बेलापुर पोलीसांनी दाखविलेली तत्परता व आमदार कानडे यांनी केलेल्या सहकाऱ्यामुळे शेलार यांना मिळाले जीवदान
बेलापुर (प्रतिनिधी )-गावात कुठलीही घटना घडली तर सर्वात आगोदर धावत येतात ते पोलीस दादा सर्वांच्या मदतीला कायम धावणाऱ्या पोलीस दादाने केलेल्या अचुक उपचारामुळे व आमदार लहु कानडे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नुकताच एका नागरीकाला जीवदान मिळाले असुन आता तो रुग्ण दवाखान्यात व्यवस्थित उपचार घेत आहे . या बाबत घडलेली घटना अशी की बेलापुर येथील साई मंदिरांत आमदार लहु कानडे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाबाबत बैठक बोलविण्यात आली होती या बैठकीस अनेक ग्रामस्थ उपस्थित होते मंदिरात आमदार लहु कानडे हे भाषण करत होते व त्या ठिकाणी तान्हाजी बापुराव शेलार वय ७८ वर्ष हे साई मंदिरांच्या पायरीवर बसले होते त्यांना अचानक हृदय विकाराचा तिव्र झटका आला सर्व जण त्यांच्या भोवती गोळा झाले होते तेथुन काही अंतरावर द्वारकामाई जवळ बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे उभे होते गर्दी कशाची जमा झाली म्हणून पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे त्या ठिकाणी गेले त्या वेळी हरिष पानसंबळ दादा तातडीने पुढे सरसावले त्यानी त्यांचा श्वास पाहीला मानेजवळ बघीतले सर्व शरीर गार पडले होते त्यांनी तातडीने तान्हाजी शेलार यांची छाती दाबली ठरावीक पद्धतीने छाती पंपीग करताच त्यांनी जोराचा श्वास घेतला आमदार लहु कानडे यांनी आपले सुरु असलेले भाषण थांबवुन आपल्या वहानातुन शेलार यांना दवाखान्यात पाठवीले पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तसेच आमदार कानडे यांच्या सहकाऱ्यामुळे शेलार यांना वेळेवर उपचार मिळाले सध्या ते संत लुक हाँस्पीटल येथे उपचार घेत असुन त्यांची प्रकृती सुधारत आहे .या बाबत शेलार परिवाराने आमदार लहु कानडे तसेच बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ नंदु लोखंडे यांना धन्यवाद दिले आहे
Post a Comment