अहमदनगर (प्रतिनिधी) राहाता पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पोलीस हवालदार अजित पठारे गंभीर जखमी केल्या प्रकरणातील पसार झालेल्या आणखी एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथून अटक केली आहे. अमित उर्फ सुरेंद्र विजय सांगळे (वय- 35 रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.नोव्हेंबरला पोलीस हवालदार रशिद बादशहा शेख व अजित पठारे हे खाजगी दुचाकीवरून राहाता शहरात शासकीय नोटीस बजावण्यासाठी जात होते. दुपारीच्या वेळी चितळे रोडवर गर्दी असलेल्या ठिकाणी दोन इसम तोंडाला रुमाल बांधलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते गंठणचोर असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांना अडविण्यात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यात पोलीस पठारे हे गंभीर जखमी झाले होते.पोलिसांनी गावठी कट्ट्यासह आरोपी श्रीरामपुरातील शिरसगावच्या सचिन ताकेला ताब्यात घेतले होते. तर एक आरोपी पसार होता. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पसार आरोपी अमित सांगळे हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, पोलीस हवालदार सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, दत्ता गव्हाणे, संदीप पवार, संतोष लोढे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप दरंदले, मच्छिंद्र बर्डे, बबन बेरड, सचिन कोळेकर यांनी मिळून तळेगाव ढमढरे येथे सापळा लावून आरोपीस शिताफीने अटक केली. गुन्ह्याबातत त्याने कबूली दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.संगमनेर, राहुरी, लोणीत गुन्हे अटक केलेला आरोपी अमित सांगळे यांच्याकडे पोलिसांनी विचार केली असता इतर ठिकाणी गंठण चोरी केलेल्या गुन्ह्यांची उकल झाली. सांगळे याने गोळीबारात अटक केलेल्या आरोपी सचिन लक्ष्मण ताके यांच्या साथीने संगमनेर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन, राहात्यातील लोणी आणि राहुरीत गंठण चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
Post a Comment