राहुरीत दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांवर हल्ला. श्रीरामपूर, संगमनेर, नगरचे चोघे जेरबंद; दोघे पसार.

राहुरी (तालुका प्रतिनिधी)-राहुरी शहरात काल सोमवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना जेरबंद करण्यासाठी पहाटे सव्वातीन वाजता पोलीस पथक गेले. पोलीस पथक पाहताच दरोडेखोरांनी थेट पोलिसांवरच विटांच्या तुकड्यांनी हल्ला चढविला. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावत चार अट्टल दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने पकडले. मात्र दोन दरोडेखोर पसार झाले. त्यांचा शोध सुरू आहे.दरोड्याचे साहित्य, दोन दुचाकीसह एक लाख 42 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. एका चारचाकी वाहनातून दोघे पसार झाले. सागर गोरख मांजरे (वय 22, रा. पाईपलाईन रस्ता, यशोदानगर जवळ, नगर), अविनाश अजित नागपुरे (वय 20, रा. भिंगार, ता. नगर), काशिनाथ मारुती पवार (वय 37, रा. बजरंगवाडी, ता. संगमनेर), गणेश मारुती गायकवाड (वय 24, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पसार दोन आरोपींची नावे अद्याप समजलेली नाहीत. आरोपींकडून गॅस कटर, एक कमर्शियल एलपीजी सिलेंडर, एक ऑक्सिजन गॅस सिलेंडर, एक तलवार, टॉमी, लोखंडी कटावणी, लोखंडी कात्री, लोखंडी गज, लोखंडी पोखर, लोखंडी सुरा, चार मोबाईल, दोन दुचाकी असे साहित्य जप्त केले.याबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सांगितले की, गोकुळ कॉलनी येथे पहाटे तीन वाजता एका मोबाईल शॉपीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दरोडेखोरांची टोळी उभी असल्याची माहिती राहुरी पोलिसांना समजली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक यशवंत राक्षे, कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, सुनील शिंदे, सोमनाथ जायभाये, सुशांत दिवटे, रवींद्र मेढे, अमित राठोड, गृहरक्षक दलाचे जवान सतीश कुलथे, ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.दोन दुचाकी, एक चारचाकी वाहन व दरोडेखोरांची टोळी कामगिरीच्या तयारी होती. पोलीस पथकाला पाहिल्यावर जवळच असलेल्या विटांच्या ढिगार्‍यातून विटांचे तुकडे पोलिसांच्या दिशेने फेकून दरोडेखोरांनी धूम ठोकली. मात्र यातील एकास पोलिसांनी पकडले. दरोडेखोरांचा पोलीस पथकाने पाठलाग सुरू केला. एकाला व्यापारी पेठ, एकाला राहुरी खुर्दच्या मुळा नदीवरील पुलाच्या जवळ, एकाला राहुरी फॅक्टरीच्या दिशेने धसाळ पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी पकडले.दरोडेखोरांचा म्होरक्या असलेला सागर मांजरे हा श्रीरामपूर येथील बालाणी यांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणातून दीड महिन्यापूर्वी श्रीरामपूर कारागृहातून सुटलेला आहे. त्याच्यावर श्रीरामपूर, तोफखाना (नगर) व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वी राहुरी एमआयडीसी जवळील सागर गुंजाळ यांच्या दुकानातून गॅस कटर व सिलेंडर चोरल्याची कबुली मांजरे याने दिली. इतर तीन दरोडेखोरांवरील गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असेही पोलिस उपअधीक्षक मदने यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget