December 2023

बेलापूरः(प्रतिनिधी  )-माजी जि.प.सदस्या श्रीमती कमलाबाई भागवतराव खंडागळे(वय ९७)यांचे रविवारी वृध्दपकाळाने निधन झाले.                                                                              श्रीमती खंडागळे यांना सामाजिक धार्मिक  तसेच राजकीय कार्याची आवड होती.सन १९९२ ते १९९७ या कालावधीत त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या.                             बेलापूरात त्यांनी महिलांचे भजनी मंडळ,महिला मंडळ स्थापन केले होते.श्रीमती कमलाबाई खंडागळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष  अॕड.बाळासाहेब खंडागळे,एम.पी.सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे,बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांच्या मातोश्री तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे  उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या त्या आजी होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,जावई,सुना,नातवंडे,नातसुना असा मोठा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी बेलापुर येथील अमरधाम येथे झाला यावेळी विविध क्षेञातील मान्यवर  उपस्थित होते.

खंडाळा (गौरव डेंगळे):अयोध्या धाम येथून श्रीराम मंदिराच्या अक्षदा अनगोळमध्ये कलशातून आल्या आहेत. खंडाळा येथील मारुती मंदिर येथे पूजा,अर्चा व प्रभू रामचंद्राच्या आरती करून रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला.श्रीराम अनिश डेंगळे,लक्ष्मण शौर्य नगरकर, सितामाता श्रावणी नगरकर तर हनुमान साईराज नगरकर यांनी भूमिका साकारल्या. त्यानंतर सवाद्य अनगोळ मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणपती रोड, म्हसोबा मंदिर, भगवती माता मंदीर, ढोकचौळे गल्ली, मारुती मंदिर येथे या मिरवणुकीची सांगता झाली. मारुती मंदिरामध्ये अक्षदा कलश ठेवण्यात आला. मारुती मंदिरमधून उपकलश तयार करून अक्षता गावातली प्रत्येक घरी पाठविण्यात येणार आहेत. प्रत्येकाच्या घरी अक्षता पोहोचवून अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमंत्रण दिले जाणार आहे. २२ जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या तारखेला दाखल व्हावे. प्रत्येक गावोगावी २२ जानेवारीला दिवाळी साजरी करावी. आज खंडाळा गावात प्रभू रामचंद्रमय वातावरण तयार झालेलं सर्वांना बघायला मिळाले. या भव्य दिव्य अशा अक्षदा कलश यात्रेसाठी हजारोचे संख्येने माता-बहिणी व पुरुष वर्ग उपस्थित होता.

कोपरगाव प्रतिनिधी): आज दि.  30/12/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना  गुप्त बातमी धारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे  . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय  येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत तसेच 1) मनोज चंद्रकांत गिरमे वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव 2) अल्ताफ बाबू शेख - वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन  येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.  

*सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रदीप देशमुख, psi भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे, इरफान शेख, अशोक शिंदे, श्याम जाधव, गणेश काकडे , तावरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे  यांनी केली आहे.*

पाथर्डी (गौरव डेंगळे): पाथर्डी येथे एन व्ही नेट क्लबच्या वतीने ४० वर्षा पुढील खेळाडूंसाठी भव्य लेदर बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आज साखळीतील उपांत्य फेरीच्या  सामन्यांमध्ये वयाच्या पन्नाशीत बॉबी बकालने फक्त ६१ चेंडूत १०२ धावांची झंजावती खेळी करत अशोक जिमखाना संघाला एक हाती विजय मिळवून दिला.आज बॉबीने जुन्या आठवणी ताजा करत सलामीला येऊन १०२ धावांची वादळी खेळी केली,या खेळीत बॉबीने १३ चौकार व ४ षटकार खेचला. बॉबीला सुरेश भोसलेने ३९ धावांची खेळी करत बहुमूल्य साथ दिली. या दोघांच्या सुरेख खेळीच्या जोरावर अशोक जिमखाना संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ३ गडी बाद २१३ धावा फटकावल्या. २१४ धावांचे आवहान घेऊन मैदानात उतरलेला पाथर्डी लेजंड संघाने १५ व्या षटकात सर्व गडी बाद ९४  धावा करू शकला व सामना अशोक जिमखाना संघाने ११९ धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.पाथर्डी लेजंड संघाकडून पापू यामे यांनी सर्वाधिक ३२ धावांची योगदान दिले. १०२ धावांची खेळी करणारा बॉबी सामनाविर म्हणून गौरवण्यात आला.

पाथर्डी (गौरव डेंगळे): पाथर्डी येथे एन व्ही नेट क्लबच्या वतीने ४० वर्षा पुढील खेळाडूंसाठी भव्य लेदर बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आज साखळीतील तिसऱ्या सामन्यांमध्ये वयाच्या पन्नाशीत बॉबी बकालने ८८ धावांची वादळी खेळी करत अशोक जिमखाना संघाला एक हाती विजय मिळवून दिला.आज बॉबीने जुन्या आठवणी ताजा करत सलामीला येऊन नाबाद ८८ धावांची वादळी खेळी केली,या खेळीत बॉबीने १६ चौकार व १ षटकार खेचला. बॉबीला राहुल पटारेने ५९ धावांची खेळी करत बहुमूल्य साथ दिली. या दोघांच्या सुरेख खेळीच्या जोरावर अशोक जिमखाना संघाने निर्धारित १८ षटकांमध्ये ४ गडी बाद २०० धावा फटकावल्या. २०१ धावांचे आवहान घेऊन मैदानात उतरलेला एमसीसी संघाने निर्धारित १८ षटकारांमध्ये ८ गडी बाद १५० धावा करू शकला व सामना अशोक जिमखाना संघाने ५० धावांनी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.एमसीसी संघाकडून साईराज साबळे यांनी सर्वाधिक ३६ धावांची योगदान दिले. जिमखाना संघाकडून महेश कांबळेने ४ गडी बाद केले.८८ धावांची नाबाद खेळी करणारा बॉबी सामनाविर म्हणून गौरवण्यात आला.

बेलापूर ( वार्ताहर ) श्रीरामपूर प्रवरा नदी पात्रात.महसूल पथकाने गुरुवारी दुपारी अवैध वाळू उपसा करण्यासाठी  वापरण्यात येणाऱ्या ३ चप्पू जेसीबीच्या तोडफोड करून पूर्णपणे नष्ट केले.प्रवरा नदीकाठवरील कडीत (ता.श्रीरामपूर ) हद्दीतून १ चप्पू गुहा (ता.राहूरी) गावाच्या हद्दीलगतच्या २ चप्पू दोरीने  वाळू तस्कारांनी बांधून ठेवले होते.३ चप्पू तोडून टाकून महसूल पथकाने नष्ट करून कारवाई केली.                    अनेक दिवसांपासून कडीत येथे अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसुल प्रशासनाला मिळाली.तालुक्यातील प्रवरा नदीकाठी अवैधरित्या वाळुची खुलेआम वाहतूक सुरू होती.गुरूवारी दुपारपासून महसुल पथकाने प्रवरा नदीपात्रात कारवाई केली त्या वेळी प्रवरा नदी पात्रातुन वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारे ३ चप्पू पकडण्यात आले.
 ते जेसीबीच्या सहाय्याने तोडून नष्ट करण्यात आले.श्रीरामपुरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार महसुल पथकाने कडीत येथील प्रवरा नदीपात्रात धडक कारवाई केली.विशेष म्हणजे भरलेले चप्पू नदीपात्राकडेला वाळू तस्कारांनी कटवनात लपून ठेवले होते.त्यामुळे प्रशासनासमोर ते काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.मात्र अट्टल पोहणाऱ्याच्या मदतीने ३ चप्पू नदीपात्राबाहेर काढत तोडून टाकण्यात आले.पथकाच्या सुगावाने अवैध वाळु उपसा करणारे मात्र पसार झाले.शासनाने सहाशे रुपयात वाळू देण्याचे धोरण सुरु केले असले तरी आजही कडीत पासुन ते भेर्डापूर पर्यत अनेक ठिकाणी वाळू उपसिसा केला जात आहे काही ठिकाणी वाळू उपसा करुन गाढवाच्या सहाय्याने बाहेर काढली जाते तेथेही कारवाई या पथकात मंडलाधिकारी बी.के मंडलिक,उक्कलगावचे तलाठी इम्रानखान इमानदार मांडवेचे तलाठी हिमालय डमाळे शहाजी वडितके संतोष पारखे कडीतचे पोलीस पाटील कारभारी वडितके यांच्या आदी कर्मचारी सहभागी झाले.यावेळी रावसाहेब वडितके भाऊसाहेब वडितके कडीतचे सरपंच यांचे पती पाडुरंग वडितके उपस्थित होते.

भुवनेश्वर (गौरव डेंगळे):भुवनेश्वर ओडिसा येथे संपन्न झालेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सीबीएसई संघाने प्रथम क्रमांक मिळविला.१४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २१ ते २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत २८ राज्यांनी सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या

सीबीएसई संघामध्ये मिलेनियम नॅशनल स्कूल पुणे शाळेतील ९ खेळांडू खेळत होते.सीबीएसई महाराष्ट्र संघाने राजस्थान,दिल्ली,मध्यप्रदेश या राज्यांचा साखळी सामन्यांमध्ये पराभव केला.उपांत्य फेरीचा लढतीत बलाढ्य तमिळनाडू संघाचा रंगतदार झालेल्या सामन्यात ३-२ (२५-२०,२५-२१,१८-२५,२०-२५ व १५-११) ने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यात उत्तरप्रदेश संघाचा ३:० (२५-२२,२५-२१ व २५-२२) ने पराभव करून विजेतेपद मिळवले.विजयी संघातून संजना गोठस्कर(कर्णधार),उपज्ञा कारले,आरमान भावे,देवकी रावत,ओवी कदमबांडे, सई जगताप, उमा साईगावकर,अन्वी गोसावी, सई घीवे,सखी दोरखंडे,ॠतुजा डोंगरे यांनी उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन केले.विजयी संघास राष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री. कुलदिप कोंडे यांनी मार्गदर्शन केले,संघ व्यवस्थापक म्हणून गिताजली भावे व तृप्ती कदमबांडे यांनी काम पाहिले. संघाचे मेंटोर म्हणून शिवाजी जाधव यांनी काम पाहिले.विजयी संघातील खेळाडूंचे शाळेचे संचालक अन्वीत पाठक,अंचिता भोसले,प्राचार्या राधिका वैध,सचिन गायवळ ,रामदास लेकावळे यांनी अभिनंदन केले.

नेवासा (गौरव डेंगळे):येथील रोजलँड इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये दिनांक २८,२९ व  ३० डिसेंबर दरम्यान वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवाचे उद्‍घाटन क्रीडा प्रशिक्षक श्री सुरेश लव्हाटे, व्हॉलिबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब अंबाडे पाटील यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.या वेळी सुरेश लव्हाटे 

 यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन करून खेळाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, खेळातून होत असलेल्या व्यायामामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले. उद्घाटन कार्यक्रमावेळी राज्य,जिल्हा, विभाग पातळीवर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली.या वेळी स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वी खेळाविषयी शपथ घेतली.या तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये व्हॉलीबॉल,क्रिकेट,कबड्डी,खो-खो,१०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे,४०० मीटर धावणे,लांब उडी,रस्सीखेच अशा विविध स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.या वेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब अंबाडे पाटील, सदस्या निकिता दिपक अंबाडे, रूपाली अजित अंबाडे,शाळेचे प्राचार्य हेमंत सोलंकी, सुनिलकुमार जैन

तसेच शिक्षक-शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-सार्वजनिक व सामाजिक क्षेञात कार्य करणाऱ्या  व्यक्तींना काही अन्यायकारक घडले तर पोलिस स्टेशनला जावेच लागते.अशाच एका प्रकरणी भाजपचे सुनिल मुथ्था व आप पक्षाचे तिलक डुंगरवाल काही कार्यकर्त्यांसह शहर पोलिस स्टेशनला गेले असता काही समाजकंटकांनी त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्यचा प्रयत्न केला.माञ सर्वपक्षिय नेते व सामाजिक संघटनांनी संघटीतपणे विरोध करुन समाजकंटकांचा डाव उधळून लावला. याची सर्वदूर चर्चा होत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,एका प्रकरणी महिलेने खोटी फिर्याद दाखल करुन प्राॕपर्टी बळकाविण्याचा प्रयत्न केला.हे समजताच सुनिल मुथ्था व तिलक डुंगरवाल हे  शहर पोलिस स्टेशनला गेले.तेथे पोलिसांना वस्तुस्थिती विशद केली.माञ काही समाजकंटकांनी सदर महिलेला चुकीचा सल्ला देवून संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांवर विनयभंगाची खोटी केस दाखल करायला सांगीतले.तथापि, पोलिस तपासात सदर केस खोटी व हेतूप्रेरीत असल्याचे निष्पन्न झाले.  खोटी केस दाखल केल्याची कुणकुण लागताच माजी आ.भाऊसाहेब कांबळे, सिध्दार्थ मुरकुटे ,काँग्रेसचे करण ससाणे,आशिष धनवटे,राजेंद्र सोनवणे,रितेश एडके,रियाज पठाण,अनितीन दिनकर,दिपक पटारे,प्रकाश चित्ते,संजय पांडे,रुपेश हरकल,शंतनु फोपसे,अतुल वढणे,दत्ता जाधव ,अमजद पठाण,शाकिर शेख,शिवसेनेचे  सचिन बडधे, लाखान भगत,निखिल पवार,संजय छल्लारे,अशोक थोरे,रमेश घुले,सुनिल फुलारे,रोहित भोसले,तेजस बोरावके,आम आदमी पक्षाचे विकास डेंगळे,राहुल रणपिसे,प्रवीण जमदाडे,अक्षय कुमावत,भरत डेंगळे,श्रीराम दळवी,श्रीधर कारले,डाॕ.सचिन थोरात,डाॕ.प्रविण राठोड,भैरव मोरे,प्रविण काळे,प्रशांत बागुल,राजमोहंमद शेख,बी.एम.पवार,आर.पी.आय.चे सुरेन्द्र थोरात,सुभाष ञिभूवन,संदीप मगर,राष्ट्रवादीचे अजयभाऊ डाकले,शिवप्रहारचे चंद्रकांत आगे,वंचितचे चरण ञिभूवन,मनसेचे बाबा शिंदे,व्यापारी असोसिएशनचे राहुल मुथ्था,मुन्ना झंवर,गौतम उपाध्ये,बाळासाहेब खाबिया,कल्याण कुंकुलोळ,स्वप्नील चोरडीया,भाग्येश चोरडीया,अनुप लोढा, सामाजिक कार्यकर्ते संजय गांगड,चंद्रकांत सगम,नाना गांगड,संकेत संचेती,युवराज घोरपडे,मुबारक शेख,प्रसाद कटके,चेतन बोगे,संदेश मेहेर,आकाश निकाळजे,निलेश गिते,तेजस उंडे  आदी सर्व पक्षीय नेते,विविध संघटनांचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनला जमले.त्यांनी समाजकंटकांना पोलिसांनी थारा देवू नये अशी मागणी केली.सामाजिक व सार्वजनिक क्षेञातील कार्यकर्त्यांवर असे खोटे गुन्हे दाखल करुन दबाव आणणे उचित नाही.त्यामुळे शहनीशा व खातरजमा केल्याशिवाय पोलिसांनीही अशा खोट्या केसची दखल घेवू नये.दरम्यान जिल्हा पोलिस आधिक्षक राकेश ओलांशी संपर्क केला गेला.त्यांना या प्रकरणाची सविस्तर  माहिती देण्यात आली.त्यावर श्री.ओला यांनी खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कारवाई करु नये अशा सूचना दिल्या.यावार पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी या वेळी ताक्रारीची  शहानिशा केल्याशिवाय नोंद घेतली  जाणार नाही तसेच फिर्याद खोटी निघाल्यास संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल  असे आश्वासन दिले.त्यामुळे खोट्या गुन्ह्याता .मुथ्था व .डुंगरवाल यांना अडकविण्याचा समाज कंटकाचा डाव उधळला गेला.

केशव गायकवाड स्पर्धेतील सर्वोत्तम सेंटरनादेड (गौरव डेंगळे): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथे पश्चिम विभागीय मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १४ ते १८ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गुजरात,राजस्थान  या राज्यातील १०० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता.पुण्याच्या भारतीय विद्यापीठ संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत पश्चिम विभागीय स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवून अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. स्पर्धेमध्ये भारतीय विद्यापीठाचा खेळाडू केशव गायकवाड स्पर्धेतील सर्वोत्तम सेंटर ठरला आहे.भारतीय विद्यापीठाने आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचा

३-०(२५-१८,२५-२० व २५-१९) ने पराभव केला.दुसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय विद्यापीठ संघाने श्री कुशदास विधापीठ हनुमानगड संघाचा देखील ३-० (२५-११,२५-२३ व २५-२१ ने  पराभव केला. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय विद्यापीठला LNIPE ग्वाल्हेर विद्यापीठ संघाकडून १-३ (१८-२५,१९-२५,२५-२२ व २४-२६) ने पराभव पत्करावा लागला.भारतीय विद्यापीठ संघाने आपल्या चौथ्या सामन्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघाचा ३-०(२५-१७,२५-१४ व २५-१५) ने पराभव करून पश्चिम विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत कर्णधार केशव गायकवाड सह,आदित्य कुडपणे,साईराज बांदल, लक्ष्मी नारायण, प्रणव चिकणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.उपविजेत्या संघाला राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ संतोष पवार व शिवाजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.उपविजेत्या संघाचे डॉ नेताजी जाधव क्रीडा संचालक भारती विद्यापीठ पुणे, डॉ स्वप्निल विधाते प्राचार्य, शारीरिक शिक्षण महाविद्यालय भारती विद्यापीठ,पुणे तसेच सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बेलापुर (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायत सदस्या सविता उत्तम अमोलीक याच्या जातवैधता प्रमाणपत्रावर बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी व किरण साळवी यांनी हराकत घेतली असुन या बाबत औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती त्या नुसार दिनांक २० डिसेंबर रोजी सविता अमोलीक यांनी जातपडताळणी कार्यालयात हजर राहुन म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे                             या बाबत बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी स्वाती अमोलीक या ख्रीस्त असुन चुकीच्या कागदपत्राच्या अधारे जातपडताळणी प्रमाणपत्र घेवुन शासकीय राजकीय तसेच आर्थिक फायदे घेत असल्यामुळे त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी जातपडताळणी कार्यालयाकडे केली होती परंतु त्यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे सरपंच महेंद्र साळवी यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती त्या याचिकेत सविता अमोलिक यांचा बापतिस्मा बेलापुर येथील सेंट पिटर चर्च येथे झाला आसुन पिटर पी पी ओहोळ यांनी तिचा बापतिस्मा केला होता तसेच अमोलीक यांनी गेल्या चार ते पाच पिढ्यापासुन ख्रीस्त धर्म स्वीकारला असुन त्यांचा परिवार ख्रीस्त धर्माचे तंतोतंत पालन करत आसल्याचे  औरंगाबाद खंडपिठात दाखल केलेल्या खाचिकेत साळवी यांनी म्हटले असुन तसे पुरावे त्यांनी सोबत जोडले होते त्या अनुषंगाने मा उच्च न्यायालयाने सविता आमोलीक यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश पडताळणी समितीला दिले होते त्यामुळे संशोधन अधिकारी तथा सदस्य जिल्हा जाती पडताळणी समिती अहमदनगर यांनी सविता आमोलीक यांना नोटीस बजावली असुन त्यात म्हटले आहे की उच्च न्यायालयात दाखल रिट याचिका क्रमांक 14632/2023 नुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आपले महार या जातीदाव्याचे प्रकरण समितीकडे फेरपडताळणीसाठी प्राप्त झाले आसुन समितीने सदर प्रकरणामध्ये सुनावणी घेण्याचे ठरविले आहे त्या अनुषंगाने जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समीती अहमदनगर कार्यालयात आपणास सुनावणीसाठी दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी उपस्थित राहुन खूलासा सादर करावा आपण सुनावणीस उपस्थित न राहील्यास आपले जाती दावा प्रकरणात समीती उपलब्ध कागदपत्राच्या अधारे निर्णय घेईल असेही नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे बेलापुर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडी घडत आहेत काही महीन्यापूर्वी सरपंच साळवी यांनी  अचानक गावकरी मंडळाशी काडीमोड घेत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले रविंद्र खटोड गटाशी हातमिळवणी केली त्यानंतर गावकरी मंडळाचे नेते दोनच दिवसात साळवी यांना स्वगृही आणण्यात यशस्वी झाले होते त्या वेळी मोठ्या प्रामाणात फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली होती माझा बुद्धीभेद झाला असा दावा साळवी यांनी त्या वेळी केला होता त्या नंतरकाही दिवसात राजीनामा देतो असे साळवी यांनी सांगितले होते परंतु पुढे त्यांनी राजीनामा देण्याचे टाळले त्यामुळे बरीच वादावादी झाली अनेक वेळा सत्ताधारी तर कधी विरोधक सत्ताधारी अशा बैठका पार पडल्या पण फलीत काहीच निघाले नाही साळवी राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम राहीले सरपंच साळवी यांनी राजीनामा न दिल्यामुळे राजीनाम्याचा चेंडू पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या दालनात गेला त्यानंतर सरपंच साळवी यांची चौकशी मा जिल्हाधिकारी यांचेसमोर सुरु होती ती आता पुर्ण झाली असुन केव्हाही त्या बाबत निकाल येवू शकतो आपल्यावर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळणारच आहे हे लक्षात घेवुन साळवी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे स्वाती आमोलीक या भावी सरपंच पदाच्या दावेदार आहेत जि प सदस्य शरद नवले यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत  त्यामुळे आता जातपडताळणी समीती काय निर्णय देते यावर पुढील आकडेवारीचा मेळ घालुन ग्रामपंचायतीत खेळ सुरु राहाणार आहे

कोपरगाव (प्रतिनिधी):तेजस फाऊंडेशन,नाशिक या नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने गतवर्षा प्रमाणे या ही वर्षी समाजातील सामाजिक,शैक्षणीक साहित्यिक,कला,क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या गुणवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा दि.१४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता कर्जत, जि रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

कोपरगाव येथील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक श्री धनंजय बाबुराव देवकर यांना २०२४ चा राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री देवकर यांनी मागील ३० वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले असून त्यांनी तयार केलेले खेळाडू राष्ट्रीय,राज्य,विभागीय स्पर्धेमध्ये चमकले आहेत. यापूर्वीही देवकर यांना दुधारे फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार तसेच उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार मिळालेला आहे. राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री देवकर यांचे प्राचार्य के.एल.वाकचौरे,मंगेश गायकवाड,साईनाथ चाबुकस्वार,नारायण गाडेकर,गणेश वाघ,गणेश मलिक,सुहास गगे ,भिकाजी तुकरणे,मच्छिंद्र ननवरे,महेश मोरे, विशाल अल्हाट,पब्लिक रिलेशन ऑफिसर दत्ता सांगळे,कार्यालयीन अधीक्षक किरण सांगळे तसेच शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.



श्रीरामपुर (प्रतिनिधी): दिनांक १९ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सेंट तेरेझा गर्ल्स हायस्कूल हरेगाव,श्रीरामपूरचे नितीन बलराज यांची महाराष्ट्र राज्य योगासन संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.मागील १० ते १२ वर्षा पासून श्रीरामपुर क्रीडा क्षेत्रात बलराज यांची भरीव कामगिरी आहे तसेच विविध खेळाचा त्यांना दाडगा अनुभव असुन या अनुभवाचा महाराष्ट्राच्या संघाला निश्चित फायदा होईल व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ पदक प्राप्त करेल अशी खात्री आहे.निवड झाल्याबद्दल बलराज यांचे क्रीडा व युवा संचालनालय,महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री अनिल चोरमुले,उपसंचालक श्री उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री दिलीप दिघे,पार्थ दोशी,मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,राजेंद्र कोहकडे,

गौरव डेंगळे,प्रशांत होन आदीनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव ( गौरव डेंगळे):क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर आयोजित शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटात शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा हर्षल लंगोटे जिल्हास्तरीय ताइक्वांडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर वाडिया पार्क येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्याभरातून १०० पेक्षा अधिक शालेय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.हर्षलला कराटे प्रशिक्षिका वर्षा देठे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल हर्षलचे शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे तसेच सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केलं व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


