श्रीरामपुर (प्रतिनिधी): दिनांक १९ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सेंट तेरेझा गर्ल्स हायस्कूल हरेगाव,श्रीरामपूरचे नितीन बलराज यांची महाराष्ट्र राज्य योगासन संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.मागील १० ते १२ वर्षा पासून श्रीरामपुर क्रीडा क्षेत्रात बलराज यांची भरीव कामगिरी आहे तसेच विविध खेळाचा त्यांना दाडगा अनुभव असुन या अनुभवाचा महाराष्ट्राच्या संघाला निश्चित फायदा होईल व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ पदक प्राप्त करेल अशी खात्री आहे.निवड झाल्याबद्दल बलराज यांचे क्रीडा व युवा संचालनालय,महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री अनिल चोरमुले,उपसंचालक श्री उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री दिलीप दिघे,पार्थ दोशी,मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,राजेंद्र कोहकडे,
गौरव डेंगळे,प्रशांत होन आदीनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment