श्रीरामाच्या नाम गजराने दुमदुमला खंडाळा गावात सर्वत्र भगवामय वातावरण तयार झाले.
खंडाळा (गौरव डेंगळे):अयोध्या धाम येथून श्रीराम मंदिराच्या अक्षदा अनगोळमध्ये कलशातून आल्या आहेत. खंडाळा येथील मारुती मंदिर येथे पूजा,अर्चा व प्रभू रामचंद्राच्या आरती करून रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला.श्रीराम अनिश डेंगळे,लक्ष्मण शौर्य नगरकर, सितामाता श्रावणी नगरकर तर हनुमान साईराज नगरकर यांनी भूमिका साकारल्या. त्यानंतर सवाद्य अनगोळ मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणपती रोड, म्हसोबा मंदिर, भगवती माता मंदीर, ढोकचौळे गल्ली, मारुती मंदिर येथे या मिरवणुकीची सांगता झाली. मारुती मंदिरामध्ये अक्षदा कलश ठेवण्यात आला. मारुती मंदिरमधून उपकलश तयार करून अक्षता गावातली प्रत्येक घरी पाठविण्यात येणार आहेत. प्रत्येकाच्या घरी अक्षता पोहोचवून अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमंत्रण दिले जाणार आहे. २२ जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या तारखेला दाखल व्हावे. प्रत्येक गावोगावी २२ जानेवारीला दिवाळी साजरी करावी. आज खंडाळा गावात प्रभू रामचंद्रमय वातावरण तयार झालेलं सर्वांना बघायला मिळाले. या भव्य दिव्य अशा अक्षदा कलश यात्रेसाठी हजारोचे संख्येने माता-बहिणी व पुरुष वर्ग उपस्थित होता.
Post a Comment