November 2019

बुलडाणा- 30 नोव्हे.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरापासून दोन किलो मीटर अंतरावर खामगांव-जालना हायवे वरील मेहकर फाटा येथे तांदुळाने भरलेला एक ट्रक रात्री तीन वाजताच्या सुमारास मेहकर पलटी झाल्याची घटना घडली असून रात्री ट्रक ड्रायव्हर व क्लिनर घटनास्थळ वरुन पळून गेले होते.या मुळे असा व्यक्त केला जात आहे की सदर तांदुळ रेशनचे तर नाही ना ?
      चिखली जवळ असलेल्या मेहकर फाटा परिसरात तंदुळने भरलेला ट्रक क्र. MH 20 DE 5099 पलटी झाल्याची घटना रात्री घडली व ट्रक चालक व क्लीनर तेथून फरार झाले. दुपारी बाराच्या सुमारास ट्रकच्या ड्रायव्हर ने जोगेश्वरी ट्रेडिंग कंपनी, चोपडा या नावाने मालाचे बिल व बिल्टी घेऊन चिखली पोलीस स्टेशनला हजर झाला. बिल्टी वरुण स्पष्ट होते की
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून 25 टन तंदुळणे भरलेला ट्रक गोंदिया जाणार होता,चोपडा येथून गोंदिया जाणारा ट्रक चिखली येथे कशासाठी आला असेल ? ते तांदूळ रेशनचे आहे का ? अशे प्रश्न उपस्थित होत आहे. चिखली पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी जावून आले.या विषयी चिखली तहसीलदार अजितकुमार येळे यांच्याशी विचारले असता ते म्हणाले की,आमचे लोक गेले होते व सदर तांदूळाशी आमचा काही संबंध नाही तरीही योग्य चौकशी करण्यात येईल.या प्रकरणी ठाण्यात फक्त अपघात घडल्याचा गुन्हा नोंद होण्याची माहिती मिळत आहे.सदरचे तांदूळ रेशन माफियाचे आहे की नाही सद्या है अस्पष्ट आहे.प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी केली तर रेशन धान्य संबंधी मोठा खुलासा समोर येऊ शकते.हे तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीचे असून काळ्याबाजारात जात होते, अशी चर्चा चिखली शहरात सुरु आहे.


कोपरगाव (प्रतिनिधी)
एका दुचाकीतील चोरीच्या गुन्ह्यात आपल्याला अटक करू नये व मदत करण्याच्या मोबदल्यात शिर्डी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस शिपाई ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी.मैद या दोघाना चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी पुणतांबा फाटा पंचासमक्ष केल्याने नगर येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव येथील रहिवाशी तरुण सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठीकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान असून कोपरगाव बागुल वस्ती येथील बंडू जगताप नावाच्या एका युवकाने त्यांच्याकडून मे 2018 रोजी एक बजाज पल्सर कंपनीची दुचाकी खरेदी केली होती.त्याने ती संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील बाजारात ती अज्ञात इसमास अदलाबदल करून विकली असल्याची माहिती समजते.दरम्यान शिर्डीत दरम्यान शिर्डीत एका परप्रांतीय महिलेची पर्स ओढताना काही चोरटे पकडण्यात आले होते.त्यात हि प्लसर गाडी सापडल्याने शिर्डी पोलिस शिपाई ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांनी दुचाकी दलाल सागर सय्यद व त्यांचा भाऊ मोहसीन सय्यद यांचेकडिल असल्याचा बहाणा करून सागर सय्यद त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा राहुल काकडे यांची नावे वगळण्यासाठी पन्नास हजारांची मागणी केली शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी केली होती.त्यात तडजोड होऊन ती रक्कम चाळीस हजार रुपये करण्यात आली.त्यावेळी हि रक्कम जास्त व अन्यायकारक वाटल्याने या दोघांनी या बाबत अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्याय मागितला होता.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोपरगाव नजीक असलेल्या पुणतांबा चौफुलीवर शुक्रवार दि.22 नोव्हेंबर रोजी साडेचारच्या दरम्यान सापळा लावला होता.त्यात फिर्यादी सागर सय्यद व त्याचा भाऊ मोहसीन सय्यदव त्यांच्याकडे काम करणारा मुलगा राहुल काकडे यांना अटक न करण्याच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपये देण्याची चर्चा तेथे असलेल्या पंचासमक्ष चालू असताना आरोपी पोलीस शिपाई सुपेकर व मैद यांना संशय आल्याने त्यांनी पोबारा केला होता.दरम्यान या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी एच.डी. खेडकर यांनी समक्ष भेट देऊन पाहणी करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं.394/2019 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन.1988 चे कलम 7 प्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक दैपाक करांडे हे करीत आहेत.दरम्यान या प्रकरणामुळे पोलीस विभागात चालत असलेला भ्रष्टाचार उघड झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तृतियपंथियाचा मारहाणीत मृत्यू झाला असून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.दि. 17 ऑक्टोबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अश्विनी नुरजहाँ शेख (वय-45, रा.श्रीरामपूर) या तृतियपंथीयाला अज्ञात व्यक्तींनी काहीतरी टणक वस्तूने डोक्यात मारहाण केली होती. यामध्ये ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अहवालानुसार दि. 29 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार सुरेश रामचंद्र मुसळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सपोनि संभाजी पाटील करीत आहेत.

बुलडाणा- 29 नोव्हे.
जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. ही विक्री तत्काळ बंद करुन खामगाव शहरातील मुख्य गुटखा तस्करावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी आज जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कारवाई न झाल्यास स्वतः गुटख्याच्या गोडाऊनवर धाड टाकण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
     महाराष्ट्र राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखूची बिक्रीवर बंदी आहे.असे असतांना अनेक लोक प्रशासनातील भरष्ट अधिकाऱ्याचा खिशा गरम करुण गुटख्याचा अवैध व्यापार करुण "गब्बर" झाले तर इतकेच नव्हे या धंध्यातुन आडमाप कमाई करत अनेकांनी आता हा धंधा बंद करुण अशे तस्कर राजकारणात सक्रिय झाले आहे.जिल्हा प्रशासनाला समीर खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खामगाव शहरातील एक मोठा गुटखा तस्कर संपूर्ण जिल्हाभरात गुटखा पोहोचवतात. खामगावातील मुख्य अवैध गुटखा तस्करांची चौकशी करून त्याच्याविरूद्ध अन्न व औषध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा येत्या 2 डिसेंबरला आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात शेवटी करण्यात आला आहे.


अंबड : प्रतिनिधी अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून होत असलेली अवैध वाळु वाहतुक डोकेदुखी ठरत आहे. कारवाई केल्यानंतरही अवैध वाळू वाहतुक थांबत नाही. त्यामुळे ही फक्त कारवाई दिखावू आहे की काय? किंवा या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे हात आहेत का? असा सवाल उभा राहत आहे. यातच जिल्हाधिकारी जालना यांनी महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे वाळू माफिया सोबत संबध उघड झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाई मुळे मोठी खळबळ माजली आहे निलबंनाची कारवाई झालेला बडा अधिकारी कोण याची सर्वांना उत्सुकता लागली असून वाळू प्रकरणात झालेली अनियमितता हेच मोठे कारण निलबंन कारवाईचे असु शकते असा कयास बांधला जात आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी गेल्या महिनाभरापासुन वाळु माफियांच्या विरोधात कारवाईची मोहिम सुरू करीत वाळु माफियांना मदत करणाऱ्या लोकांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध वाळु वाहतुक रोखण्यासाठी रस्ते देखील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी नुकतेच खोदलेले होते. निलंबनाची कारवाई झालेला तो बडा अधिकारी कोण याबाबत माहिती विचारणा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होवु शकलेला नाही. निलंबनाच्या कारवाईमुळे महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिकरोड | प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील शिंदे गावात एका गाळ्यात पोलीस आणि अन्न पुरवठा अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गाळा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.अधिक माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील लोहिया कंपाउंडमध्ये असलेल्या एका गाळ्यात अनधिकृत तंबाखू, गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तालयातील विशेष पथकाला मिळाली  होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांच्या पथकाने शिताफीने दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे, शिरसाठ, वाघ, पवार, गवळी अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.पाटील यांच्या पथकाने केली.  छाप्यात विविध नावांचा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.  याप्रकरणी गाळा मालक रामविलास शिवणारायन लोहिया याच्या विरोधातनाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बुलडाणा- 27 नोव्हे.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बदनापुर येथील वैजनाथ बोरकर या शेतकरी सह इतर 15 शेतकऱ्यांना शेतात काम करीत असतांना अचानकपणे शेतात येवून अवैध सावकार वामन आसोले यांनी भाडोत्री गुंड आणून जीवघेणा हल्ला केला असा आरोप जख्मी शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यात 15 शेतकरी जख्मी झाले असून यातील काही शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
      बदनापुर येथील अवैध सावकार वामन आनंदा आसोले याने आज 27 नोव्हेबर रोजी साकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक 30 ते 35 जनानी लोखंडी रॉड व लाठ्या काठयानी बेदम मारहाण केली यात सर्व 15 शेतकरी जख्मी झाले असून जख़्मी मध्ये तीन महिलांचा तर 12 पुरुषांचा समावेश आहेत.या जख्मीतील 4 जणांना बुलडाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले
आहे.ही घटना मेहेकर तालुक्यातील असून  जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य शेतकरी सावकारी पाशात अडकले असून त्यांच्या दादागिरीला कंटाळून काही शेतकरयानी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत.या घटनेची तक्रार मेहकर पोलिसांनी नोंदवून न घेतली नाही असा आरोप पीडितांनी केला आहे.घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाणेदार यांनी जख़्मीचा बयान नोंदविन्यात आले आहे. शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळेल याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.मेहकर ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्याशी फोन माहिती घेतली असता ते म्हणाले की गुन्हा नोंदविन्याची प्रक्रीया सुरु असून एकमकां विरोधात गुन्हा दाखल होणार आहे.

बुलडाणा- 27 नोव्हे.रस्ता बांधकाम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सैलानी येथील घर कोसळल्या प्रकरणी रायपुर पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे.
     बुलडाणा जिल्ह्यातील हातणी ते जालना जिल्ह्यातील भोकरदनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याचे काम सुरु आहे.धार्मिक स्थळ सैलानीतून हा मार्ग जात असल्याने सैलानीमध्ये रोडचे खोदकाम सुरु आहे.ठेकेदाराकडून खोदकाम कुठे कमी तर कुठे जास्त करण्यात येत आहे. सैलानी येथील मो.नफीस हाजी मो.अय्यूब यांच्या घराला कोरुन रस्ता खोदण्यात आल्याने त्यांचा घर तकलादु झाला व 24 नोव्हेंबर रोजी एक मजला घर पूर्णपणे कोसळला. या घरात गावातील विद्यार्थी अभ्यास करतात. सुदैवाने घर कोसळण्याच्या वेळी घरात कोणीही नव्होता.घरमालक मो.नफीस हे इलेक्ट्रिक कंत्राटदार असल्याने त्यांचे इलेक्ट्रिकचे मोठे साहित्य ठेवलेले होते व घर पडल्याने जवळपास 18 ते 20 लाखाचे नुकसान झाले सदर रोडच्या कामात हलगर्जी करणारी कंपनी साकार इंफ्रास्ट्रक्चर यांनी जाणून बुजुन घराचे नुकसान केले अशी तक्रार घर मालक शेख अय्यूब शेख दगडु यांनी दिल्यामुळे संबंधित कंपनीवर रायपुर पोलीस ठाण्यात भादवी ची कलम 427 प्रमाणे एनसी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सैलानीत मार्गाच्या कामासाठी झालेल्या खोदकामामुळे घरासमोर 10 फुट खोल खड्डे पडले असून घरातील लहान,वयो व्रुद्ध लोकांना ये जा करण्यास मोठा त्रास होत आहे तर अनेक घर या खोदकामाने तकलादु झाले आहे व त्यांना धोका निर्माण झालेला आहे.अश्या घरात राहणारे लोक घाबरलेले आहे.या कडे एनएचए चे अधिकारी व ठेकेदाराने लक्ष देणे गरजेचे आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-  चांदेगाव  ता .राहुरी येथील एका इसमावर झोपेतच खूनी हल्ला करण्यात आला असुन त्या हल्ल्यातुन तो तरुण बालबाल बचावला त्याचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार चालु आहे        चांदेगाव भोसले वस्ती येथील गौतम मंजाबापु भोसले हे झोपेत असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तोडं बांधलेल्या व्यक्तीने घरात प्रवेश केला व गौतम यांचा गळा विळ्याच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न  केला जागसुद असलेल्या गौतमने त्यास विरोध करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर ईसम विळा जागेवरच टाकुन पसार झाला जखमी गौतम यास तातडीने साखर कामगार हाँस्पिटलला दाखल करण्यात आले असुन त्याच्या गळ्याला चिरल्यामुळे २२ टाके पडले आहे गौतम हा जागा आसल्यामुळे थोडक्यात
बचावला हल्ला करणाराने नियोजन बध्द रितीने हल्ला  केल्याचे स्पष्ट होत आहे हल्ला करण्याकरीता नविन विळा आणलेला असुन तो खास विळी नेवासा येथील आणला असावा असे दिसते हा हल्ला नेमका कोणत्या हेतुने करण्यात आला हे स्पष्ट होत नसले तरी हल्ला करणाराचा हेतु हत्या करणे असल्याचे स्पष्ट होत आहे

नाशिक । प्रतिनिधी जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना विक्रीसाठी निकृष्ट दर्जाचा गहू प्राप्त झाला आहे. याबाबत दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. ग्राहकांना निकृष्ट गहू मिळू नये यासाठी पुरवठा विभाग गहू बदलून देणार, अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर यांनी दिली.पुरवठा विभागाला पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतून खरेदी केलेला गहू वितरणासाठी प्राप्त होतो. मात्र पावसात भिजलेला गहू राज्याच्या माथी मारण्यात आला. गहू काळवंडलेला असला तरी तो खाण्यास चांगला असल्याची माहिती देत पुरवठा विभागाने या गव्हाचे वाटप करण्याचे निर्देश दिले होते. गव्हास मोठ्या प्रमाणावर सोंडे लागले आहेत. तसेच काही दुकानदारांना पीठ झालेला गहू विक्रीसाठी देण्यात आला आहे. हा गहू घेण्यास ग्राहकांनी नकार दिला. याबाबत तक्रारी केल्यानंतर पुरवठा विभाग खडबडून जागा झाला.दिंडोरी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी प्राप्त झालेल्या गव्हाला सोंडे लागल्याचे व गव्हाचे पोत्यांमध्येच पीठ झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरसीकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गणपत डोळसे पाटील, निवृत्ती कापसे, दिलीप नवले, अशोक बोराडे आदी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंद्याना उत आले असून हे सर्व धंदे सर्रासपणे चालविणाऱ्या लोकांना जणू पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे प्रथमतः दिसून येत आहे.मुख्यतः शहरातील बाजार परिसरातील भर रस्त्यात व लहान लहान गल्लीबोळात सर्रासपणे मटका आकड्याचे  दुकानी मांडल्या जात असून याकडे मात्र पोलिसांचा अर्थपूर्ण कारणाने दुर्लक्ष असल्याने संभ्रम परिस्थिती निर्माण झालेली असल्याचे जागरूक नागरिकांकडून बोललेजात आहे.
     एकीकडे अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक इशू सिधू साहेब आपल्या कार्यकर्तव्यामुळे जिल्ह्यात तालुक्यात सर्वदूर परिचित आहे. तर श्रीरामपुर शहरात अप्पर पोलीस अधीक्षका मा. दीपाली काळे  आहेत. यांनी राबविलेल्या विवीध उपक्रमामुळे ते लोकप्रिय झाले, परंतु अश्या कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातच मटका खेळणारे व खेळवणारे सर्वच सहजच दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही.सामान्य नागरिक या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी आग्रहित आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्रास चालणारे अवैध मटका  व्यवसायवर संपूर्ण बंदी घालने कर्तव्यदक्ष अधीक्षक इशू सिधू साहेब यांच्या साठी काही मोठी गोष्ट नाही फक्त त्यांनी मनावर घेतले पाहिजे,अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त करत अशी मागणी केली आहे की,अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधीक्षक इशू सिधू साहेब यांनी विशेष लक्ष द्यावे.

अहमदनगर (प्रतिनिधी)  राहाता पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पोलीस हवालदार अजित पठारे गंभीर जखमी केल्या प्रकरणातील पसार झालेल्या आणखी एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथून अटक केली आहे. अमित उर्फ सुरेंद्र विजय सांगळे (वय- 35 रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.नोव्हेंबरला पोलीस हवालदार रशिद बादशहा शेख व अजित पठारे हे खाजगी दुचाकीवरून राहाता शहरात शासकीय नोटीस बजावण्यासाठी जात होते. दुपारीच्या वेळी चितळे रोडवर गर्दी असलेल्या ठिकाणी दोन इसम तोंडाला रुमाल बांधलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते गंठणचोर असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांना अडविण्यात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यात पोलीस पठारे हे गंभीर जखमी झाले होते.पोलिसांनी गावठी कट्ट्यासह आरोपी श्रीरामपुरातील शिरसगावच्या सचिन ताकेला ताब्यात घेतले होते. तर एक आरोपी पसार होता. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पसार आरोपी अमित सांगळे हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, दत्ता गव्हाणे, संदीप पवार, संतोष लोढे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप दरंदले, मच्छिंद्र बर्डे, बबन बेरड, सचिन कोळेकर यांनी मिळून तळेगाव ढमढरे येथे सापळा लावून आरोपीस शिताफीने अटक केली. गुन्ह्याबातत त्याने कबूली दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.संगमनेर, राहुरी, लोणीत गुन्हे अटक केलेला आरोपी अमित सांगळे यांच्याकडे पोलिसांनी विचार केली असता इतर ठिकाणी गंठण चोरी केलेल्या गुन्ह्यांची उकल झाली. सांगळे याने गोळीबारात अटक केलेल्या आरोपी सचिन लक्ष्मण ताके यांच्या साथीने संगमनेर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन, राहात्यातील लोणी आणि राहुरीत गंठण चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)  येथील श्रीस्थानकवासी जैन संघाच्या अध्यक्षासह विश्वस्तांवर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 66 व 67 अन्वये श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरच्या धर्मदाय उपायुक्त श्रीमती हिरा शेळके यांच्यावतीने निरीक्षक ज्ञानेश्वर आंधळे यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आहे.जैन संघाचे अध्यक्ष रमेश लोढा, विश्वस्त श्रेणिक गुजराणी, रमेश गुंदेचा, विजय चोरडिया, कल्याण कुंकूलोळ, अभय मुथा व सुरेशकुमार गदिया यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंधळे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, श्री स्थानकवासी जैन संघाच्या वरील विश्वस्तांनी सन 2002 ते 2017 या कालावधित वेळेत हिशोब पत्रके व चेंज रिपोर्ट सादर केले नाही. समाजाने वेळोवेळी मागितलेली माहिती दिली नाही. मनमानी कारभार केला जातो अशी तक्रार प्रविण रिखबदास टाटीया व दीपक हुकूमचंद दुग्गड यांनी केली आहे.तक्रार अर्जावरून धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक वर्षा सुरकुटला यांनी तक्रारीचा चौकशी अहवाल सन 2013 मध्ये सादर केला होता. तक्रारीत तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवून विश्वस्तांनी 1997 पासूनचे हिशोब पत्रके दाखल केलेले नाही. वारंवार नोटिसा पाठवूनही कागदपत्रे सादर केली जात नसलेबाबत अहवाल देऊन गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली होती.अहवालाच्या अनुषंगाने नगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी वेळोवेळी नोटिसा पाठवूनही श्री स्थानकवासी जैन संघाने खुलासा केला नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून विश्वस्तांवर कलम 66 व 67 प्रमाणे फौजदारी कार्यवाही करणेबाबत मागणी केली होती.येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी 24 जुलै 2019 रोजी परवानगी दिली. विश्वस्तांचा कार्यकाल पाच वर्षांचा असून कायद्यानुसार बदल झाल्याच्या तारखेपासून 90 दिवसांत अहवाल सादर करावा लागतो. मात्र 2002 पासून 2017 पर्यंत असा अहवाल वेळेत दाखल केला नाही. त्यामुळे विश्वस्त कलम 66 प्रमाणे फौजदारी कायर्र्वाहीस पात्र ठरतात असा निष्कर्ष पुणे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी काढला आहे व कारणे दाखवा नोटीस बजावूनही खुलासा केला नाही.तसेच कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विश्वस्तांवर कलम 66 व 67 प्रमाणे फौजदारी दाखल करण्यास कलम 83 अन्वये परवानगी देण्यात आली त्यानुसार निरीक्षक आंधळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी (तालुका प्रतिनिधी)-राहुरी शहरात काल सोमवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना जेरबंद करण्यासाठी पहाटे सव्वातीन वाजता पोलीस पथक गेले. पोलीस पथक पाहताच दरोडेखोरांनी थेट पोलिसांवरच विटांच्या तुकड्यांनी हल्ला चढविला. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावत चार अट्टल दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने पकडले. मात्र दोन दरोडेखोर पसार झाले. त्यांचा शोध सुरू आहे.दरोड्याचे साहित्य, दोन दुचाकीसह एक लाख 42 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. एका चारचाकी वाहनातून दोघे पसार झाले. सागर गोरख मांजरे (वय 22, रा. पाईपलाईन रस्ता, यशोदानगर जवळ, नगर), अविनाश अजित नागपुरे (वय 20, रा. भिंगार, ता. नगर), काशिनाथ मारुती पवार (वय 37, रा. बजरंगवाडी, ता. संगमनेर), गणेश मारुती गायकवाड (वय 24, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पसार दोन आरोपींची नावे अद्याप समजलेली नाहीत. आरोपींकडून गॅस कटर, एक कमर्शियल एलपीजी सिलेंडर, एक ऑक्सिजन गॅस सिलेंडर, एक तलवार, टॉमी, लोखंडी कटावणी, लोखंडी कात्री, लोखंडी गज, लोखंडी पोखर, लोखंडी सुरा, चार मोबाईल, दोन दुचाकी असे साहित्य जप्त केले.याबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सांगितले की, गोकुळ कॉलनी येथे पहाटे तीन वाजता एका मोबाईल शॉपीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दरोडेखोरांची टोळी उभी असल्याची माहिती राहुरी पोलिसांना समजली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक यशवंत राक्षे, कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, सुनील शिंदे, सोमनाथ जायभाये, सुशांत दिवटे, रवींद्र मेढे, अमित राठोड, गृहरक्षक दलाचे जवान सतीश कुलथे, ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.दोन दुचाकी, एक चारचाकी वाहन व दरोडेखोरांची टोळी कामगिरीच्या तयारी होती. पोलीस पथकाला पाहिल्यावर जवळच असलेल्या विटांच्या ढिगार्‍यातून विटांचे तुकडे पोलिसांच्या दिशेने फेकून दरोडेखोरांनी धूम ठोकली. मात्र यातील एकास पोलिसांनी पकडले. दरोडेखोरांचा पोलीस पथकाने पाठलाग सुरू केला. एकाला व्यापारी पेठ, एकाला राहुरी खुर्दच्या मुळा नदीवरील पुलाच्या जवळ, एकाला राहुरी फॅक्टरीच्या दिशेने धसाळ पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी पकडले.दरोडेखोरांचा म्होरक्या असलेला सागर मांजरे हा श्रीरामपूर येथील बालाणी यांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणातून दीड महिन्यापूर्वी श्रीरामपूर कारागृहातून सुटलेला आहे. त्याच्यावर श्रीरामपूर, तोफखाना (नगर) व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वी राहुरी एमआयडीसी जवळील सागर गुंजाळ यांच्या दुकानातून गॅस कटर व सिलेंडर चोरल्याची कबुली मांजरे याने दिली. इतर तीन दरोडेखोरांवरील गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असेही पोलिस उपअधीक्षक मदने यांनी सांगितले.

बेलापूर( प्रतिनिधी )- उक्कलगाव शिवारात शेती महामंडळाच्या जमिनीत मनुष्याच्या  हाडाची कवटी सापडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे                    याबाबत मिळालेली माहिती अशी की उक्कलगाव खंडाळा रोडवर शेती महामंडळाची गट नंबर 312 या जमिनीत ही मानवी हाडांची कवटी दिसून आली उक्कलगाव येथील दिलीप मारुती थोरात हे खंडाळा मार्गे उक्कलगावला जात असताना शेती महामंडळाच्या गट नंबर 312 मध्ये रस्त्याच्या कडेला लघवी करण्याकरिता उभे राहिले असता त्यांना तेथे मानवी हाडांची कवटी दिसली त्यानुसार त्यांनी तातडीने बेलापूर पोलीस स्टेशनला खबर दिली घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तसेच बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदेवे कॉन्स्टेबल पोपट भोईटे निखिल तमनार बाळासाहेब गुंजाळ आदींनी तातडीने  घटनास्थळी भेट दिली ती मानवी हाडाची  कवटी ताब्यात घेतली ही घटना परिसरात समजतात सर्वत्र खळबळ उडाली आहे नेमकी या नेमकी याठिकाणी ही मानवी हाडांची कवटी कशी आली याबाबत तर्कवितर्क केले जात आहे जंगली प्राण्याने हे या कवटीचे माणूस खाल्लेले असून हा घातपाताचा प्रकार आहे किंवा कसे काय याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी देखील  घटनास्थळाला भेट दिली आहे

बुलडाणा- (कासिम शेख) 25 नोव्हे
  रस्ता बांधकाम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या सैलानी येथील घर कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही तर घरातील लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान झाले आहे.
     बुलडाणा जिल्ह्यातील हातणी ते जालना जिल्ह्यातील भोकरदनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याचे काम सुरु आहे.धार्मिक स्थळ सैलानीतून हा मार्ग जात असल्याने सैलानीमध्ये रोडचे खोदकाम सुरु आहे.ठेकेदाराकडून खोदकाम कुठे कमी तर कुठे जास्त करण्यात येत आहे. सैलानी येथील मो.नफीस हाजी मो.अय्यूब यांच्या घराला कोरुन रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर रोजी पूर्ण घरच कोसळला. या घरात गावातील विद्यार्थी अभ्यास करतात. सुदैवाने घर कोसळण्याच्या वेळी घरात कोणीही नव्होता.घरमालक मो.नफीस हे इलेक्ट्रिक कंत्राटदार असल्याने त्यांचे इलेक्ट्रिकचे मोठे साहित्य ठेवलेले होते. घर पडल्याने लाखोंचे पूर्ण सहित्याचे नुकसान झाले.  नुकसान भरपाई देण्याची मागणी मो.नफीस यांनी संबंधिताकडे केली आहे.

   
भाविकांना होत आहे नाहक त्रास

हातणी ते भोकरदनपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु होऊन बरेच दिवस झाले. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. संपूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे. रस्ता खोदल्याने पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचला होता. त्यामुळे चिखली-सैलानी मार्गावरील जड वाहतूक बंद आहे. चिखली आगाराची बससेवा बंद असल्याने अमरावती, नागपूर, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या भागातून येणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. वाहतूक बंद असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येऊ शकत नाही. दरम्यान सैलानी येथे रस्ता बांधकाम करताना घरे कोरुन रस्ता बनविण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून रविवारी सैलानीत एक घर कोसळले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र घरातील सदस्य घाबरलेले आहेत.


चोरीच्या गौणखनिजचा कामात वापर?

या रासत्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गौणखनिज वापरली जात आहे.या बद्दल विश्वसनीय सूत्राकडून अशी माहिती मिळाली की काही ठिकाणाहुन गौणखनिज मुरुम आनल्या जात आहे पण त्याची रायल्टी कमी ब्रासची काढली आहे तर उत्खनन मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे.सदर रायपुर ते दुधा परिसरातील खोदन्यात आलेल्या ठिकाणचे महसूल विभागाकडून मोजमाप करुण संबंधित ठेकेदारावर कारवाई होने गरजेचे आहे.

अहमदनगर - कोतवाली पोलिसांनी धकेबाज कामगिरी केली आहे. कायनेटिक चौक, इलाक्षी शोरूम मागे, यशोधन हॉटेल जवळ एका खोलीत स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 17 जणांना रेडहॅन्ड पकडले. यावेळी जुगाराच्या साहित्यासह 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की इलाक्षी शोरुमचे मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ चालू आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी या ठिकानी छापा टाकला. यामध्ये 17 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर महा.जु.का.कलम ४, ५ प्रमाणे पोकॉ शाहीद सलीम शेख, नेमणुक- कोतवाली पोलीस स्टेशन, यांनी फिर्याद दाखल केली. यामध्ये आरोपी बंडु मिठ्राव दारूनकर वय-४३ रा.वाघमळा, सावेडीगाव.सुशांत संजय फुंदे वय-२८ रा.सुर्यानगर, सनि पॅलेस, पोपट भानुदास मोरे वय-४० रा.अंबिका हॉटेलसमोर,केडगाव, ज्ञानेश्वर मन्छिंद्र दौडकर वयः ३२ वर्षे रा. मारुती मंबिराजवळ, तोफखाना, मुकेश प्रताप कंडारे वय-३१ रा. सर्जेपुरा, जेजेगलली, आरीफ मेहबुब शेख वय-४२ वर्षे रा.शांती कंस्ट्रक्शन, गोंविदपुरा, श्रीकांत धोंडीराम फसले वय-३३ वर्षे रा.दिपनगर, भुषणनगर, केडगाव, प्रशांत रामदास भुसारे वय- २७ वर्षे रा.कापरेमळा,केडगाव,गणेश पोपट लॉढे वय-२९ वर्षे रा.कापरेमळा, केडगान, अनिल वामोवर सातपुते वय-३८ वर्षे रा.शाहूनगर, पारनेर जि.अहमदनगर. पोपट रामभाऊ औटी वय-५८ वर्षे रा. सुतारगलली, पारनेर, इमाम इब्राहीम पठाण वय-६२ वर्षे रा. अचना हॉटेलमागे केडगाव, मनोहर बिश्काथ कोडम वय-४४ वर्षे रा.नित्यसेवा हासिंग सोसा, वसंत टेकडी, सावेडी, किरण बबनराव मुके वय-६७ वर्षे रा.गणेशनगर, कलयाणरोड, सचिन सुरेश दिवाने वय-३३ वर्षे रा.साईराम सोसा, कलगाणरोड, राविन काशिनाथ उदगीरकर वय-३६ वर्षे रा. बालीकाश्रम शाळेच्यमागे,बालीकाश्रम रोड, विजय ज्ञानदेव गायकवाड वय-३० वर्षे रा.बोहरीचाळ, रेलवेस्टेशन,कायनेटीक चौक, हे इलाक्षी शोरुमचे मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून १,३५,३०० रुपये त्यात १०,३०० रुपये रोख रक्कम व १,२५,००० रुपयांचे मोबाईल व एक करीझमा मोटारसायकल व तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे पत्ते, जुगाराचे साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला

पुणे : पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्ररदारांसोबतच गैरवर्तन करत त्यांना धमकवणाऱ्या तसेच लाच लुचपत विभागाने कारवाई व गुटख्याचे गोडाऊन फॊडणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. तर दोन कर्मचारी निलंबित केले आहे. धडक करवाई साठी प्रसिद्ध असणारे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.पोलीस शिपाई हुकूमसिंग रामसिंग भाटी व पोलीस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड अशी पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या कार्मचाऱ्यांची नावे आहेत. तर, पोलीस हवालदार श्रावण प्रभू गुपचे आणि पोलीस नाईक नितीन मधुकर कदम अशी निलंबित केलेल्या कार्मचाऱ्यांची नावे आहेत.हुकूमसिंग भाटी हे मुख्यालयात नेमणुकीस होते. यापूर्वी मुंबईत नोकरीस होते. त्यावेळी २००२ मध्ये त्यांच्यावर मुंबई लाच लुचपत विभागात ४२०, १२० (ब) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे हे कृत्य विकृत व घृणास्पद असून पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. २२ नोव्हेम्बर) अधीक्षक पाटील यांनी त्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.तर पोपट गायकवाड हे पुणे ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस होते. दरम्यान मे महिन्यात त्यांना कोल्हापूर येथील एका गुन्ह्याच्या तापासाठी पाठविण्यात आले होते. परंतु, गायकवाड हे गैरहजर राहिले. तसेच परवानगी न घेता अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावी गेले. तेथे साथीदारांच्या मदतीने गुटख्याचे गोडाऊन फोडले आणि ५ लाख रुपयांचा गुटखा बेकायदेशीर रित्या आणून तो विक्री केला. त्यांचे हे कृत्य पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे असल्याने त्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
तर हवालदार श्रावण गुपचे यांनी दौड पोलीस ठाण्यात कर्तव्यास असताना एका तक्रारदारालाच लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. हा प्रकार जुलै महिन्यात घडला होता. याबाबत त्यांच्यावर दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची गंभीर दाखल घेऊन पाटील यांनी गुपचे यांना सेवेतून निलंबित केले आहे. तसेच पोलीस नाईक नितीन कदम हे पौड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मद्यपान केले. त्याचा व्हिडिओ इन्स्ट्राग्रामवर व्हायरल झाला होता. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. याची शहानिशा केल्यानंतर कदम याना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांना सुरक्षित वातावरण आणि तात्काळ सहकार्य देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

बुलडाणा- 22 नोव्हे
जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम कुंभारी शिवारामध्ये बालू खांडेभराड यांच्या शेतामध्ये अवकाशातून एक यंत्र आज सकाळी दिसून आला. त्या यंत्रांमध्ये एक मोठ्या प्रकारचा बलून फुगा होता व त्याखाली काही इलेक्ट्रॉनिक सामग्रीचे सर्किट असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रथम घबराटीचे वातावरण तयार झाले होते.
      सदर घटनेबाबत ग्राम कुंभारी येथील काही नागरिकांनी पोलिस स्टेशन देऊळगाव राजा यांना माहिती देऊन सदर प्रकार सांगितला. ही घटना दिनांक 22 रोजी सकाळी सात
साडेसातच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. यावेळी कुठल्या प्रकारचे यंत्र आहे किंवा दुसरा काही प्रकार आहे अशा संभ्रमात परिसरातील नागरिक शेतकरी होते मात्र सदर घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील खेडेकर, तलाठी देशपांडे आणि इतर कर्मचारी यांनी घटनास्थळावर जाऊन सदर यंत्राची तपासणी केली. त्यानंतर सदरचे यंत्र पोलीस आणि महसूल विभाग यांनी पंचा समक्ष ताब्यात घेऊन स्थानिक नागरिकांचा संभ्रम दूर केला. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व तलाठी देशपांडे यांना विचारणा केली असता सदर चे यंत्र पर्जन्यमापक यंत्र असू शकते, हवामान खात्याचा अंदाज घेण्यासाठी अशा प्रकारचे यंत्र बलून किंवा फुग्या द्वारे अवकाशात सोडण्यात येते. याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, पुढील कार्यवाही आणि या यंत्राबाबत सविस्तर माहिती प्रशासन घेत आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी आज दुपारी छापा टाकला. या छाप्यात एक महिलेला ताब्यात घेतले आहे. तर एका पिडीत बांग्लादेशीय तरूणीची सुट्का कारण्यात आली आहे. कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली पोलीस उपधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तारकपूर परिसरात एका अपार्टमेन्टमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्रीशीर माहिती मिटके यांना मिळाली.त्यानुसार कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. सुरवातीला दोघांना डमी ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्यांना तेथे वेश्या व्यवसाय सूरू असल्याचे आढळून आले. पोलिसांची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी (दि.22) रोजी दुपारी तेथे छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) अपहरण करून त्यानंतर एक 21 वर्षीय तरुणी हातपाय बांधलेल्या, तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या नग्न अवस्थेत विळद परिसरात रेल्वे रूळावर पोत्यात आढळ्ल्याची धक्कादायक घटना काल गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली. या तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशयही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. त्यामुळे याप्रकरणाचा छडा त्वरित पोलिसांनी लावावा अशी मागणी होत आहे.ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणीची पोत्यातून सुटका केली. याबाबत रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांनी वस्तुनिष्ठ तपास केल्यास धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. विळद परिसरातील रेल्वे रूळावर एका तरुणीला नग्न अवस्थेत, हात-पाय बांधून पोत्यात घालून आणून टाकले होते. याची माहिती कळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तरुणीला पोत्यातून बाहेर काढले. कपडे घालण्यास दिले.तसेच विळद ग्रामपंचायतचे सदस्य संदीप जगताप, दगडू जगताप यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, ही तरूणी पाथर्डी परिसरातील असून ती सध्या शेंडीबायपास परिसरात वास्तव्यास असल्याचे समजले. ही तरूणी गुरूवारी (दि. 21) गजानन कॉलनीत भाजी आण्यासाठी गेली होती. त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून माझे अपहरण चौघांनी केल्याची माहिती या तरूणीने उपस्थितांना दिली. त्यामुळे या प्रकरणाची गाभीर्य वाढले आहे. तीचे हात-पाय बांधलेले होते. यामहिलेची अवस्था पाहता तीच्यावर अत्याचार झाल्याचा संशय काहींनी व्यक्त केला.

बुलडाणा- 21 नोव्हे
रस्ता सुरक्षा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. रस्त्यांवरील अपघातामध्ये जिल्ह्यात ऑक्टोबर अखेर 270 जणांनी आपले प्राण गमविले आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व अन्य निर्माणाधीन रस्त्यांवर संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांनी दुरूस्ती, खड्डे बुजविणे, सुरक्षा नियमांची व्यवस्था करावी. रस्ता सुरक्षेप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित यंत्रणाप्रमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती प्रमुख डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.
       जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांना सातत्याने गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, रस्ता सुरक्षा हा सध्याचा ऐरणीवर असलेला विषय आहे. या विषयाशी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने काम करायला पाहिजे. समिती कामकाजासंबंधित अहवाल, अपघात घडल्यानंतर देण्यात येणारा संयुक्त अहवाल विनाविलंब सादर करावेत. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर संबंधित यंत्रणेने नियंत्रण ठेवावे. काम सुरू असताना नागरिकांना त्रास होणार नाही, अपघात घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कंत्राटदार काम करीत नसल्यास देयकांची अदायगी थांबवावी.
     रस्ता काम सुरू असलेल्या यंत्रणांनी दर आठवड्याला सदर रस्ता कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती यांनी मलकापूर ते खामगांव रस्ता कामाचे सुधारीत निवीदा होईपर्यंत या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे फलक लावावेत. मेहकर फाटा ते चिखली शहर रस्त्‌याचे काम गतीने पुर्ण करावे. कंत्राटदराने विहीत कालमर्यादेत दर्जेदार काम करून रस्ता पुर्ण करावा. याप्रसंगी संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार व यंत्रणांवर रस्ता कामांबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.बैठकीत रस्तानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- दुसर्याच्या घरात डोकावणे एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला चांगलेच महागात पडले असुन बेलापूरच्या बाजारपेठेत सकाळी सकाळी झालेल्या भांडणाची गावात चांगलीच चर्चा चालू आहे             गावातील भाजपा पदाधिकार्याच्या घरात कुरापती करण्याचा प्रयत्न एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केला घरातील आर्थिक व्यवहारा विषयी त्याने भाजपा पदाधिकार्याच्या घरच्यांना फोनवर सांगितले  यावरुन भाजपा पदाधिकार्याच्या घरात वाद निर्माण झाले या वादास कारणीभूत गावातीलच काँग्रेसचा तो कार्यकर्ता असल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्याने त्यास शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कार्यकर्ता सापडला नाही अखेर आज सकाळीच तो कार्यकर्ता बेलापूरच्या मुख्य बाजारपेठेत आल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्याने आमच्या घरात भांडणे लावतोस काय अशी विचारणा करुन त्या कार्यकर्त्याची चांगलीच धुलाई केली कशी बशी सुटका करुन त्या कार्यकर्त्याने तेथुन पळ काढला या वेळी मोठा जमाव जमा झाला होता

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget