गावकरी मंडळात निवडून आलेल्यांनी पदाच्या लालसेपोटी विरोधकांची गळाभेट घेतली -अमोलीक
बेलापूरः(प्रतिनिधी )-मागील वीस वर्षाच्या कार्यकाळात ,सगळेच अलबेल होते तर जनतेने तुम्हाला का नाकारले.या कारभाराच्या विरोधात आवाज उठवून जे निवडून आले तेच आता सरपंच पद न मिळाल्याच्या पोटदुखीतून आरोप,व्हिडीओ क्लिप्स टाकून राजकीय स्टंटबाजी करीत असल्याची टिका सामाजिक कार्यकर्ते विजय पोपटराव अमोलिक यांनी केली आहे. प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात.विजय अमोलीक यांनी पुढे म्हटले आहे की,या महाशयाच्या विजयात आमच्या समाजाचा मोलाचा वाटा आहे.असे असताना हे सदस्य ज्यांचेविरुध्द आरोप करुन गावाकरी मंडळाच्या शिदोरीवर निवडून आले.यांच्या थकीत घरपट्ट्या देखील गावकरी मंडळाने भरल्या अन तुमच्यात नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून या ज्या विरोधकांविरुध्द निवडून आले स्वार्थापोटी त्याच विरोधी गटात सामिल झाले आहे.स्वतः वाळू तस्करीत सहभाग असणारे हे महाशय सावपणाचा आव आणून ग्रामपंचायत प्रशासनावर खोटेनाटे आरोप करुन प्रसिध्दीचा खटाटोप करीत आहेत. स्वतः अवैध धंदे करायचे आणि वर नाकाने कांदे सोलून फुशारक्या मारायच्या पण जनता एवढी खूळी नाही.ही हरिहराची नगरी आहे.इथे अनैतिकतेला थारा नसल्याचेही अमोलिक यांनी म्हटले आहे. गेल्या वीस वर्षे यांची सत्ता होती. त्यां काळातही पाईप लाईन चोकअपची समस्या अनेकदा आली होती.ही तांत्रिक अडचण असल्याने सर्वांनी समजून घेवून सहकार्य केले होते.आताही पाईपलाईन कोणाच्यातरी खोडसाळपणामुळे चोकअप झालेली आहे.मागेही गोधड्या टाकून पाईपलाईन चोकअपचा खोडसाळपणा विघ्नसंतोषिंनी केला होता.चोकअप सापडले पण आठ चारीला पाणी असल्याने चोकअप काढण्यात अडचण येत आहे.ही अडचण तात्पुरती असून दोन तीन दिवसात चारी बंद होताच चोकअप निघेल असा खुलासा ग्रामपंचायत पदाधिका-यांनी केलेला आहे.अशावेळी सामंजस्य व सहकार्य करणे गरजेचे असताना अडचणीचे भांडवल करुन टिकाटिपणी केली जात आहे.खरे तर बेलापुर गावाला १२६ कोटीची पाणीपुरवठा योजना,साठवण तलावासाठी आठ एकर जमिन मोफत मिळवून गावकरी मंडळाने ऐतिहासिक काम केले आहे,त्याबद्दल अभिनंदन करायचे सोडून केवळ विरोधासाठी विरोध केला जात असल्याचा आरोपही विजय अमोलिक यांनी केला आहे.
Post a Comment