कोपरगाव (गौरव डेंगळे) : भारतरत्न पद्मविभूषण,राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे चित्र श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगावचे चित्रकार मंगेश गायकवाड यांनी अवघ्या ५ तासांमध्ये शाळेच्या भिंतीवर स्प्रे पेटिंगच्या साह्याने पूर्ण केले.हे खटलेलं चित्र बघण्यासाठी कोपरगावातून शालेय विद्यार्थी शारदा शाळेमध्ये गर्दी करीत असून क्रिकेटच्या देवाचा भिंतीवरच्या फोटो बरोबर सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थी आपल्या पालकांना घेऊन शाळेत येत आहे.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): हार यशाची पहिली पायरी असून पराभूत खेळाडूंनी,विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्यांनी सिंहकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. सिंहाला देखील शिकार करत असताना दररोज ७ ते ८ वेळा अपयशाला सामोरे जावे लागते. तरी कोणती गोष्ट सिंहाला राजा बनवते.त्याची हार न मानण्याची क्षमता सिंहाला राजा बनवते.तर सर्व पराभूत खेळाडूंनी हार न मानण्याची क्षमता आत्मसात केली पाहिजे व जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झाले पाहिजे असे प्रतिपादन श्री राजेंद्र लांडे पाटील यांनी श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान बोलताना केले.

आज श्रीरामपूर सुपर सिक्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल संघाने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचा रंगतदार सामन्यांमध्ये ५ धावांनी पराभव करून सहाव्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.अंतिम सामन्याची नाणेफेक श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यू इंग्लिश स्कूल संघाने निर्धारित ६ षटकांमध्ये ५ बाद ४९ धावा केल्या. यामध्ये यश पवार १५ धावा तर राजवीर पवार याने १८ धावांचे योगदान दिले. बेलापूर संघाकडून शार्दुल पुजारीने २ गडी बाद केले.६ षटकात ५० धावांचे आवहान घेऊन मैदानात उतरलेल्या बेलापूर संघाची सुरुवात धडाकेबाज झाली व पहिल्या २ षटकांमध्ये १ गडी बाद २० धावा फटकावल्या. पवारने तिसऱ्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत २ गडी बाद केले.शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडू मध्ये ९ धावांची आवश्यकता असताना प्रेम शिंदेने अप्रतिम गोलंदाजी करत बेलापूरच्या संघाला तीनच धावा दिल्या व श्रीरामपूर संघाने अंतीम सामना ५ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यानंतर लगेचच स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रॅज्युएट चहा व लस्सीचे संचालक श्री राजेंद्र लांडे पाटील,अभिजीत कुलकर्णी,निरज त्रिपाठी, ऋषिकेश लांडे,दिगंबर पिनाटे, सतीश आजगे,दौलतराव पवार, अमोल शिरोळे,अतुल जाधव, प्रशांत पवार, स्पर्धा आयोजक श्री गौरव डेंगळे व नितीन गायधने आदीच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विजेत्या संघाला रुपये ३५००/- व चषक तर उपविजेत्या संघाला रुपये १५००/- व चषक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्रेम शिंदे तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून यश पवार तर मालिकावीर म्हणून सादुल पुजारी यांची निवड करण्यात आली.

नागपुर (विशेष प्रतिनिधी  )-शासनाच्या वतीने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे अश्वासन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले                      आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे

प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे कार्याध्यक्ष संजय पाटील सचिव बाबुराव ममाणे संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यासाठी विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .महागाईच्या निर्देशांकानुसार राज्यातील धान्य दुकानदारांना मार्जिन मध्ये वाढ करावी धान्य वाटपासाठी 5 जी पाँज मशिन देण्यात याव्यात वेळोवेळी सर्व्हरला येणारे अडथळे दुर व्हावेत .दुकानदारांनी विक्री केलेल्या धान्याचे मार्जिन दर महा वेळेवर मिळावे ,सर्व योजनेचे धान्य उपलब्ध करुन द्यावे ,केरोसीन परवाना धारकांचे पुनर्वसन करावे आदी मागण्यासाठी फेडरेशनच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .या मोर्चात राज्यभरातील जवळपास १५ हजार दुकानदारांनी सहभाग नोंदवीला .चाचा नेहरु बालोद्यान आग्याराम देवी चौक येथुन मोर्चास सुरुवात झाली वेगवेगळ्या घोषणा देत हे मोर्चेकरी विधान भवनावर धडकले त्या ठिकाणी राज्यातुन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले फेडरेशनच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे कार्याध्यक्ष संजय पाटील सचिव बाबुराव ममाणे अशोक ऐडके सुभाषमुसळे बाबा राठोड आदिंच्या शिष्टमंडळाने राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवुन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले .या वेळी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई व सचिव रज्जाक पठाणयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष संजय पाटील नागपुरचे शहराध्यक्ष सुभाष मुसळे रितेश अग्रवाल संजय देशमुख प्रफुल्ल भुरा राजेश कांबळे मिलींद सोनवणे दौलत कुंगवाणी आदिंनी विशेष परिश्रम घेतले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- समता स्पोर्ट्स क्लब, बेलापूर बु|| च्या अध्यक्षपदी संजय शेलार तर उपाध्यक्ष पदी  (बंटी ) प्रदीप शेलार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे                            नाताळ व नववर्ष (हिवाळी महोत्सव २०२३) कार्यक्रम आयोजना बाबत समता स्पोर्ट्स क्लबची  बैठक खेळी- मेळीच्या वातावरणात संपन्न झाली  

यावेळी डिसेंबर 2023-24 या कालावधीसाठी समता स्पोर्ट्स क्लबच्या नुतन कार्यकारणीची निवड उत्तम शेलार सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यानुसार अध्यक्ष संजय शेलार, उपाध्यकपदी  उपाध्यक्षपदी प्रदीप (बंटी) शेलार, खजिनदार निलेश शेलार, संपर्क प्रमुख निष्कांत शेलार, सचिव श्याम शेलार, सह.सचिव विपुल शेलार, प्रसिद्ध प्रमुख सुयश शेलार, कार्याध्यक्ष अजय शेलार, सरचिटणीस बाळू शेलार यांची सर्वानुमते निवड झाली.

यावेळी विजय शेलार, रोहित शेलार, संतोष शेलार, गंगा शेलार, रोहन शेलार, संकेत शेलार, प्रणव शेलार,प्रतीक शेलार, राहुल शेलार, अक्षय शेलार, प्रसाद शेलार, तुषार शेलार, चेतन जोगदंड, ललित शेलार, प्रविन अभंग, रामा उमाप, सोहेल बागवान, आदित्य शेलार, अतीश शेलार, सुमित शेलार, अथर्व शेलार, सार्थक शेलार, गणपत शेलार, सूरज शेलार, संदेश शेलार, निशांत शेलार, सुनील शेलार, आनंद शेलार, प्रथमेश शेलार, आकाश शेलार, यश शेलार आदिं उपस्थित होते

श्रीरामपूर (प्रतिनिधी): मी शाळेत असताना मी माझ्या आईला म्हणायचो की माझा होमवर्क झालाय.आता जाऊ का खेळायला? आणि आता? ते टॅब ठेव आता बाजूला आणि ट्युशनला जा', असे संवाद ऐकू येतात.आता अशी मुले सुदृढ कशी बनतील.प्रत्येकच गोष्टीसाठी 'मॅजिक' औषध नसते.मूल अभ्यासात चांगले असेल,तर पालकांनी त्याच्या आवडीनिवडी शोधून काढल्या पाहिजेत.मूल खेळामध्ये चांगले असेल,तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.व जास्त जास्त मुला-मुलीनी मैदानी खेळ खेळली पाहिजे असे प्रतिपादन श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री स्वामीराज कुलथे यांनी केले. 

येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे १४ संघांच्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन श्री स्वामीराज कुलथे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी स्पर्धेचे आयोजक गौरव डेंगळे,नितीन गायधने,दत्ता घोरपडे,प्रसाद लबडे,अमोल शिरोळे,हरप्रित सेठी,अमंदीप गुरुवडा आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल, बेलापूर,विद्यानिकेतन अकॅडमी, श्रीरामपूर,न्यू इंग्लिश स्कूल,श्रीरामपूर,केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, श्रीरामपूर,अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल,प्रगतीनगर,जे टी येस बेलापूर आदी शाळेतील १४ संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक १२ डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

श्रीरामपूर शहरातील लॅब चालकाच्या चुकीमुळे डॉक्टरांनी घेतले हजारो रुपयांची बिले आजकाल फॅशन बनले डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर प्रथम लॅब मध्ये रक्त लघवी तपासण्यास सांगतात व आपल्या मर्जीतील लॅब चालकाकडे तपासून आणावी याकरता पहिले आवर्जुन पाठवतात व त्याने ठरवायचं की आपल्याला काय ट्रीटमेंट या नावाजलेल्या मोठ्या डॉक्टरकडे घेवायची ज्याच्यावर आपल्याला मोठा विश्वास आहे व विश्वासाने आपन त्याकडे जात असतो मात्र या डिग्री असणाऱ्या मोठा डॉक्टर याचा एक लॅब चालकांवर भरवसा करत असतो याचाच फायदा शहरातील एका लॅब चालकाने व डॉक्टरा ने घेत पेशंटला चक्क कावीळ आजार नसतानाही हजारो रुपयांची लुट केली व पेशनटने तक्रार केली आसता उलट पुन्हा पेशंट कडूनच आमचा गैर समज झाल्याचे पत्र देखील या महाभागांनी घेतले जर काही चुकलंच नव्हते तर पत्र घेतले तरी कशाला या सर्व प्रकारच्या चर्चा श्रीरामपुर शहरात दबक्या आवाजात चालू आहे या विषयी सम्बधित लॅब चालकास विचारणा केली आसता मला यात काही माहीत नाही आमच आपआपसात मिटल असल्याचं त्याच्या कडुन सांगण्यात येत आहे.

