" समग्र क्रांतीचा निरक्षर क्रांतीदुत " प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.


 ( १)    " तेरावे सद्दीची पैगंबरी खुप ! दावीतो प्रमाण कुराणातं !!

               जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

   आनंद वतनी ज्योती म्हणे !! ".  समतेचा पुरस्कार करणारे   "राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले ...

        (२)"  एक ही सफमें खडे हो गयै , मेहमूद और अयाज ...!!

ना कोई बंदा रहा ,ना बंदा नवाज. ..!!! "

जगप्रसिद्ध साहित्यिक व ऊर्दू कवी डॉ.मुहम्मद इक्बाल सहाब..

      इतिहासाच्या कित्येक महान व्यक्तींनी ज्या महामानवाच्या कार्याविषयी , जीवनाविषयी , त्यांच्या  सामाजिक एकता विषयावर , क्रांतिकारक निर्णय विषयी कित्येकदा स्तुती केली ,ज्ञात -अज्ञात पणे आदर्श घेतला व आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा अंगिकार केला , 

 आशा महान महामानवाचा आज जन्मदिवस 

  मी लिहीताना  एक निरक्षर ,अनाथ , विश्व बंधुत्व ,संवेदनशील , समतेचा पुरोगामी प्रेषित मुहम्मद स्व . यांचा उल्लेख करतो.

.त्याचप्रमाणे पुरोगामी विचारांचे धगधगत्या मशाली चे महामानव च करतो .त्या पुरोगामी विचारांनी प्रभावित होऊन कित्येक संत ,पीर , बादशहा ,महान विचारवंत , विद्वान , समाजसुधारक या महात्म्यांनी आप- आपल्या देशात समाजात  ज्ञात , अज्ञात पणे क्रांती घडवून आणली .

              आगदी १५०० वर्षांपूर्वी पारंपरिक  वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक ईश्वरवादाची,  अल्लाहा ची शिकवण देवून , फक्त  "  एकच  अल्लाहा  समस्त ब्रम्हांडाचा नायक  आहे "  .त्या एकाच अल्लाहा ची प्रार्थना करा . व  अल्लाहाची   प्रार्थना करताना अनुयायींना थेट संपर्क साधण्यासाठी कोणत्याही प्रकारे मधे दलाल मुक्त धर्माची संकल्पना मांडली.      सोबतच कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही .

           इस्लामी संस्कृती नुसार कोणत्याही  प्रकारची साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज ठेवली नाही .

कोणी ही व्यक्ती  ती मग शुद्र ही असेल ती सुध्दा  इस्लामी ज्ञान घेवू शकतो , अलिम मौलाना , मुफ्ती , हाफीज ,बनु शकतो ,शिक्षण घेवू शकतो .  ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही  शिकण घेवु शकतात आसा पारंपरिक वाद त्यांनी एकदम नाकारला.  

ज्ञानी माणसांला प्रेषित मुहम्मद स्व.यांनी मोठे स्थान दिले आहे,एक विद्वान एका शहीदांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे ,हा विचार त्यांनीच दिला आहे , ईस्लाम मधे एका शहीदांचे फार मोठं महत्त्व आहे , तरी सुद्धा त्यांनी विद्वानांना जास्त महत्त्व दिले ,मग ते कोणत्याही प्रकारचे  उदा. ज्ञान असणारा व्यक्ती म्हणजेच विद्वान फक्त धार्मिक ज्ञान असणं च हे ज्ञान ईस्लाम मानत नाही तर उदा. अर्थ शास्त्रात , रसायनशास्त्र , वैद्यकीय शास्त्रात, क्रीडा क्षेत्रात , लष्कर क्षेत्रात आशा विविध क्षेत्रातील ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व यांनी सर्व मानवजातीला कायमची अगदी खुली केली .

त्याकाळी चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुप प्रगत देश होता तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " तुम्ही चीनला जावुन ज्ञान मिळवा  लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी जा " असा संदेश  त्याकाळी दिला .या पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल प्रेषित मुहम्मद स्व यांचा नेहमीच अभिमान बाळगावा तितके थोडेच.

           श्री.  गुरु नानक देवजी , आपल्या ( जन्म साखी विलायत वाला ,पेज नंबर १६८) ) मधे म्हणतात की,  " ले पैगंबरी आया , इस दुनिया माहे ! नाऊ .

                 मोहम्मद मुस्तफा ,हो आबे परवा हे !!!!)

( अर्थात , ज्यांचं नाव मुहम्मद आहे ,ते या जगात प्रेषित बनुन आलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकाच्या शैतानी शक्तींची भिती व भय नाही .ते बिलकुलच निर्भय  आहेत .)

         अल्लाह समोर सर्व मानव सम-समान, सारखेच आहेत हा पुरोगामी विचार मांडला .

              आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी कितीही मोठा होवू , बनू शकतो , कोणीही राजा ,प्रधान बनू शकतो हा अत्यंत पुरोगामी विचार मांडला .राजा होण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावा लागतो हा विचारच नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून देत .

      याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर व औरंगाबाद शहरांची ज्याने निर्मिती  केली ,शहर बसवले, चेहरा- मोहरा बदलला असे पंतप्रधान ,वजिर जो एक निग्रो गुलाम म्हणून विकत आणला होता व आपल्या कर्तृत्वाने मोठ्या पदावर गेला.  ते म्हणजेच मलिक अंबर हे होत .(उदाहरण . त्यांच्या महानिर्वाण नंतर ७००-८०० वर्षानंतर चे आहेत ).

   समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक हे प्रेषित मुहम्मद स्व.हेच . आपल्या २३ वर्षांच्या कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून , अरब देशात काळा -गोरा  हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात  केली जात होती ,ती  गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाचा आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोरयांचा भेदभावच  नष्ट केला .

तसेच ह.बिलाल नावाच्या तुच्छ समजले जाणारे गुलामगिरीतून मुक्त करून . नंतर मक्का विजयी दिवशी  पवित्र काबागृहावर चढून " अजान " देण्याचा आदेश दिला व समस्त जगाला दाखवून दिले की , कोणीही अपवित्र नसते.  समस्त मानव जात ही इस्लामच्या मुलभूत सिद्धांतानुसार एकच अल्लाहाची संतान आहेत. सर्व रंगाचे , वर्णाचे , वंशाचे ,एकच आहेत .हा भेदभाव ईस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय , हक्क , संधी आहेत .हा क्रांतिकारी विचार पहिल्यांदा प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व. यांनीच जगाला दिला.

           स्वामी विवेकानंद म्हणतात ,""' प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.आपल्या आदर्शवत जीवनात असं काही धडा घालून गेले की ,त्यांच्या अनुयायांनी , मुस्लिमांमध्ये संपूर्ण समता , बंधुभाव निरंतर नांदावयांस हवे , त्यांच्या मधे जातीचा , लिंगाचा , वर्णभेदाचा भेदभाव कदापी ही शिरू नये..""

                   स्त्रियांना वारसाहक्कात , मालमत्तेत वाटा आहे . तो देणारे जगभरात पहिला विद्रोही क्रांतीकारक विचार  प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनीच दिला.

      विश्वातील पहिला घटस्फोटीत , विधवा महिलांसाठी पुनर्विवाह  ही संकल्पना मांडली व जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलाशी  स्वतः विवाह करून तुच्छ समजलं जाणार्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी पत्नी बनवून बहुमान दिला .

       स्री भ्रुण हात्या हे पाप आहे ही सांगणारं ही प्रेषित मुहम्मद पैगंबर च .

 अरब जगतात १४००-१५०० वर्षांपूर्वी समाजमनावर नसानसात भिनलेली होतं की , जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जातं असतं .  त्या जन्म झालेल्या मुलीला जिवंत पुरायच्या क्रुर प्रथा होती , तेथील स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं समजलं जातं असतं.ती प्रथाच आपल्या २३ वर्षाच्या कालखंडात हद्दपार करून टाकली.

   स्त्रियांना  शिक्षणाचा अधिकार आहेत व त्या शिकल्या पाहिजेत असे ठणकावून सांगत दाखवून दिले आहे.

आपल्या वडिलांच्या संपत्ती तुन , पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतून मुलींचाही वाटा आहे हा क्रांतिकारी विचार अंमलात ही आणला.

जगप्रसिद्ध अंतिम प्रवचनातून (हॹतुल विदाह -खुतबा Farewell speech) मधे , त्यांनी महीलांच्या हक्काची काळजी घ्यावी असं तळमळीने सांगितले , " मित्रांनो ,पतीचे पत्नी वर हक्क आहे , तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला ,बायकांना प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर , निष्ठुर होवू नये ,दयाळु राहा , तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे ,तर काळजी घ्यावी . पत्नी चे जे काही आधिकर असतील  ते सर्व द्या . तुमच्या वर विश्वास टाकला आहे ,तर विश्वासघात करू नका , तुम्हाला महाप्रलयाच्या (कयामतच्या ) दिवशी अल्लाहा समोर हिशोब द्यावाच लागेल . या दिवसाची कायम आठवण ठेवा ."" 

  आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महीलांची  तळमळ व्यक्त केली , काळजी घेतली .

      महात्मा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे लिहीतात ,की, 

 ""    तेरावे सद्दीची पैंगंबरी खुण ! दावितो प्रमाण कुरआणात !

            जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

आनंद वतनी ज्योती म्हणे !! ""

             पुढे पुन्हा  महात्मा फुले  यांनी पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहिला व त्यात ते स्तुती करताना लिहीतात की , " 

     कोणी नाही श्रेष्ठ ! कोणी नाही दास !

जात प्रमादास खोडी बुडी ! मोडीला अधर्म आणि मतभेद !

सर्वात अभेद ठाम केला !!! " 

(   अर्थात ;- " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला , गुलामगिरी नाकारली , जातिभेद, जातीपाती बुडासकट नष्ट केले , अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला , सर्वात्र अभेद ,समता, बंधुभाव कायम केला !!')

      पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ इक्बाल लिहीतात  की ,.   

         " एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !!

         ना कोई बंदा रहा , ना बंदा नवाज ""!!!

( अर्थात :- मस्जिद मधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा , राष्ट्रपती ,च्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहिला ,कोणी गुलाम नाहीत कोणी मालक नाही ....)

पैगंबर स्व.यांनी अभुतपुर्व क्रांती घडवताना संपूर्ण अरब देशात व्यसनापासुन कित्येक संसार उध्वस्त झालेली पाहून नशा मुक्त, व्यसनमुक्त  चळवळी चालवुन संपूर्ण अरब प्रदेश व्यसन मुक्ती केला . ""  दारू बनवणारा ,त्याची विक्री करणारा ,  ने आन, व्यापार  करणारा , मदत करणारे सर्व गुन्हेगार ठरवले , ""  अरब प्रदेश व्यसन मुक्त केले .

     अर्थ व्यवस्थेत अभुतपूर्व क्रांती घडवून आणली बिना व्याजी अर्थव्यवस्था निर्माण केली , व्याज घेणं- देणं दोन्हीला हराम करून बंद केले , सावकारी पध्दतीचा नायनाट केला .

त्यासाठी श्रीमंत वर्गात जकात पध्दत चालु केली ती अनिवार्य करण्यात आली . यामुळे त्याचे चांगले परिणामही दिसू लागले , समाजातील बहुसंख्य कुटूंब जकात देण्या ईतपत सक्षम झाली व अशा कित्येक गरीबांना त्याचा लाभ झाला.

साक्षरतेची , शिक्षणाची अदुतिय क्रांती घडवून आणली . समाजातील स्री शिक्षण अनिवार्य केले , मुलं-मुली, वृध्द व्यक्तींवर शिक्षण अनिवार्य करण्यात येवून. एका शिक्षीतांने  दहा निरक्षरांना  ज्ञान देण्याचं काम करावे . जेलमधील शिक्षीत,साक्षर कैदींना निरक्षर कैद्यांना शिक्षण देणे अनिवार्य केले . शिक्षणाची अभुतपूर्व क्रांती घडवून आणली.

       आति- विशेष बाब  म्हणजे  जगातील इतिहासात तोडच नाही आशी विषेश  म्हणजे  प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व . स्वतः एक निरक्षर , अशिक्षित असून , स्वतः ला लिहीता-वाचता येत नव्हते . तरी सुद्धा , सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व देवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला . याला एक अद्भुतीय  क्रांतीच घडवून आणली.

              या सर्व न भूतो न भविष्यते अशा घडवलेल्या क्रांती चे श्रेय स्वतः ला यतिकिंचतही न देता सर्व काही श्रेय जगत निर्मात्यां अल्लाहा रबबुल आलमीनला दिले !!! मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत .

ते स्वतः म्हणतं ,मी तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस , कार्यकर्ता आहे, हे सर्व यश अल्लाहा रबबुल आलमीन च्या कृपेने मिळालं आहे.आशी ठाम भूमिका घेउन स्वतः ची विनम्रता संपूर्ण जगासमोर मांडली ... केवढी मोठी विनम्रता ही जगाच्या इतिहासात तोडच नाही .

    प्रसिद्ध तत्वज्ञ ;- बर्नार्ड शॉ नोबेल पुरस्कार विजेते म्हणतात ,की ," मुहम्मद स्व .यांनी दिलेल्या शिकवणीबाबत माझ्या मनात आदर आहे .मी त्यांची प्रशंसा करतो कारण त्यांच्या मध्ये जबरदस्त तेज आहेत.प्रत्येक वयोगटास आवाहन करणारे आणि जीवनात होणारे परिवर्तन पोचविण्याचे सामर्थ्य असलेला हा एकमेव धर्म आहे असे मला वाटते .या व्यक्तींचा मी अभ्यास केला आहे, उद्याच्या युरोपला ईस्लामची तत्व प्रणाली मान्य होईल असे मी भाकीत केले आहे . कारण आजच्या युरोपने ते मान्य करण्यास सुरुवात केली आहे 



लेखक डॉ सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर 

९२७१६४००१४ .....

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget