केशव गायकवाड स्पर्धेतील सर्वोत्तम सेंटरनादेड (गौरव डेंगळे): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथे पश्चिम विभागीय मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १४ ते १८ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गुजरात,राजस्थान या राज्यातील १०० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता.पुण्याच्या भारतीय विद्यापीठ संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत पश्चिम विभागीय स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवून अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. स्पर्धेमध्ये भारतीय विद्यापीठाचा खेळाडू केशव गायकवाड स्पर्धेतील सर्वोत्तम सेंटर ठरला आहे.भारतीय विद्यापीठाने आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचा
३-०(२५-१८,२५-२० व २५-१९) ने पराभव केला.दुसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय विद्यापीठ संघाने श्री कुशदास विधापीठ हनुमानगड संघाचा देखील ३-० (२५-११,२५-२३ व २५-२१ ने पराभव केला. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय विद्यापीठला LNIPE ग्वाल्हेर विद्यापीठ संघाकडून १-३ (१८-२५,१९-२५,२५-२२ व २४-२६) ने पराभव पत्करावा लागला.भारतीय विद्यापीठ संघाने आपल्या चौथ्या सामन्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघाचा ३-०(२५-१७,२५-१४ व २५-१५) ने पराभव करून पश्चिम विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत कर्णधार केशव गायकवाड सह,आदित्य कुडपणे,साईराज बांदल, लक्ष्मी नारायण, प्रणव चिकणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.उपविजेत्या संघाला राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ संतोष पवार व शिवाजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.उपविजेत्या संघाचे डॉ नेताजी जाधव क्रीडा संचालक भारती विद्यापीठ पुणे, डॉ स्वप्निल विधाते प्राचार्य, शारीरिक शिक्षण महाविद्यालय भारती विद्यापीठ,पुणे तसेच सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment