शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा हर्षल लंगोटे जिल्हास्तरीय ताइक्वांडो स्पर्धेत प्रथम.
कोपरगाव ( गौरव डेंगळे):क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर आयोजित शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटात शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा हर्षल लंगोटे जिल्हास्तरीय ताइक्वांडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर वाडिया पार्क येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्याभरातून १०० पेक्षा अधिक शालेय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.हर्षलला कराटे प्रशिक्षिका वर्षा देठे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल हर्षलचे शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे तसेच सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केलं व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment