चेक बाऊन्स प्रकरणात चार ( ०४ ) गुन्ह्यात शिक्षा लागल्यानंतर फरार झालेला आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
अहमदनगर प्रतिनिधी- चेक बाऊन्स प्रकरणात चार गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर फरार झालेला आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले अटक अटक केलेला इसम नामे विजय मुरली नरवाल , रा . सदर बाजार , पेन्शन लाईन , कंजारवाडा , भिंगार अहमदनगर याने उसनवार घेतलेल्या ३,४८,००० / - रु.या रकमेसाठी दिलेले चेक बाऊन्स झाल्याने सदर इसमा विरुध्द Negotiable Instruments Act १३८ प्रमाणे मा . अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर याचे न्यायालयात संक्षिप्त फौजदारी खटला क्र . १ ) ६८८/२०११ , २ ) १५८३/२०११ , ३ ) ३३८२/२०११ , ४ ) ६३७/२०१२ असे चार खटले मा . न्यायालयात चालवुन सदर इसमास खटला क्रमांक १ ) ६८८/२०११ , २ ) १५८३/२०११ , ३ ) ३३८२/२०११ यामध्ये एकत्रितरित्या फिर्यादीस ३,४८,००० / - रु . नुकसान भरपाई देण्याचा आणि नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने सक्षम कारावास भोगण्याचा आदेश करण्यात आलेले आहे . इसम नामे विजय मुरली नरवाला याने मा . न्यायालयाचे आदेशाचे पालन न केल्याने न्यायालयाने त्याचे विरुध्द Conviction Warrant काढुन विशेष पथकामार्फत बजावणी करणे बाबतचे आदेश दिले होते . नमुद आदेश प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली कन्व्हेशन वॉरंट मधील इसमाचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की , इसम नामे विजय मुरली नरवाल हा जामखेड रोड येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , पोलीस हेडकॉन्स्टेबल फकिर शेख , संदीप घोडके , विश्वास बेरड , दत्तात्रय हिंगडे , संदीप पवार , देवेंद्र शेलार , दिनेश मोरे , पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस नाईक दिपक शिंदे अशांनी मिळुन जामखेड रोड , मुठ्ठी चौक येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असतांना एक इसम संशयीत रित्या फिरतांना दिसला त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेता त्याने त्याचे नाव विजय मुरली नरवाल , वय ३ ९ , रा . सदर बाजार पेन्शन लाईन , कंजारवाडा , भिंगार कॅम्प असे असल्याचे सांगितले . नमुद कन्व्हेशन वॉरंटमधील आरोपी हाच असलेबाबत खात्री झ आल्याने त्यास ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व अनिल कातकाडे , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
