बेलापूर (प्रतिनिधी )- चांदेगाव ता .राहुरी येथील एका इसमावर झोपेतच खूनी हल्ला करण्यात आला असुन त्या हल्ल्यातुन तो तरुण बालबाल बचावला त्याचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार चालु आहे चांदेगाव भोसले वस्ती येथील गौतम मंजाबापु भोसले हे झोपेत असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तोडं बांधलेल्या व्यक्तीने घरात प्रवेश केला व गौतम यांचा गळा विळ्याच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला जागसुद असलेल्या गौतमने त्यास विरोध करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर ईसम विळा जागेवरच टाकुन पसार झाला जखमी गौतम यास तातडीने साखर कामगार हाँस्पिटलला दाखल करण्यात आले असुन त्याच्या गळ्याला चिरल्यामुळे २२ टाके पडले आहे गौतम हा जागा आसल्यामुळे थोडक्यात
बचावला हल्ला करणाराने नियोजन बध्द रितीने हल्ला केल्याचे स्पष्ट होत आहे हल्ला करण्याकरीता नविन विळा आणलेला असुन तो खास विळी नेवासा येथील आणला असावा असे दिसते हा हल्ला नेमका कोणत्या हेतुने करण्यात आला हे स्पष्ट होत नसले तरी हल्ला करणाराचा हेतु हत्या करणे असल्याचे स्पष्ट होत आहे
Post a Comment