नाशिकरोड | प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील शिंदे गावात एका गाळ्यात पोलीस आणि अन्न पुरवठा अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गाळा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.अधिक माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील लोहिया कंपाउंडमध्ये असलेल्या एका गाळ्यात अनधिकृत तंबाखू, गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तालयातील विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांच्या पथकाने शिताफीने दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे, शिरसाठ, वाघ, पवार, गवळी अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.पाटील यांच्या पथकाने केली. छाप्यात विविध नावांचा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी गाळा मालक रामविलास शिवणारायन लोहिया याच्या विरोधातनाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment