फक्त ६१ चेंडूत शतक,बॉबी बकालची झंजावती खेळी*जिमखाना संघाचा अंतिम फेरीत प्रवेश!
पाथर्डी (गौरव डेंगळे): पाथर्डी येथे एन व्ही नेट क्लबच्या वतीने ४० वर्षा पुढील खेळाडूंसाठी भव्य लेदर बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आज साखळीतील उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये वयाच्या पन्नाशीत बॉबी बकालने फक्त ६१ चेंडूत १०२ धावांची झंजावती खेळी करत अशोक जिमखाना संघाला एक हाती विजय मिळवून दिला.आज बॉबीने जुन्या आठवणी ताजा करत सलामीला येऊन १०२ धावांची वादळी खेळी केली,या खेळीत बॉबीने १३ चौकार व ४ षटकार खेचला. बॉबीला सुरेश भोसलेने ३९ धावांची खेळी करत बहुमूल्य साथ दिली. या दोघांच्या सुरेख खेळीच्या जोरावर अशोक जिमखाना संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ३ गडी बाद २१३ धावा फटकावल्या. २१४ धावांचे आवहान घेऊन मैदानात उतरलेला पाथर्डी लेजंड संघाने १५ व्या षटकात सर्व गडी बाद ९४ धावा करू शकला व सामना अशोक जिमखाना संघाने ११९ धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.पाथर्डी लेजंड संघाकडून पापू यामे यांनी सर्वाधिक ३२ धावांची योगदान दिले. १०२ धावांची खेळी करणारा बॉबी सामनाविर म्हणून गौरवण्यात आला.
Post a Comment