बेलापूर( प्रतिनिधी )- उक्कलगाव शिवारात शेती महामंडळाच्या जमिनीत मनुष्याच्या हाडाची कवटी सापडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की उक्कलगाव खंडाळा रोडवर शेती महामंडळाची गट नंबर 312 या जमिनीत ही मानवी हाडांची कवटी दिसून आली उक्कलगाव येथील दिलीप मारुती थोरात हे खंडाळा मार्गे उक्कलगावला जात असताना शेती महामंडळाच्या गट नंबर 312 मध्ये रस्त्याच्या कडेला लघवी करण्याकरिता उभे राहिले असता त्यांना तेथे मानवी हाडांची कवटी दिसली त्यानुसार त्यांनी तातडीने बेलापूर पोलीस स्टेशनला खबर दिली घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तसेच बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदेवे कॉन्स्टेबल पोपट भोईटे निखिल तमनार बाळासाहेब गुंजाळ आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली ती मानवी हाडाची कवटी ताब्यात घेतली ही घटना परिसरात समजतात सर्वत्र खळबळ उडाली आहे नेमकी या नेमकी याठिकाणी ही मानवी हाडांची कवटी कशी आली याबाबत तर्कवितर्क केले जात आहे जंगली प्राण्याने हे या कवटीचे माणूस खाल्लेले असून हा घातपाताचा प्रकार आहे किंवा कसे काय याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली आहे
Post a Comment