हार ही यशाची पहिली पायरी - राजेंद्र लांडे पाटील.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): हार यशाची पहिली पायरी असून पराभूत खेळाडूंनी,विद्यार्थ्यांनी खचून न जाता त्यांनी सिंहकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. सिंहाला देखील शिकार करत असताना दररोज ७ ते ८ वेळा अपयशाला सामोरे जावे लागते. तरी कोणती गोष्ट सिंहाला राजा बनवते.त्याची हार न मानण्याची क्षमता सिंहाला राजा बनवते.तर सर्व पराभूत खेळाडूंनी हार न मानण्याची क्षमता आत्मसात केली पाहिजे व जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झाले पाहिजे असे प्रतिपादन श्री राजेंद्र लांडे पाटील यांनी श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान बोलताना केले.

आज श्रीरामपूर सुपर सिक्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल संघाने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचा रंगतदार सामन्यांमध्ये ५ धावांनी पराभव करून सहाव्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.अंतिम सामन्याची नाणेफेक श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यू इंग्लिश स्कूल संघाने निर्धारित ६ षटकांमध्ये ५ बाद ४९ धावा केल्या. यामध्ये यश पवार १५ धावा तर राजवीर पवार याने १८ धावांचे योगदान दिले. बेलापूर संघाकडून शार्दुल पुजारीने २ गडी बाद केले.६ षटकात ५० धावांचे आवहान घेऊन मैदानात उतरलेल्या बेलापूर संघाची सुरुवात धडाकेबाज झाली व पहिल्या २ षटकांमध्ये १ गडी बाद २० धावा फटकावल्या. पवारने तिसऱ्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत २ गडी बाद केले.शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडू मध्ये ९ धावांची आवश्यकता असताना प्रेम शिंदेने अप्रतिम गोलंदाजी करत बेलापूरच्या संघाला तीनच धावा दिल्या व श्रीरामपूर संघाने अंतीम सामना ५ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यानंतर लगेचच स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रॅज्युएट चहा व लस्सीचे संचालक श्री राजेंद्र लांडे पाटील,अभिजीत कुलकर्णी,निरज त्रिपाठी, ऋषिकेश लांडे,दिगंबर पिनाटे, सतीश आजगे,दौलतराव पवार, अमोल शिरोळे,अतुल जाधव, प्रशांत पवार, स्पर्धा आयोजक श्री गौरव डेंगळे व नितीन गायधने आदीच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विजेत्या संघाला रुपये ३५००/- व चषक तर उपविजेत्या संघाला रुपये १५००/- व चषक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्रेम शिंदे तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून यश पवार तर मालिकावीर म्हणून सादुल पुजारी यांची निवड करण्यात आली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget