गट नंबर चे ठिकाण ठरवुन दिले आहे. तसेच पर्यावरणाचा विचार करुन वृक्षरोपण करणे वाळू उपसा करताना मोठ्या यंत्रानाचा वापर करण्यात येऊ नये म्हणजेच जेसीबी, पोकलेंड व इत्यादी मोठ्या वाहनाचा यंत्राचा अवजाराचा वापर करुन वाळू उपसा करूनही तसेच बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यात यावे असे आदेश आहे. तसेच वाळू डेपोच्या ऑफीसच्या तिथे वजन काटा लावणे व सी. सी. टीव्ही कॅमेरे लावणे वृक्षारोपण करणे व इतर नियम व अटी बंधन कारक असताना वांगी येथे सध्या चालु असललेल्या वाळूच्या डेपोच्या तिथे शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन न करता ठेकेदार स्वतः ची मनमानी करुन मोठ्या प्रमाणात पोकलैंड व इतर मोठ्या यंत्राचा वापर करुन मोठया प्रमाणात वाळू उपसा करुन शासनाचा महसुल बुडवत आहे. व मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत  असल्याने ह्या ठिकाणी वाळू शिल्लक न राहिल्याने शेतकरयांना शेतपिकासाठी व जनावरांनसाठी पाणी शिल्लक राहणार नाही व शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. आता सध्या पावसाळा चालु असताना देखील पाऊस नाही. अत्ताच दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. तर या अशा बे हिसाब वाळू उपसा केल्याने नदीच्या पाण्याच्या भरवशावर जे शेतकरी आहे त्यांना येत्या काळामध्ये पाण्याचे संकट येणार आहे व तेसच नायगाव गोवर्धन या ठिकारी असलेले वाळू डेपो याच ठेकेदाराचे आहे. सगळ्या वाळू डेपो कोणाच्या आशिर्वादाने एकच ठेकेदाराला मिळत आहे. याचा ही शोध शासनाने व अधिकार्‍याने लावावे. तसेच गोवर्धन येते असलेल्या वाळू डेपो येथे वाळू डेपो चालु झाल्या पासून ते आता पर्यंत वजन काटा नाही. म्हणजे आतापर्यंत वाळू वजन न करता ठेकेदारांनी वाळू वाहतूक केली आहे गाड्यांमध्ये नियमापेक्षा जास्त वाढवून शासनाची फसवणूक केली आहे तसेच शासनाने ठरवून दिलेल्या गट नंबर येथून मोजकेच वाळू उचलण्यात आले इतर ठिकाणाहून जास्त वाळू उचलण्यात आली आहे तसेच शासनाच्या नियम व अटी ठेकेदाराने पायदळी तुडवले आहे याचं ठेकेदाराला वांगी येथे डेपो का देण्यात आला. वांगी येथे चालु असलेल्या वाळू डेपो येथील देखील शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन करताना संबंधीत ठेकेदार दिसत नाही. अशा मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर त्वरीत कायदेशीर गुन्हा दाखल करुन शासनाचे फसवणूक केल्याने यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी व नायगाव गोवर्धन वांगी येथे ज्या गट नंबर मधून वाळू उपसा करण्याचे शासनाने ठेका दिला आहे त्या गट नंबर मधून किती वाळू उपसा झाला व शासनाला किती हिशोब दिला तसेच डेपोत किती वाळू शिल्लक आहे किती विकल्या गेले त्या सर्व वाळूची मोजमाप करण्यात यावी व सखोल चौकशी करण्यात यावी

आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या तीन ते चार दिवसांमध्ये संबंधित वाळू गटाची व वाळू डेपोच्या ठिकाणाची मोजमाप करून व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई न झाल्यास तहसीलदार व प्रांताधिकारी देखील या वाळू चोरीमध्ये सामील आहे असे समजून शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तसेच शासनाची महसूल बुडवत असल्याने या सर्वांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर जिल्ह्याचे महसूल मंत्री श्री विखे पाटील साहेब यांच्या घरासमोर न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल आंदोलना प्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास तहसीलदार प्रांत व जिल्हाधिकारी साहेब जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले

याप्रसंगी मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवतर तालुकाध्यक्ष सतीश कुदळे शहराध्यक्ष विलास पाटणी शहर सरचिटणीस नितीन जाधव शहर उपाध्यक्ष मनोहर बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नईम पठाण यांच्या बंगल्यावर रात्री दरोडा पडला असुन दरोडेखोरांनी खिडकीला असणाऱ्या पडद्याने गळा आवळून नईम पठाण याचा खुन केला असुन त्यांची पत्नी बुशरा पठाण या गंभीर जखमी आहेत         या बाबत समजलेली  हकीकत अशी की नईम पठाण हे व्यवसायीक असुन एकलहरै शिवारात बेलापुर उक्कलगाव रस्त्यालगतच त्यांचा बंगला आहे .त्या बंगल्यात नईम त्याची पत्नी बुशराबी हे दोन मुलासह रहात होते  रात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान चार दरोडेखोर पाठीमागील दरवाजातुन घरात शिरले त्यात एक महीलाही होती त्या वेळी नईम पठाण याने  प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी खिडकीला असणाऱ्या परद्याचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला त्यातच त्याचा मृत्यू झाला .पत्नी बुशराबी हीलाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली त्याही गंभीर जखमी झाल्या घरातील पाच ते सहा लाख रुपयाची रोकड घेवुन दरोडेखोर पसार झाले .बुशराबी पठाण या शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी वडील अनवर जहागीरदार यांना फोन केला एकलहरे गावचे सरपंच रीजवाना अनिस शेख यांचे पती अनिस जहागीरदार व अनवर जहागीरदार हे तातडीने घटनास्थळी आले त्या वेळी नईम पठाण हा मयत झालेला आढळला तसेच बुशराबी यां गंभीर जखमी झालेल्या होत्या त्यांना तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे हलविण्यात आले अनिस जहागीरदार यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे  संदेश देवुन सर्वांना जागृक केले या बाबत बेलापुर पोलीसांना माहीती समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधीकारी बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे पी एस आय सुरेखा देवरे मँडम हे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाली अहमदनगर गुन्हा अन्वेषणची टीम देखील गावात दाखल झाली ठसे तज्ञ तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते श्वान बंगल्याभोवतीच घुटमळले बेलापुर उक्कलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे असल्यामुळे आरोपी लवकर हाती लागण्याची दाट शक्यता असुन घटनेच्या कालावधीत एक स्वीप्ट कार या रस्त्याने गेल्याचे आढळून आले असुन अहमदनगर गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीकारी बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत

कोपरगाव (प्रतिनिधी):हिंदी दिनाचे औचित्य साधून सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव येथे दिनांक १४ सप्टेंबर रोजी पद्मभूषण श्री करमसी भाई  सोमैया राज्यस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांमध्ये निपुण वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे,त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा व त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे व प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य अवगत व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर स्पर्धेत राज्यातील २६ शाळेतील ५२ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर करून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेमध्ये श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचे कु.श्रुती पिंपरकर आणि कु. तनिष्क निकम या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाने उपस्थित सर्वांची मने जिंकून या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून

रोख रक्कम ७०००/ रुपये,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मानकरी ठरले.सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले  डॉ.श्री.नितीन जैन (प्राचार्य राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज कोकमठाण) यांची उपस्थिती लाभली.तसेच

बक्षीस वितरण समारंभासाठी 

डॉ.सौ.सुनिता पारे (प्राचार्या सोमैया विद्यामंदिर,साकरवाडी) यांनी उपस्थिती दर्शवून सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.राजेंद्र सांगळे स्पर्धेसाठी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मा.प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले होते.श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचे कुमारी श्रुती पिंपरकर व कुमार तनिष्क निकम तसेच सर्व यशस्वी स्पर्धकांचे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री.सुहास गोडगे व इतर सदस्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

      

*स्पर्धेचा अंतिम निकाल*

*प्रथम पारितोषिक*

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव.

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम ७,०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

*द्वितीय पारितोषिक*

श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन चे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडियम स्कूल नगर.

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम ५,०००/ हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

*तृतीय पारितोषिक*

मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल,अकोले.

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम ३,०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

*उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

श्रीराम अकॅडमी,श्रीरामपूर

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम १०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

*उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,लोणी खुर्द.

बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम १०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

श्रीरामपुर:-दिनांक 09/09/2023 रोजी दुपारी 12/00 वा. चे सुमारास फिर्यादी राहुल जुम्मन खंडारे, वय 30 वर्षे, रा. गोंधवणी रोड, वार्ड नं. 01, श्रीरामपूर, हे त्यांच्यी मोपेड मोटारसायकल बर्ग मॅन स्ट्रीट, बी. टी. सुझुकी, तिचा नंबर एम.एच.17,सी.यु.2861 असा असलेली, यावर त्यांचे आजारी आईला औषधउपचाराकरीता जोंधळे हॉस्पीटल, वार्ड नं. 01, मदर टेरेसा चौक शेजारी, श्रीरामपूर, येथे घेवुन गेले होते. हॉस्पीटल बाहेर मोटारसायकल लावुन हॉस्पीटल मध्ये औषधउपचाकरीता गेले व थोडयावेळाने बाहेर आले तेव्हा त्यांची मोटारसायकल त्यांना दिसली नाही, त्यांनी आजुबाजुला चौकशी केली असता व शोध घेतला असता ती मिळुन आली नाही तेव्हा त्यांची खात्री झाली की त्यांची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीच्या इराद्याने स्वतःताच्या आर्थिक फायदयाकरीता चोरुन नेली आहे वगैरेच्या तक्रारी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 973/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा दाखल होताच मा. पोनि हर्षवर्धन गवळी सो. यांनी तपास पथकास सदर गाडीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे 1) अरबाज आयुब पठाण, वय 20 वर्षे, रा. हुसेननगर, वार्ड नं. 01, श्रीरामपूर 2) आदम युसुफ शहा, वय 27 वर्षे, रा. काझीबाबा रोड, बाबरपुरा चौक, वार्ड न. 02, श्रीरामपूर यांनी दोघांनी मिळुन केल्याचे निष्पण झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदरचे आरोपी हे चोरी केलेले मोटारसायकलवर बसुन कर्मवीर चौक, वार्ड नं. 01, श्रीरामपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथक हे तात्काळ कर्मवीर चौकात सापळा लावुन थांबले असता सदरचे आरोपी कर्मवीर चौकात येताचा त्यांना थांबण्यास सांगितले असता ते तसेच वेगात बोरावके कॉलेज रोडने पळुन जावु लागले असता तपास पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यांना नविन प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथे पकडले व त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यानी वरील प्रमाणे सांगुन सदर गाडीबाबत चौकशी केली असता सदरची गाडी हि जोंधळे हॉस्पीटल, वार्ड नं. 01, मदर टेरेसा चौक शेजारी, श्रीरामपूर, येथुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडुन सदरची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली व सदरच्या गुन्हात तात्काळ अटक करण्यात आली. अटक कालावधीत त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानी खालील नमुद प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडुन खालील नमुद वर्णनाच्या चोरी केलेल्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या त्याचे वर्णन खालील प्रमाणे.

1)85,000/- रु. किं. ची. बर्ग मॅन स्ट्रीट, बी.टी.सुझुकी कंपनीची, तिचा नंबर एम.एच.17, सी.यु. 2861 असा, तिचा चेसी नंबर MB8EA11DKN8363835 असा असलेली, श्रीरामपूर शहर. पो.स्टे. गुरनं. 973/2023 भादंवि कलम 379 मध्ये चोरी गेलेली जु.वा. किं.अं.

2)80,000/- रु.कि.ची बजाज डिस्कव्हर कंपनीची मोटारसायक तिचा चेसी नं.MD2DSPAZZTWH69804

इंजि. नं. JBMBTH27793 असा असलेली श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं. 916/2023 भादंवि कलम 379 मध्ये चोरी गेलेली जु.वा. किं. अं.

3)50,000/- रु.कि.ची होडा कंपनीची पांढरे रंगाची मेस्ट्रो मॉडेलची मोपेड गाडी रजि.नं.एम.एच.17.ए.वाय. 1901 तिचा चेसीस नंबर MBLJF32ABDGH13373 व इंजि.नं. JF32AADGH13170 असा असेलेली श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं. 683/2023 भादंवि कलम 379 मध्ये चोरी गेलेली जु.वा. कि.अं.

4)60,000/- रु.किं.ची.टी.व्ही.एस. स्कुटी पेप मोपेड तिचा नं.एम.एच.17, सी.डब्ल्यु. 3170, इंजि. नं. AK1FN2900278 असा असलेली जु.वा.कि.अं.राहता पो.स्टे. गुरनं. 403/2023 भादंवि 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरी गेलेली. 5)70,000/- रु. किं.ची.सुझुकी मोटारसायकल चेसी.नं. M1101F043896 इंजि.नं.M1101M045184 असा असलेली जु.वा.किं.अं.

3,45,000/- एकुण

वरील वर्णनाच्या व किंमतीच्या मोटारसायकल सदर आरोपीकडुन जप्त करण्यात आल्या आहेत व सदर दोन्ही आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली व सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे गावच्या सरपंच पदी सौ सविता शहाजी वडीतके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .                                               श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीचे सरपंच  निखील वडीतके यांनी आपल्या पदाचा राजीनामा रोकडेश्वर मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे यांच्याकडे दिला होता .त्यांनी तो तहसीलदार मिलींद वाघ यांच्याकडे सुपुर्त केला त्यांच्या सुचनेनुसार मांडवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीकरीता बैठक बोलविण्यात आली होती या वेळी सरपंच पदाकरीता सौ सविता शहाजी वडीतके यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधीकारी तथा मंडलाधिकारी बी के मंडलीक यांनी जाहीर केले या वेळी उक्कलगावचे कामगार तलाठी इलीयास ईनामदार मांडवेचे तलाठी हिमालय डमाळे ग्रामसेवक ताराचंद गाढे तसेच रोकडेश्वर मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे सदस्य पुष्पाताई चितळकर कल्पना गेठे सुमन जांभुळकर गोविंद तांबे गोकुळ पवार अशोक विटनोर चेतन वडीतके जालींदर तांबे संपतराव चितळकर शहाजी वडीतके दगडू पावले बापुसाहेब काबुडके बाळासाहेब जांभुळकर अतुल तांबे पत्रकार देविदास देसाई भरत थोरात संदीप शेरमाळे मच्छिंद्र पारखे डाँक्टर उद्धव जोशी कृष्णा दळे बबनराव वाडीतके केशव दळवी भाऊसाहेब चितळकर संतोष चितळकर आशोक झाडगे आदिसह मांडवे तांबेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून बी के मडंलीक यांनी काम पाहीले त्यांना ग्रामविकास अधीकारी ताराचंद गाढे यांनी सहकार्य केले निवडीनंतर फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली  शेवटी शहाजी वडीतके यांनी सर्वांचे आभार मानले

बेलापूरः(प्रतिनिधी  )-मागील वीस वर्षाच्या कार्यकाळात ,सगळेच अलबेल होते तर जनतेने तुम्हाला का नाकारले.या कारभाराच्या विरोधात आवाज उठवून जे निवडून आले तेच आता सरपंच पद न मिळाल्याच्या पोटदुखीतून आरोप,व्हिडीओ क्लिप्स टाकून राजकीय स्टंटबाजी करीत असल्याची टिका सामाजिक कार्यकर्ते विजय पोपटराव अमोलिक यांनी केली आहे.                                                                                            प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात.विजय अमोलीक यांनी पुढे म्हटले आहे  की,या महाशयाच्या विजयात आमच्या समाजाचा मोलाचा वाटा आहे.असे असताना हे सदस्य ज्यांचेविरुध्द आरोप करुन गावाकरी मंडळाच्या शिदोरीवर निवडून आले.यांच्या थकीत घरपट्ट्या देखील गावकरी मंडळाने भरल्या अन तुमच्यात  नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून या ज्या विरोधकांविरुध्द निवडून आले  स्वार्थापोटी त्याच विरोधी गटात सामिल झाले आहे.स्वतः वाळू तस्करीत सहभाग असणारे हे महाशय सावपणाचा आव आणून ग्रामपंचायत प्रशासनावर खोटेनाटे आरोप करुन प्रसिध्दीचा खटाटोप करीत आहेत. स्वतः अवैध धंदे करायचे आणि वर नाकाने कांदे सोलून फुशारक्या मारायच्या पण जनता एवढी खूळी नाही.ही हरिहराची नगरी आहे.इथे अनैतिकतेला थारा नसल्याचेही अमोलिक यांनी म्हटले आहे.                  गेल्या वीस वर्षे यांची सत्ता होती. त्यां काळातही पाईप लाईन चोकअपची समस्या अनेकदा आली होती.ही तांत्रिक अडचण असल्याने सर्वांनी समजून घेवून सहकार्य केले होते.आताही पाईपलाईन कोणाच्यातरी खोडसाळपणामुळे चोकअप झालेली आहे.मागेही गोधड्या टाकून पाईपलाईन चोकअपचा खोडसाळपणा विघ्नसंतोषिंनी केला होता.चोकअप सापडले पण आठ चारीला पाणी असल्याने चोकअप काढण्यात अडचण येत आहे.ही अडचण तात्पुरती असून दोन तीन दिवसात चारी बंद होताच चोकअप निघेल असा खुलासा ग्रामपंचायत पदाधिका-यांनी केलेला आहे.अशावेळी सामंजस्य व सहकार्य करणे गरजेचे असताना अडचणीचे भांडवल करुन टिकाटिपणी केली जात आहे.खरे तर बेलापुर गावाला १२६ कोटीची पाणीपुरवठा योजना,साठवण तलावासाठी आठ एकर जमिन मोफत मिळवून गावकरी मंडळाने ऐतिहासिक काम केले आहे,त्याबद्दल अभिनंदन करायचे सोडून केवळ विरोधासाठी विरोध केला जात असल्याचा आरोपही विजय अमोलिक यांनी केला आहे.

बेलापूर:(प्रतिनिधी  )--श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने योग्य पद्धतीने करण्यात येणार असलेल्या विकास कामांना आपला विरोध नसून चुकीच्या व हुकूमशाही पद्धतीने होणाऱ्या कारभाराला विरोध आहे व यापुढेही राहील.महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विखे गटाच्या सर्व संचालकांच्या साथीने बाजार समितीत शेतकरी, सभासद,व्यापारी,हमाल,मापाडी यांच्या हिताकरीता हे काम यापुढेही सुरूच राहील अशी प्रतिक्रिया श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.

बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी नुकत्याच केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक  खंडागळे म्हणाले की,बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार येथे शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी नाष्टा व जेवणाची व्यवस्था होण्यासाठी कॅन्टीन पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. व्यापारी शेड हॉलची दुरुस्ती देखील आवश्यक आहे.बायपास व नगर रोड येथील गाळ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे तसेच उपबाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालयाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून संस्थेची आर्थिक परिस्थिती नसताना स्वतःच्या फायद्यासाठी मलाईदार कामे हाती घेतली जात आहेत.एकाच मिटिंग मध्ये १६-१७ मलाईदार विषय बहुमताच्या जोरावर कुठलीही चर्चा न करता मंजूर करून घेतले जातात याची घाई कशासाठी? असा प्रश्न पडतो. सध्या ही सर्व विकास कामे करण्याची संस्थेची आर्थिक परिस्थिती नाही.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने येणाऱ्या काळात संस्थेचे उत्पन्न कमी होणार आहे.याआधी संस्थेने विकास कामांसाठी शासनाकडून कर्ज घेतलेले आहे ते कर्ज अद्याप फिटलेले नसताना पुन्हा कर्ज काढून विकास कामे केली जाणार आहेत याचा बोजा शेतकरी,सभासद,व्यापारी यांच्यावरच पडणार आहे.मग रीन काढून सन करण्याची ही पद्धत आहे  अशा परिस्थिती हुकूमशाही पद्धतीने होत असलेल्या चुकीच्या कामकाजाला आपला विरोध आहे. बेलापूर येथील व्यापारी संकुलास स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती तसेच काही मंडळींनी माजी सरपंच कै.मुरलीशेठ खटोड यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी संकुलास नाव देण्याचा ठराव याआधीच झाला आहे असे सभापती यांनी गावकऱ्यांना खोटे सांगितले तेव्हा गावची बांधिलकी कुठे गेली होती.सभापती-उपसभापती बेलापूर गावचे आहेत याची उपरती आजच कशी झाली? उपसभापतीला तीन महिने तुटक्या खुर्चीवर बसवले तेव्हा उपसभापती गावातीलच आहे याचे भान राहिले नव्हते का?उपसभापती गावातीलच आहेत तर मग संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जाहिराती मध्ये उपसभापती चे नाव का टाकण्यात येत नाही? केवळ उपसभापती नामदार विखे पाटील गटाचे आहे यामुळेच राजकीय सूडबुद्धीने उपसभापतीला वेगळी वागणूक दिली जात आहे ना? असा सवाल खंडागळे यांनी केला.आहे बेलापूर सोसायटीच्या मागील काळातील कामकाजाची सहकार खात्यामार्फत चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी रिक्षा भरून कागदपत्रे सील करून नेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ग्रामस्थांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याची केविलवाणी धडपड सभापती सुधीर नवले यांच्याकडून सुरू आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील,खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्यामुळे बेलापूर-ऐनतपूर गावाला १२६ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली.चार कोटी किमतीची शेती महामंडळाची जागा  साठवण तलावासाठी विनामुल्य मिळाली.असे ऐतिहासिक काम सुरू असताना त्याचे शब्दाने ही कौतुक केले नाही. गावच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची भाषा करणाऱ्यांनी गावच्या पाणीपुरवठा योजनेला कुठे व कसा विरोध केला, झेंडा चौक सुशोभीकरनाला,हरिहर नगर(रामगड)येथील हनुमान मंदिर कामाला तसेच ऐनतपूर येथील बिरोबा मंदिर कामाला कसा विरोध केला हे योग्यवेळी जनतेपुढे आणू असे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी शेवटी म्हटले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर गावाला प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती पद उपसभापती पद तसेच सचिव पदही मिळालेले असुन गावात विकास कामे होणे अपेक्षित असताना काही मंडळी विकासकामात खोडा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी केला आहे.            प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सभापती सुधीर नवले यांनी पुढे म्हटले आहे की गावातील व्यापारी व शेतकरी बांधवांच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार बाजार समीतीच्या पहील्याच बैठकीत बेलापुर उपबाजार समीतीच्या आवारातील काँक्रीटीकरणाची मंजुरी घेतली तसेच मुख्य बाजार समीती श्रीरामपुर व उपबाजार समीती टाकळीभान येथील कामाचेही प्रस्ताव पणन संचालक यांच्याकडे मंजुरीसाठी तयार केलेले आहेत मात्र बाजार समीतीचे उपसभापती व गावाचे उपसरपंच अभिषेक खंडागळे हे केवळ राजकीय ताकदीचा वापर करुन दबाव तंत्राचा अवलंब करुन विकास कामात खिळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत .त्यांनी अन्य दोन संचालक नानासाहेब पवार व सुनिल शिंदे यांच्या स्वाक्षरी घेवुन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली असुन त्यात या विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देवु नये असे म्हटले आहे . खरे तर गावाच्या विकासात राजकीय जोडे बाजुला ठेवुन एकदिलाने काम करणे अपेक्षित होते .परंतु केवळ मोठमोठी भाषणबाजी करायची लोकांची दिशाभूल करायची ही यांच्या कामाची पद्धत आहे हे साऱ्या गावाला जाँगींग ट्रँकच्या कामातुन माहीत झाले आहे जाँगींग ट्रँकचा फार मोठा गवगवा झाला मोठ्या प्रमाणात निधीही खर्ग झाला अन त्या जाँगींग ट्रँकचा जोकींग ट्रँक झाला आपण बोगस व चुकीची कामे करायची अन दुसऱ्याच्या कामात तंगडी अडवायची ही यांची पद्धत आहे यांच्या ओठात एक अन पोटात एक आहे .केवळ राजकीय कावीळ झाल्याने त्यांच्या असणाऱ्या महाभागाच्या सांगण्यावरुनच विकास कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही नवले यांनी शेवटी म्हटले आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी  )- श्रीरामपूर तालुक्यात चालविल्या जाणाऱ्या हाँटेल खानावळ या ठिकाणी खुलेआम अनाधिकृत दारु विक्री सुरु असुन अशा अनाधिकृत दारु विक्री ठिकाणावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपुर तालुका लिकर आसोसिएशनचे सल्लागार सुनिल मुथा यांनी केली आहे .या बाबत सुनिल मुथा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की श्रीरामपुर तालुक्यात सुरु असणारे हाँटेल खानावळ या ठिकाणी  संबंधित यंञणांशी हातमिळवणी करुन बेकायदेशीर दारु विक्री होत असून यामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसूल बुडत आहे.तसेच अधिकृत परवाना धारकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे  संबंधित प्रकरणी परवानाधारक हाॕटेल चालकांचे शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून   सदर प्रकार त्यांच्या निदर्शानास आणून देवून  याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे  तालुका लिकर असोसिएशनचे सल्लागार सुनिल मुथा यांनी सांगीतले.                                                            श्री.मुथा म्हणाले की,तालुक्यात सुमारे दिडशे हाॕटेल्स खाणावळीच्या नावाखाली सुरु आहेत.या पैकी बहुतांश हॉटेल व खानावळी मधून संबंधित शासन यंञणेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन व आर्थिक तडजोड करुन राजरोसपणे अनधिकृत दारु विक्री  केली जात आहे.असे असताना संबंधित शासकीय यंञणा या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे.                                                  ,सदर दारु हि दमन येथून अथवा वाईन शॉप मधून आणून बेकायदेशीररित्या  विकली जाते.यातील बहुतांश दारु ही बनावट असते.हा ग्राहकांच्या जीविताशी खेळ आहे.यामुळे पांगरमल प्रकरणाची पुनरावृत्ती  होवू शकते.तसेच अशा दारु विक्रीमुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. यामुळे अधिकृत परवानाधारक परमीट हाॕटेल व्यवसायिकांचे व्यवसाय देखील  अडचणीत आले  आहेत.परवानाधारक कोट्यावधीचा महसूल शासनाला देतात.असे असताना आर्थिक हितसंबंधांमुळे  या महसुलावर पाणी फिरत आहे.हा प्रकार गंभीर असून शासनाचया संबंधित यंञणांनी व  अधिका-यांनी याची दखल घेवून तात्काळ कडक कारवाई करावी.यासंदर्भात  लिकर असोसिएशनचे प्रतिनिधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटुन सविस्तर माहीती देणार आहेत.या तक्रारीची दखल घेवून कारवाई करावी व अनाधीकृत विनापरवाना चाललेली दारु विक्री तातडीने बंद करावी अशा प्रकारे विना परवाना दारु विक्री करणारी ठिकाणे देखील संबधीत अधीकाऱ्यांना माहीती आहेत तरी या प्रकाराला आळा घालावा. अन्यथा  वरिष्ठांना नावानिशी माहिती देवून कारवाई करण्यास भाग पाडले जाईल असा इशारा मुथा यांनी दिला आहे.

जिल्ह्यात बेस्ट डिटेक्शन केल्या बद्दल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व शहर पोलीस स्टेशन च्या सर्व अधिकारी .DB स्टाफ व अंमलदार ह्यांचे अभिनंदन ,सर्वांच्या वतीने मा विशेष पोलीस महानिरीक्षक सो श्री बी.जी.शेखर पाटील ह्यांचे वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले आहे सर्वांचे हार्दिक अभिनंदन 

श्रीरामपूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र रोलबॉल संघटना व अहमदनगर जिल्हा रोलबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने दि पॉल इंग्लिश मीडियम स्कूल श्रीरामपूर येथे १७ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर रोलबॉल स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक ९ व १० डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा रोलबॉल संघटनेचे सचिव श्री प्रदीप पाटोळे यांनी दिली.या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा ग्रामीण संघाची निवड करण्यात आली असून श्रीरामपूरचा धर्मेश आदमाने याची संघाच्या कर्णधारपदी तर श्री नितीन गायधने यांची संघ प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संघामध्ये श्रीरामपूरचे ९ खेळाडू खेळणार आहेत.निवड झालेल्या संघाचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,जन्मजय टेकावडे, प्राचार्य डॉ योगेश पुंड,श्री हेमंत सोळंकी,श्री विठ्ठलराव दांगट तसेच सर्व शिक्षक-शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

निवड झालेला संघ पुढील प्रमाणे धर्मेश आदमाने (कर्णधार),कबीर चौदंते (उप कर्णधार), साई फरगडे,सार्थक सोलंकी,प्रथमेश जैत, आर्यन वायाल, प्रथमेश दहातोंडे, विराज पटारे व साई गाडे,श्री नितीन गायधने (प्रशिक्षक) तर प्रदीप पाटोळे (संघ व्यवस्थापक).


फोटो: *१७ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर रोलबॉल स्पर्धेसाठी निवडलेल्या संघासमवेत श्री हेमंत सोळंकी,श्री विठ्ठलराव दांगट, क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे, रोलबॉल प्रशिक्षक श्री नितीन गायधने!*

प्रतिनिधी-आज दि.  06/09/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना बाभळेश्वर येथील  हॉटेल साईप्रसाद येथे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन एका पिडीत परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली आहे आणि दिपक उर्फ बंटी बाबासाहेब थोरात रा. कोल्हार बुद्रुक तालुका राहाता या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे बाभळेश्वर परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

*सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI गुलाबराव पाटील,API युवराज आठरे,PSI योगेश शिंदे, HC इरफान शेख, PN अशोक शिंदे,PN कृष्णा कुऱ्हे, PN श्याम जाधव,PC दिनेश कांबळे, LPC नागरे, चालक PC नर्हे, HC आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.*

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन छेड काढणारास जमावाकडून बेदम चोप देवुन पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले असुन जैनुद्दीन मन्सुरअली सय्यद व वाहीद शेख सह इतर आरोपी विरुद्ध भादवि कलम ३५४ ३५४ड सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .                                  या बाबत मिळालेली माहीती आशी की बेलापुर महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस जैनुद्दीन सय्यद  व वाहीद शेख हे सतत त्रास देत होते दोन दिवसापूर्वी यांनी त्या मुलीस बेलापुरच्या बाजारपेठेत कट मारला ही बाब काँलेजच्या प्राध्यापकांना सांगितली परंतु त्यांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही त्याचा परिणामआरोपींची हिम्मत वाढली त्यांनी त्या मुलीला वर्गात एकटे पाहुन तिचा हात धरला व तु मला आवडतेस असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यामुळे मुलीने हा प्रकार घरी जावुन पालकांना सांगीतला काही वेळातच ही चर्चा गावभर पसरली मुलीचे पालक व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला त्यानंतर जमाव पोलीस स्टेशनला आला पतितपावन संघटनेचे सुनिल मुथा माजी आमदार भाऊसाहेब कांबळे  जि प सदस्य शरद नवले पत्रकार देविदास देसाई  उपसरपंच अभिषेक खंडागळे रविंद्र खटोड पप्पु कुलथे डाँक्टर प्रशांत खैरनार किशोर फुणगे  मुस्ताक शेख संजय छल्लारे अजय डाकले गणेश मुंडलीक प्रसाद खरात रत्नेश गुलदगड आदिसह अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते  पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होईपर्यत तळ ठोकुन होते अखेर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे स्वतः बेलापुर पोलीस स्टेशन येथे आले व या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालुन छेडछाडीच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असे अश्वासन दिले या वेळी पोलीसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत कारवाई केली असुन पोलीसानी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुनिल मुथा यांनी दिला या वेळी ते आरोपी बेलापुर ज्यूनियर काँलेज मध्ये शिकत असुन त्याला काँलेजमधुन काढुन टाकण्यात यावे अशी मागणी सर्वांनी केली    या बाबत मुलीने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, जे. टी. एस. ज्युनियर कॉलेज, बेलापुर बु// परीसरात वेळोवेळी माझ्या कॉलेजमधील 12 वी कला शाखेतील विद्यार्थी जैनुद्दीन शेख   याने माझा पाठलाग केला तसेच परीक्षा हॉलमध्ये मी एकटी असताना माझा हात धरुन माझा विनयभंग केला तसेच मी नकार दिला असता, मला वाईट वाईट शिवीगाळ करुन धमकी दिली  वगैरे म।।चे फिर्यादीवरुन गु.रजि नं.962/2023 ipc कलम  354,354(ड),504,506, सह पोक्सो 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनी जीवन बोरसे हे करत आहे

श्रीरामपूर : रात्री ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास, श्रीरामपूर बस स्टँड समोरील लोकसेवा हॉटेल बाहेर,अचानक पणे काही युवकांमध्ये दांड्या काठ्या खाली तुंबड हाणामारी सुरू झाल्याने एकाच धावपळ उडाली. ज्यात दत्तनगर येथील सुनील कर्पे व वैजापूर तालुक्यातील शिरसगाव येथील सतीश धात्रक या दोन्ही युवकांना बेदम मारहाण करण्यात आल्याने, दोन्ही युवक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्याने. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना केले. पोलीस घटनास्थळी पोहचले असता.२ युवक जखमी अवस्थेत आढळून आल्याने, पोलिसांनी जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी सतीश धात्रक याची प्रकृती खालवल्याने त्यास पुढील उपचारासाठी प्रवरानगर लोणी येथे हलविण्यात आले असून. सुनील कर्पे यास अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून, २ आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सदरचा वाद हा नेमकी कशामुळे झाला, याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसून. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बेलापुर (प्रतिनिधी )- जिद्द ,चिकाटी व प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असेल तर कुठलेही पद मिळवीणे अवघड नाही ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन करत असुन शिवचंद्रपाल जाधव याने मिळवीलेले यश निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरणारे असल्याचे मत माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी व्यक्त केले                              संक्रांपुर तालुका राहुरी या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवचंद्रपाल बाळासाहेब जाधव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत  घवघवीत यश संपादन करुन कृषी मंडल अधीकारी हे पद मिळविले त्याबद्दल अशोक कानडे व हर्षदादा तनपुरे यांच्या शुभहस्ते संक्रेश्वर मंदिर संक्रांपुर येथे त्याचा सत्कार आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प रामदास महाराज दाते हे होते . या वेळी बोलताना हर्षदादा तनपुरे म्हणाले की नवनविन तंत्रज्ञानामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या क्षेत्रात संधी प्राप्त  होत आहे .एका शेतकरी कुटुंबातील मुलगा कृषी अधीकारी झाला याचा अभिमान आहे कारण शेतकऱ्यांच्या व्यथा या शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील असलेल्या सदस्यांनाच ठाऊक असतात या वर्षी निसर्गाने पाठ फिरविल्यामुळे सर्व पिके डोळ्यादेखत होपळली ,करपली जात आहेत .शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे ,जाधव परिवारातील शिवचंद्रपाल याने जाधव परिवाराबरोबरच गावाचे व तालुक्याचेही नाव उज्वल केले असेही तनपुरे म्हणाले या वेळी कृषी मंडल अधीकारी पद मिळवीलेले शिवचंद्रपाल जाधव व ह भ प रामदास  महाराज दाते यांनीही मनोगत व्यक्त केले  या वेळी शिवचंद्रपाल याचे आई वडील सौ अनिता जाधव व बाळासाहेब जाधव तसेच चुलते नारायण जाधव ,दिलीप जाधव बापुराव जगताप  याचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला .या वेळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार संक्रांपुरचे सरपंच रामदास पांढरे ,कुंडलीक खेमनर ,राजीव बोरावके , ऊक्कलगाव सोसायटीचे चेअरमन पुरुषोत्तम थोरात ,धनंजय होन ,जालींदर चव्हाण ,लक्ष्मण  चव्हाण ,रमेश सालबंदे ,पांडूरंग जगताप ,साहेबराव पांढरे ,रोहीदास खपके ,दादा पाटील जगताप ,अर्जुन होन किशोरा वर्पे कामगार तलाठी जालींदर पाखरे ग्रामसेवक तुषार रोहकले आदिसह मान्यवर उपस्थित  होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव यांनी आभार मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )- जिवन जगताना अध्यात्माची कास धरा अन आनंदी रहा अध्यात्मासारखा आनंद ,सुख, शांती अन तृप्ती कोठेच मिळणार नाही त्यामुळे भौतिक सुखाच्या मागे धावुन दुःख विकत घेवू नका. आनंदी जगा, अन इतरांनाही आनंदी ठेवा. असा उपदेश सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरी महाराज यांनी दिला.             जय संतोषी माता जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता महंत रामगीरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. त्या वेळी भाविकांना उपदेश करताना महंत रामगीरी महाराज पुढे म्हणाले की आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील हसू हरपले आहे .हसण्याकरीता लोक हास्यक्लब स्थापन करतात हे दुर्दैव आहे भौतिक सुखाचा त्याग करा धर्माची कास धरा आपल्या परंपरा विसरु नका .माता- पित्याची, जेष्ठांची सेवा करा. संत महंतानी सांगीतल्या प्रमाणे आपले आचरण शुद्ध ठेवा .कुणाशीही कपटनिती ठेवुन वागु नका सत्य बोला धर्मानुसार आचरण ठेवा.  जय संतोषी माता जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजीत पारायण सोहळ्यात सर्वानी भजन किर्तन हरिपाठ याचा आनंद घेतला आहे .आज या साप्ताहाची सांगता आहे .काल्याच्या किर्तनाचा आनंद हा या भूतलावरच घेता येतो त्यामुळे देवादिकांनी देखील अवतार घेवुन काल्याच्या किर्तनाचा लाभ घेतला असल्याचेही महंत रामगीरी महाराज म्हणाले प्रारंभी जय संतोषी मातेच्या प्रतिमेची व ज्ञानेश्वरी ग्रंथाची गावातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणूकीत महीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सप्ताह काळात ह भ प संदीप महाराज गुंजाळ तुकाराम महाराज बनकर सचिन महाराज मापारी पांडूरंग महाराज पठारे विजय महाराज गुंजाळ संदीपान महाराज गुंजाळ आदिंनी किर्तनसेवा दिली पारायणाचे नेतृत्व मधुकर महाराज कलगड विजय महाराज गुंजाळ तुकाराम महाराज बनकर संदीप महाराज बनकरव सरला बेटच्या विद्यार्थ्यांंनी केले होते मृदुंगवादक म्हणून सचिन महाराज मापारी चंद्रकांत महाराज डेंगळे किरण महाराज शास्री यांनी काम पाहीले हरिहर भजनी मंडळ विठ्ठल भजनी मंडळ हरिहर महीला भजनी मंडळ सावता भजनी मंडळ आदिसह परिसरातील भजनी मंडळांनी सहभाग नोदविला शेवटी महाप्रसादाने काल्याची सांगता झाली,जय संतोषी माता प्रतिष्ठाण व ठोंबरे परिवाराच्या वतीने आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावातील दोन कुटुंबात गेल्या अनेक वर्षापासून असणारा वाद तंटामूक्त गाव समीतीच्या माध्यमातून मिटविण्यात आला असुन न्यायालयीन लढ्याकरीता होणारा खर्च हा धार्मिक कार्यासाठी  समाजसेवक व धार्मिक कार्यात सतत पुढाकार घेणारे सुवालाल लुक्कड यांच्याकडे मान्यवरांच्या उपस्थितीत सूपुर्त करण्यात आला .                         बेलापुर मळहद येथील राहणारे संजय दत्तात्रय रासकर व सुरेश खंडू भडके या दोन कुटुंबात जागेवरुन वाद होते अनेक वेळा भांडणे हाणामाऱ्या झाल्या वाद पोलीस स्टेशन नंतर  न्यायालयात गेला दोघांनीही वकीलामार्फत लढा सुरु ठेवला .थोड्याशा जागेकरीता जागेच्या किमतीपेक्षा जास्त खर्च होवुन वेळही वाया जातो व शेजारी राहुन कायम संबध खराब होतात याची जाण दोन्ही कुटुंबाला झाली त्यांनी तंटामूक्त समीतीकडे अर्ज केला जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे पत्रकार देविदास देसाई  यांनी दोन्ही कुटुंबासमवेत बैठक घेतली व आपापसातले वाद आपसात मिटविण्यावर रासकर व भडके कुटुंबीयात एकमत झाले .वाद मिटले त्यानंतर दोन्ही कुटुंब आनंदात घरी गेले घरी गेल्यानंतर दोघांनीही विचार केला आपला वेळही वाचला शिवाय मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंडही बसला असता त्यामुळे आपले विनाकारण खर्च होणारे पैसे धार्मिक कार्याकरीता दिले पाहीजे तशी संकल्पना त्यांनी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना बोलुन दाखवीली त्यानुसार सामाजीक धार्मिक क्षेत्रात अघाडीवर असणारे सुवालाल लुक्कंड यांच्याकडे अकरा हजार रुपये सूपुर्त  करण्यात आले या वेळी संजय रासकर  आशोक भडके जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,प्रविण लुक्कड पोलीस पाटील अशोक प्रधान पत्रकार देविदास देसाई  ,सदस्य मुस्ताक शेख शफीक बागवान एकनाथ उर्फ लहानु नागले  सचिन अमोलीक शफीक आतार आदि उपस्थित  होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget