ग्रामीण भागातील विद्यार्थी शिवचंद्रपाल जाधव यांने मिळवीलेले यश अनेकांना प्रेरणादायी
बेलापुर (प्रतिनिधी )- जिद्द ,चिकाटी व प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असेल तर कुठलेही पद मिळवीणे अवघड नाही ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन करत असुन शिवचंद्रपाल जाधव याने मिळवीलेले यश निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरणारे असल्याचे मत माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी व्यक्त केले संक्रांपुर तालुका राहुरी या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवचंद्रपाल बाळासाहेब जाधव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन कृषी मंडल अधीकारी हे पद मिळविले त्याबद्दल अशोक कानडे व हर्षदादा तनपुरे यांच्या शुभहस्ते संक्रेश्वर मंदिर संक्रांपुर येथे त्याचा सत्कार आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प रामदास महाराज दाते हे होते . या वेळी बोलताना हर्षदादा तनपुरे म्हणाले की नवनविन तंत्रज्ञानामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या क्षेत्रात संधी प्राप्त होत आहे .एका शेतकरी कुटुंबातील मुलगा कृषी अधीकारी झाला याचा अभिमान आहे कारण शेतकऱ्यांच्या व्यथा या शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील असलेल्या सदस्यांनाच ठाऊक असतात या वर्षी निसर्गाने पाठ फिरविल्यामुळे सर्व पिके डोळ्यादेखत होपळली ,करपली जात आहेत .शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे ,जाधव परिवारातील शिवचंद्रपाल याने जाधव परिवाराबरोबरच गावाचे व तालुक्याचेही नाव उज्वल केले असेही तनपुरे म्हणाले या वेळी कृषी मंडल अधीकारी पद मिळवीलेले शिवचंद्रपाल जाधव व ह भ प रामदास महाराज दाते यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी शिवचंद्रपाल याचे आई वडील सौ अनिता जाधव व बाळासाहेब जाधव तसेच चुलते नारायण जाधव ,दिलीप जाधव बापुराव जगताप याचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला .या वेळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार संक्रांपुरचे सरपंच रामदास पांढरे ,कुंडलीक खेमनर ,राजीव बोरावके , ऊक्कलगाव सोसायटीचे चेअरमन पुरुषोत्तम थोरात ,धनंजय होन ,जालींदर चव्हाण ,लक्ष्मण चव्हाण ,रमेश सालबंदे ,पांडूरंग जगताप ,साहेबराव पांढरे ,रोहीदास खपके ,दादा पाटील जगताप ,अर्जुन होन किशोरा वर्पे कामगार तलाठी जालींदर पाखरे ग्रामसेवक तुषार रोहकले आदिसह मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव यांनी आभार मानले
Post a Comment