श्रीरामपुरात दिनांक ११ डिसेंबर रोजी ६ वी श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धा.
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी १६ वर्ष वयोगटासाठी ६ वी सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे.या स्पर्धेसाठी हरप्रीत कोचिंग क्लासेस,श्रीरामपूर यांच्यावतीने ₹ ५००१/- व चषक विजेत्या संघाला प्रदान करण्यात येईल. तसेच विविध आकर्षक वैयक्तिक पारितोषिक देण्यात येतील. स्पर्धेत १२ संघांना स्थान देण्यात येईल प्रत्येक संघात ९ खेळाडू असतील.स्पर्धा विंडबॉल वर खेळण्यात येईल.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी ९ डिसेंबर पूर्वी आपल्या संघाची नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.सदर स्पर्धा ही ६ षटकांची असेल.इच्छुक संघांनी नितीन गायधने,नितीन बलराज,दौलतराव पवार आदींशी संपर्क साधून संघाची नाव नोंदणी करावी.
Post a Comment