विद्यार्थ्यांमध्ये निपुण वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे,त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा व त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे व प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य अवगत व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर स्पर्धेत राज्यातील २६ शाळेतील ५२ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर करून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेमध्ये श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचे कु.श्रुती पिंपरकर आणि कु. तनिष्क निकम या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाने उपस्थित सर्वांची मने जिंकून या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून
रोख रक्कम ७०००/ रुपये,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मानकरी ठरले.सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले डॉ.श्री.नितीन जैन (प्राचार्य राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज कोकमठाण) यांची उपस्थिती लाभली.तसेच
बक्षीस वितरण समारंभासाठी
डॉ.सौ.सुनिता पारे (प्राचार्या सोमैया विद्यामंदिर,साकरवाडी) यांनी उपस्थिती दर्शवून सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.राजेंद्र सांगळे स्पर्धेसाठी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मा.प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले होते.श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचे कुमारी श्रुती पिंपरकर व कुमार तनिष्क निकम तसेच सर्व यशस्वी स्पर्धकांचे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री.सुहास गोडगे व इतर सदस्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
*स्पर्धेचा अंतिम निकाल*
*प्रथम पारितोषिक*
श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव.
बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम ७,०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.
*द्वितीय पारितोषिक*
श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन चे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडियम स्कूल नगर.
बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम ५,०००/ हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
*तृतीय पारितोषिक*
मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल,अकोले.
बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम ३,०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
*उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*
श्रीराम अकॅडमी,श्रीरामपूर
बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम १०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.
*उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*
प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,लोणी खुर्द.
बक्षिसाचे स्वरूप-रोख रक्कम १०००/हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.
Post a Comment