बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी नुकत्याच केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की,बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार येथे शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी नाष्टा व जेवणाची व्यवस्था होण्यासाठी कॅन्टीन पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. व्यापारी शेड हॉलची दुरुस्ती देखील आवश्यक आहे.बायपास व नगर रोड येथील गाळ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे तसेच उपबाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालयाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून संस्थेची आर्थिक परिस्थिती नसताना स्वतःच्या फायद्यासाठी मलाईदार कामे हाती घेतली जात आहेत.एकाच मिटिंग मध्ये १६-१७ मलाईदार विषय बहुमताच्या जोरावर कुठलीही चर्चा न करता मंजूर करून घेतले जातात याची घाई कशासाठी? असा प्रश्न पडतो. सध्या ही सर्व विकास कामे करण्याची संस्थेची आर्थिक परिस्थिती नाही.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने येणाऱ्या काळात संस्थेचे उत्पन्न कमी होणार आहे.याआधी संस्थेने विकास कामांसाठी शासनाकडून कर्ज घेतलेले आहे ते कर्ज अद्याप फिटलेले नसताना पुन्हा कर्ज काढून विकास कामे केली जाणार आहेत याचा बोजा शेतकरी,सभासद,व्यापारी यांच्यावरच पडणार आहे.मग रीन काढून सन करण्याची ही पद्धत आहे अशा परिस्थिती हुकूमशाही पद्धतीने होत असलेल्या चुकीच्या कामकाजाला आपला विरोध आहे. बेलापूर येथील व्यापारी संकुलास स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती तसेच काही मंडळींनी माजी सरपंच कै.मुरलीशेठ खटोड यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी संकुलास नाव देण्याचा ठराव याआधीच झाला आहे असे सभापती यांनी गावकऱ्यांना खोटे सांगितले तेव्हा गावची बांधिलकी कुठे गेली होती.सभापती-उपसभापती बेलापूर गावचे आहेत याची उपरती आजच कशी झाली? उपसभापतीला तीन महिने तुटक्या खुर्चीवर बसवले तेव्हा उपसभापती गावातीलच आहे याचे भान राहिले नव्हते का?उपसभापती गावातीलच आहेत तर मग संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जाहिराती मध्ये उपसभापती चे नाव का टाकण्यात येत नाही? केवळ उपसभापती नामदार विखे पाटील गटाचे आहे यामुळेच राजकीय सूडबुद्धीने उपसभापतीला वेगळी वागणूक दिली जात आहे ना? असा सवाल खंडागळे यांनी केला.आहे बेलापूर सोसायटीच्या मागील काळातील कामकाजाची सहकार खात्यामार्फत चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी रिक्षा भरून कागदपत्रे सील करून नेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ग्रामस्थांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याची केविलवाणी धडपड सभापती सुधीर नवले यांच्याकडून सुरू आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील,खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्यामुळे बेलापूर-ऐनतपूर गावाला १२६ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली.चार कोटी किमतीची शेती महामंडळाची जागा साठवण तलावासाठी विनामुल्य मिळाली.असे ऐतिहासिक काम सुरू असताना त्याचे शब्दाने ही कौतुक केले नाही. गावच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची भाषा करणाऱ्यांनी गावच्या पाणीपुरवठा योजनेला कुठे व कसा विरोध केला, झेंडा चौक सुशोभीकरनाला,हरिहर नगर(रामगड)येथील हनुमान मंदिर कामाला तसेच ऐनतपूर येथील बिरोबा मंदिर कामाला कसा विरोध केला हे योग्यवेळी जनतेपुढे आणू असे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी शेवटी म्हटले आहे.
आमचा विरोध विकास कामांना नाही तर मनमानी व हुकुमशाहीला -उपसभापती अभिषेक खंडागळे
बेलापूर:(प्रतिनिधी )--श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने योग्य पद्धतीने करण्यात येणार असलेल्या विकास कामांना आपला विरोध नसून चुकीच्या व हुकूमशाही पद्धतीने होणाऱ्या कारभाराला विरोध आहे व यापुढेही राहील.महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विखे गटाच्या सर्व संचालकांच्या साथीने बाजार समितीत शेतकरी, सभासद,व्यापारी,हमाल,मापाडी यांच्या हिताकरीता हे काम यापुढेही सुरूच राहील अशी प्रतिक्रिया श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.
Post a Comment