नागपुर (विशेष प्रतिनिधी )-शासनाच्या वतीने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे अश्वासन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे
प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे कार्याध्यक्ष संजय पाटील सचिव बाबुराव ममाणे संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यासाठी विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .महागाईच्या निर्देशांकानुसार राज्यातील धान्य दुकानदारांना मार्जिन मध्ये वाढ करावी धान्य वाटपासाठी 5 जी पाँज मशिन देण्यात याव्यात वेळोवेळी सर्व्हरला येणारे अडथळे दुर व्हावेत .दुकानदारांनी विक्री केलेल्या धान्याचे मार्जिन दर महा वेळेवर मिळावे ,सर्व योजनेचे धान्य उपलब्ध करुन द्यावे ,केरोसीन परवाना धारकांचे पुनर्वसन करावे आदी मागण्यासाठी फेडरेशनच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .या मोर्चात राज्यभरातील जवळपास १५ हजार दुकानदारांनी सहभाग नोंदवीला .चाचा नेहरु बालोद्यान आग्याराम देवी चौक येथुन मोर्चास सुरुवात झाली वेगवेगळ्या घोषणा देत हे मोर्चेकरी विधान भवनावर धडकले त्या ठिकाणी राज्यातुन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले फेडरेशनच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे कार्याध्यक्ष संजय पाटील सचिव बाबुराव ममाणे अशोक ऐडके सुभाषमुसळे बाबा राठोड आदिंच्या शिष्टमंडळाने राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवुन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले .या वेळी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई व सचिव रज्जाक पठाणयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष संजय पाटील नागपुरचे शहराध्यक्ष सुभाष मुसळे रितेश अग्रवाल संजय देशमुख प्रफुल्ल भुरा राजेश कांबळे मिलींद सोनवणे दौलत कुंगवाणी आदिंनी विशेष परिश्रम घेतले
Post a Comment