पुणे : पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्ररदारांसोबतच गैरवर्तन करत त्यांना धमकवणाऱ्या तसेच लाच लुचपत विभागाने कारवाई व गुटख्याचे गोडाऊन फॊडणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. तर दोन कर्मचारी निलंबित केले आहे. धडक करवाई साठी प्रसिद्ध असणारे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.पोलीस शिपाई हुकूमसिंग रामसिंग भाटी व पोलीस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड अशी पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या कार्मचाऱ्यांची नावे आहेत. तर, पोलीस हवालदार श्रावण प्रभू गुपचे आणि पोलीस नाईक नितीन मधुकर कदम अशी निलंबित केलेल्या कार्मचाऱ्यांची नावे आहेत.हुकूमसिंग भाटी हे मुख्यालयात नेमणुकीस होते. यापूर्वी मुंबईत नोकरीस होते. त्यावेळी २००२ मध्ये त्यांच्यावर मुंबई लाच लुचपत विभागात ४२०, १२० (ब) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे हे कृत्य विकृत व घृणास्पद असून पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. २२ नोव्हेम्बर) अधीक्षक पाटील यांनी त्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.तर पोपट गायकवाड हे पुणे ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस होते. दरम्यान मे महिन्यात त्यांना कोल्हापूर येथील एका गुन्ह्याच्या तापासाठी पाठविण्यात आले होते. परंतु, गायकवाड हे गैरहजर राहिले. तसेच परवानगी न घेता अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावी गेले. तेथे साथीदारांच्या मदतीने गुटख्याचे गोडाऊन फोडले आणि ५ लाख रुपयांचा गुटखा बेकायदेशीर रित्या आणून तो विक्री केला. त्यांचे हे कृत्य पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे असल्याने त्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
तर हवालदार श्रावण गुपचे यांनी दौड पोलीस ठाण्यात कर्तव्यास असताना एका तक्रारदारालाच लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. हा प्रकार जुलै महिन्यात घडला होता. याबाबत त्यांच्यावर दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची गंभीर दाखल घेऊन पाटील यांनी गुपचे यांना सेवेतून निलंबित केले आहे. तसेच पोलीस नाईक नितीन कदम हे पौड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मद्यपान केले. त्याचा व्हिडिओ इन्स्ट्राग्रामवर व्हायरल झाला होता. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. याची शहानिशा केल्यानंतर कदम याना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांना सुरक्षित वातावरण आणि तात्काळ सहकार्य देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
Post a Comment