बेलापूर अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन छेड काढणारास जमावाकडून बेदम चोप गुन्हा दाखल.
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन छेड काढणारास जमावाकडून बेदम चोप देवुन पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले असुन जैनुद्दीन मन्सुरअली सय्यद व वाहीद शेख सह इतर आरोपी विरुद्ध भादवि कलम ३५४ ३५४ड सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत मिळालेली माहीती आशी की बेलापुर महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस जैनुद्दीन सय्यद व वाहीद शेख हे सतत त्रास देत होते दोन दिवसापूर्वी यांनी त्या मुलीस बेलापुरच्या बाजारपेठेत कट मारला ही बाब काँलेजच्या प्राध्यापकांना सांगितली परंतु त्यांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही त्याचा परिणामआरोपींची हिम्मत वाढली त्यांनी त्या मुलीला वर्गात एकटे पाहुन तिचा हात धरला व तु मला आवडतेस असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यामुळे मुलीने हा प्रकार घरी जावुन पालकांना सांगीतला काही वेळातच ही चर्चा गावभर पसरली मुलीचे पालक व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला त्यानंतर जमाव पोलीस स्टेशनला आला पतितपावन संघटनेचे सुनिल मुथा माजी आमदार भाऊसाहेब कांबळे जि प सदस्य शरद नवले पत्रकार देविदास देसाई उपसरपंच अभिषेक खंडागळे रविंद्र खटोड पप्पु कुलथे डाँक्टर प्रशांत खैरनार किशोर फुणगे मुस्ताक शेख संजय छल्लारे अजय डाकले गणेश मुंडलीक प्रसाद खरात रत्नेश गुलदगड आदिसह अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होईपर्यत तळ ठोकुन होते अखेर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे स्वतः बेलापुर पोलीस स्टेशन येथे आले व या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालुन छेडछाडीच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असे अश्वासन दिले या वेळी पोलीसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत कारवाई केली असुन पोलीसानी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुनिल मुथा यांनी दिला या वेळी ते आरोपी बेलापुर ज्यूनियर काँलेज मध्ये शिकत असुन त्याला काँलेजमधुन काढुन टाकण्यात यावे अशी मागणी सर्वांनी केली या बाबत मुलीने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, जे. टी. एस. ज्युनियर कॉलेज, बेलापुर बु// परीसरात वेळोवेळी माझ्या कॉलेजमधील 12 वी कला शाखेतील विद्यार्थी जैनुद्दीन शेख याने माझा पाठलाग केला तसेच परीक्षा हॉलमध्ये मी एकटी असताना माझा हात धरुन माझा विनयभंग केला तसेच मी नकार दिला असता, मला वाईट वाईट शिवीगाळ करुन धमकी दिली वगैरे म।।चे फिर्यादीवरुन गु.रजि नं.962/2023 ipc कलम 354,354(ड),504,506, सह पोक्सो 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनी जीवन बोरसे हे करत आहे
Post a Comment