बुलडाणा- 27 नोव्हे.रस्ता बांधकाम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सैलानी येथील घर कोसळल्या प्रकरणी रायपुर पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील हातणी ते जालना जिल्ह्यातील भोकरदनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याचे काम सुरु आहे.धार्मिक स्थळ सैलानीतून हा मार्ग जात असल्याने सैलानीमध्ये रोडचे खोदकाम सुरु आहे.ठेकेदाराकडून खोदकाम कुठे कमी तर कुठे जास्त करण्यात येत आहे. सैलानी येथील मो.नफीस हाजी मो.अय्यूब यांच्या घराला कोरुन रस्ता खोदण्यात आल्याने त्यांचा घर तकलादु झाला व 24 नोव्हेंबर रोजी एक मजला घर पूर्णपणे कोसळला. या घरात गावातील विद्यार्थी अभ्यास करतात. सुदैवाने घर कोसळण्याच्या वेळी घरात कोणीही नव्होता.घरमालक मो.नफीस हे इलेक्ट्रिक कंत्राटदार असल्याने त्यांचे इलेक्ट्रिकचे मोठे साहित्य ठेवलेले होते व घर पडल्याने जवळपास 18 ते 20 लाखाचे नुकसान झाले सदर रोडच्या कामात हलगर्जी करणारी कंपनी साकार इंफ्रास्ट्रक्चर यांनी जाणून बुजुन घराचे नुकसान केले अशी तक्रार घर मालक शेख अय्यूब शेख दगडु यांनी दिल्यामुळे संबंधित कंपनीवर रायपुर पोलीस ठाण्यात भादवी ची कलम 427 प्रमाणे एनसी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सैलानीत मार्गाच्या कामासाठी झालेल्या खोदकामामुळे घरासमोर 10 फुट खोल खड्डे पडले असून घरातील लहान,वयो व्रुद्ध लोकांना ये जा करण्यास मोठा त्रास होत आहे तर अनेक घर या खोदकामाने तकलादु झाले आहे व त्यांना धोका निर्माण झालेला आहे.अश्या घरात राहणारे लोक घाबरलेले आहे.या कडे एनएचए चे अधिकारी व ठेकेदाराने लक्ष देणे गरजेचे आहे.
Post a Comment