बुलडाणा- 27 नोव्हे.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बदनापुर येथील वैजनाथ बोरकर या शेतकरी सह इतर 15 शेतकऱ्यांना शेतात काम करीत असतांना अचानकपणे शेतात येवून अवैध सावकार वामन आसोले यांनी भाडोत्री गुंड आणून जीवघेणा हल्ला केला असा आरोप जख्मी शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यात 15 शेतकरी जख्मी झाले असून यातील काही शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बदनापुर येथील अवैध सावकार वामन आनंदा आसोले याने आज 27 नोव्हेबर रोजी साकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक 30 ते 35 जनानी लोखंडी रॉड व लाठ्या काठयानी बेदम मारहाण केली यात सर्व 15 शेतकरी जख्मी झाले असून जख़्मी मध्ये तीन महिलांचा तर 12 पुरुषांचा समावेश आहेत.या जख्मीतील 4 जणांना बुलडाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले
आहे.ही घटना मेहेकर तालुक्यातील असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य शेतकरी सावकारी पाशात अडकले असून त्यांच्या दादागिरीला कंटाळून काही शेतकरयानी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत.या घटनेची तक्रार मेहकर पोलिसांनी नोंदवून न घेतली नाही असा आरोप पीडितांनी केला आहे.घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाणेदार यांनी जख़्मीचा बयान नोंदविन्यात आले आहे. शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळेल याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.मेहकर ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्याशी फोन माहिती घेतली असता ते म्हणाले की गुन्हा नोंदविन्याची प्रक्रीया सुरु असून एकमकां विरोधात गुन्हा दाखल होणार आहे.
Post a Comment