श्रीरामपूर - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या श्रीरामपुरातील साखळी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील मुस्लिम समाजातील बांधवांनी पाठिंबा दर्शवून साखळी उपोषणात सहभागी झाले.    

     सकल मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने महात्मा गांधी पुतळयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आलेली आहे.या उपोषणास दररोज विविध राजकीय, सामाजिक,विविध संस्थांचे पदाधिकारी भेट देऊन पाठिंबा दर्शवीत आहेत.उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील मुस्लिम समाजाचे सर्वश्री,

मुक्तारभाई शाह,साजिदभाई मिर्झा,रज्जाक पठाण, अहमदभाई जहागिरदार, गफ्फारभाई पोपटिया, रियाजखान पठाण,एजाजभाई दारूवाला,मेहबूबभाई कुरेशी, सरवरअली सय्यद,अकील हाजी सुन्नाभाई,मुक्तार शेख,जावेदभाई बागवान,मोहसीनभाई बागवान, शफी शाह,भैया आत्तार,अहमद सिकंदर शाह,रहीमभाई शेख, तोसिफ शाह,शरीफ मेमन, इमरान शेख,अब्दुल रहमान काकर,मुबारक शेख,एकनाथ डांगे यांचा सहभाग होता.याप्रसंगी

शिवसेनेचे संजय छल्लारे,सचिन बडदे,निखिल पवार,शहर प्रमुख रमेश घुले,मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे,सतीश कुदळे,संतोष धुमाळ,ॲड, मधुकर शिंदे,पंडितराव बोंबले,राजेश बोर्डे,विजय खाजेकर,विलास बोरावके मच्छिंद्र पवार,छावाचे विश्वनाथ वाघ,हिंदू एकता चे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे,मंगेश छतवाणी,भाऊसाहेब पवार,रमेश आजगे,राजेंद्र मोरगे,नजीरभाई शेख,मेहमूद शाह,तोफिक शेख, युनूस मंसूरी,ॲड,आय्याज सय्यद,अल्ताफ शेख,रफिक मेमन,यासीन सय्यद,अजहर शेख,सैफ शेख,हारुण मेमन, भगवान धनगे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.


 💐 *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐

श्रीरामपूर शहरातील  कॉलेजरोड येथील रहिवासी - 

 *संजय यशवंत कोकाटे (वय ६१)* 

यांचे दि.३०/११/२०२३ रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.

  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहिण, मुलगा चि.सागर,  मुलगी असा परिवार आहे. 

  अचानक त्यांच्या जाण्याने कोकाटे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. श्रीरामपूर येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवार दिनांक ७ डिसेंबर रोजी नॉर्दन ब्रांच श्रीरामपूर येथे दहाव्याचा विधी सकाळी ८:३० वाजता होईल.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी १६ वर्ष वयोगटासाठी ६ वी सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे.या स्पर्धेसाठी हरप्रीत कोचिंग क्लासेस,श्रीरामपूर यांच्यावतीने ₹ ५००१/- व चषक विजेत्या संघाला प्रदान करण्यात येईल. तसेच विविध आकर्षक वैयक्तिक पारितोषिक देण्यात येतील. स्पर्धेत १२ संघांना स्थान देण्यात येईल प्रत्येक संघात ९ खेळाडू असतील.स्पर्धा विंडबॉल वर खेळण्यात येईल.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी ९ डिसेंबर पूर्वी आपल्या संघाची नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.सदर स्पर्धा ही ६ षटकांची असेल.इच्छुक संघांनी नितीन गायधने,नितीन बलराज,दौलतराव पवार  आदींशी संपर्क साधून संघाची नाव नोंदणी करावी.

राहता तालुक्यातील ममदापूर या गावात भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने "संविधान जागर दिवस" हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ममदापूर गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा,जिल्हा परिषद उर्दू शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत सामूहिकरीत्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.यावेळी त्यांना संविधानाविषयी माहिती देण्यात आली.तसेच भारतीय संविधान नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची देखील सखोल माहिती विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित वक्त्यांनी दिली. 

सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी नेते पॅंथर ऋषी पोळ हे होते.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ममदापूर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.अनिताताई कदम, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश राव ससाने, भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक दीपक भालेराव होते.याप्रसंगी न्यूज 14 चॅनेल चे पत्रकार नानासाहेब उंडे, RKS न्यूज चैनल चे संपादक कासम शेख, MS न्यूजचे मुसा सय्यद, गौरव भालेराव, समाधान पगारे,फरहान शेख, माहिती अधिकाराचे नगर जिल्हाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, गोविंद नाना जवरे पाटील,परवेज पटेल, ग्रामसेवक सोनवणे भाऊसाहेब, अश्रफ तांबोळी,पुंजा थोरात, हुसेन तांबोळी,वृषभ ससाने, ज्ञानदेव म्हसे पाटील तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समस्त ममदापूर गावचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन ममदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शब्बीर कुरेशी यांनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget