भौतिक सुखाच्या मागे धावुन दुःख विकत घेवु नका -महंत रामगीरी महाराज
बेलापुर (प्रतिनिधी )- जिवन जगताना अध्यात्माची कास धरा अन आनंदी रहा अध्यात्मासारखा आनंद ,सुख, शांती अन तृप्ती कोठेच मिळणार नाही त्यामुळे भौतिक सुखाच्या मागे धावुन दुःख विकत घेवू नका. आनंदी जगा, अन इतरांनाही आनंदी ठेवा. असा उपदेश सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरी महाराज यांनी दिला. जय संतोषी माता जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता महंत रामगीरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. त्या वेळी भाविकांना उपदेश करताना महंत रामगीरी महाराज पुढे म्हणाले की आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील हसू हरपले आहे .हसण्याकरीता लोक हास्यक्लब स्थापन करतात हे दुर्दैव आहे भौतिक सुखाचा त्याग करा धर्माची कास धरा आपल्या परंपरा विसरु नका .माता- पित्याची, जेष्ठांची सेवा करा. संत महंतानी सांगीतल्या प्रमाणे आपले आचरण शुद्ध ठेवा .कुणाशीही कपटनिती ठेवुन वागु नका सत्य बोला धर्मानुसार आचरण ठेवा. जय संतोषी माता जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजीत पारायण सोहळ्यात सर्वानी भजन किर्तन हरिपाठ याचा आनंद घेतला आहे .आज या साप्ताहाची सांगता आहे .काल्याच्या किर्तनाचा आनंद हा या भूतलावरच घेता येतो त्यामुळे देवादिकांनी देखील अवतार घेवुन काल्याच्या किर्तनाचा लाभ घेतला असल्याचेही महंत रामगीरी महाराज म्हणाले प्रारंभी जय संतोषी मातेच्या प्रतिमेची व ज्ञानेश्वरी ग्रंथाची गावातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणूकीत महीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सप्ताह काळात ह भ प संदीप महाराज गुंजाळ तुकाराम महाराज बनकर सचिन महाराज मापारी पांडूरंग महाराज पठारे विजय महाराज गुंजाळ संदीपान महाराज गुंजाळ आदिंनी किर्तनसेवा दिली पारायणाचे नेतृत्व मधुकर महाराज कलगड विजय महाराज गुंजाळ तुकाराम महाराज बनकर संदीप महाराज बनकरव सरला बेटच्या विद्यार्थ्यांंनी केले होते मृदुंगवादक म्हणून सचिन महाराज मापारी चंद्रकांत महाराज डेंगळे किरण महाराज शास्री यांनी काम पाहीले हरिहर भजनी मंडळ विठ्ठल भजनी मंडळ हरिहर महीला भजनी मंडळ सावता भजनी मंडळ आदिसह परिसरातील भजनी मंडळांनी सहभाग नोदविला शेवटी महाप्रसादाने काल्याची सांगता झाली,जय संतोषी माता प्रतिष्ठाण व ठोंबरे परिवाराच्या वतीने आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले
Post a Comment