श्रीरामपुर तालुक्यात अनाधीकृतपणे दारु विक्री करणारावर कारवाई करावी -मुथा
बेलापूरः(प्रतिनिधी )- श्रीरामपूर तालुक्यात चालविल्या जाणाऱ्या हाँटेल खानावळ या ठिकाणी खुलेआम अनाधिकृत दारु विक्री सुरु असुन अशा अनाधिकृत दारु विक्री ठिकाणावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपुर तालुका लिकर आसोसिएशनचे सल्लागार सुनिल मुथा यांनी केली आहे .या बाबत सुनिल मुथा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की श्रीरामपुर तालुक्यात सुरु असणारे हाँटेल खानावळ या ठिकाणी संबंधित यंञणांशी हातमिळवणी करुन बेकायदेशीर दारु विक्री होत असून यामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसूल बुडत आहे.तसेच अधिकृत परवाना धारकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे संबंधित प्रकरणी परवानाधारक हाॕटेल चालकांचे शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सदर प्रकार त्यांच्या निदर्शानास आणून देवून याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे तालुका लिकर असोसिएशनचे सल्लागार सुनिल मुथा यांनी सांगीतले. श्री.मुथा म्हणाले की,तालुक्यात सुमारे दिडशे हाॕटेल्स खाणावळीच्या नावाखाली सुरु आहेत.या पैकी बहुतांश हॉटेल व खानावळी मधून संबंधित शासन यंञणेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन व आर्थिक तडजोड करुन राजरोसपणे अनधिकृत दारु विक्री केली जात आहे.असे असताना संबंधित शासकीय यंञणा या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे. ,सदर दारु हि दमन येथून अथवा वाईन शॉप मधून आणून बेकायदेशीररित्या विकली जाते.यातील बहुतांश दारु ही बनावट असते.हा ग्राहकांच्या जीविताशी खेळ आहे.यामुळे पांगरमल प्रकरणाची पुनरावृत्ती होवू शकते.तसेच अशा दारु विक्रीमुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. यामुळे अधिकृत परवानाधारक परमीट हाॕटेल व्यवसायिकांचे व्यवसाय देखील अडचणीत आले आहेत.परवानाधारक कोट्यावधीचा महसूल शासनाला देतात.असे असताना आर्थिक हितसंबंधांमुळे या महसुलावर पाणी फिरत आहे.हा प्रकार गंभीर असून शासनाचया संबंधित यंञणांनी व अधिका-यांनी याची दखल घेवून तात्काळ कडक कारवाई करावी.यासंदर्भात लिकर असोसिएशनचे प्रतिनिधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटुन सविस्तर माहीती देणार आहेत.या तक्रारीची दखल घेवून कारवाई करावी व अनाधीकृत विनापरवाना चाललेली दारु विक्री तातडीने बंद करावी अशा प्रकारे विना परवाना दारु विक्री करणारी ठिकाणे देखील संबधीत अधीकाऱ्यांना माहीती आहेत तरी या प्रकाराला आळा घालावा. अन्यथा वरिष्ठांना नावानिशी माहिती देवून कारवाई करण्यास भाग पाडले जाईल असा इशारा मुथा यांनी दिला आहे.
Post a Comment