मक्का मधे प्रेषित , पैगंबर , झाल्यानंतर ११ वर्ष असताना , ईस्लाम विरोधी लोकांनी प्रेषित मुहम्मद स्व. व त्यांच्या सहकारी मित्रगण (सहाबा रजि.). ईस्लामच्या अनुयायींना साथ देईल,सहकार्य करील आशा लोकांचा छळ करुन त्रास दिला जात असे,तरीही त्रास सहन करूनही पैगंबर मुहम्मद स्व. संयमाने,विवेकाने,शांतपणे अल्लाहाच्या एकेश्वरवादाचा ,सत्य धर्माचा प्रचार व प्रसार शांततेने करीत असत,त्यांच्या व जे एकेश्वरवादाचा प्रसार करीत होते त्यासर्वांवर तीन वर्षापर्यंत सामाजिक व आर्थिक बहिष्कार टाकला गेला. त्यांचं जीणं, खाणं - पिणं मोठं मुश्किल (अवघड) होतं. तीन - तीन दिवस फक्त खजुरांवर त्यांचं जींणं चालू असत, कित्येक लहान मुलं,महीला, किती दिवस अक्षरशः उपाशीच झोपलीत,माणुसकीची परीसीमाच राहीली नव्हती, छळाची परमोच्च बिंदू गाठलं, शेवटी प्रेषीतांची हत्या करण्याचे कट कारस्थान रचुन , प्रत्येक कबील्यांतुन एक तरुणांची निवड करुन घेरावही करण्यात आला. मात्र ते या कटातून सही सलामत बाहेर आलेत,ही अल्लाहा (ईश्वरा) कडून त्यांची परीक्षाच होती.
शेवटी अल्लाहाच्या ईशवानीच्या आज्ञेनुसार प्रेषित स्व.यांनी सर्वांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून मदीनेला " हिजरत " करण्याचा निर्णय घेतला ,१६ जुलै ६२२ रोजी मध्यरात्री हज. अबु- बकर रजी., हज.उमर रजी.बरोबर घेत हिजरत केली.
"'हिजरी - साल वर्षे " याच घटनेमुळे इस्लामी (हिजरी सन) वर्षाची सुरुवात झाली,हिजरत नंतर मदीना व आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी इस्लामच्या सत्यधर्माचा प्रचार - प्रसार झाला व होत होता. लाखोंच्या संख्येने लोकं इस्लामच्या सत्य धर्म स्विकारीत होते,मदीनामधेही मक्का येथील अरबी लोकांचं प्रेषितांना व त्यांच्या अनुयायांना (सहाबा) त्रास देणं चालूच होतं. मधल्या काळात मक्का येथील अरब लोकं व प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या अनुयायांमधे वारंवार रक्तरंजित संघर्ष घडत होतं,बरेच मोठ - मोठी युद्ध झाले होते .
हे वारंवार होऊ नयेत म्हणून प्रेषितांनी जगप्रसिद्ध तह केला. यास इस्लामी इतिहासात खुप महत्वाचे स्थान आहे,यालाच " सुलह हुदैबीया" असे म्हणतात .
तहाची मर्यादा दहा १० वर्षांची होती, दोन्ही बाजूंनी बऱ्याच अटी ठरलेल्या होत्या,परंतु जास्त अटी या विरोधी मक्कावासींया कडून लादलेल्या होत्या,एवढे असूनही प्रेषित मुहम्मद स्व. विरोधकांच्या प्रत्येक अटीला मान्यता देत होते व देण्यात आल्या देखील. (घटना मोठी आहे, असो .) थोड्याच दिवसांत प्रसिद्ध हुदैबिया कराराच्या उल्लंघनाची सुरुवात विरोधी मक्कावासी आरबां कडुन झाली व वारंवार होत होतं. त्रासाला कंटाळून शेवटी हजरत प्रेषीतांनी इस्लामी योध्दयांना घेऊन मक्का कुच करण्याचा निर्णय घेऊन दहा हजार योध्दांबरोबर कुच केली. मक्का पोहचल्यावर तेथील प्रत्येक माणूस घाबरून जाऊन ज्याला जेथे जागा मिळेल , तिथे तो लपून बसतं,तर कोणी पळून जात होता.जिवाच्या भितीने सर्वच सैरभैर झाले होते, कारणही तसे महत्वाचे होते,त्यांनी प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे मित्रगण (सहाबा रजि),अनुयायांना दिलेल्या त्रास,आतोनात छळ, वेदनाला,खुनी संघर्ष,या छळाचा बदला घेण्यासाठी आलेत असे वाटत होते, कदाचित फाशी देतील,आज बदल्याचा दिवस असणार ई. प्रत्येक लहान - मोठे अक्षरशः धास्तावले होते ,हा विचार विरोधी लोकांना येणं साहाजिकच होते कारणंही तसेच होते,प्रेषित आणि त्यांचे अनुयायी (सहाबा रजि.) कितीही शांत, न्याय करणारे असले तरी विरोधकांच्या मनात असा विचार येणे तसे स्वभाविकच होते,कारण विरोधकांकडून त्यांना तेवढा आतोनात त्रासच दिला गेला होता, कोणत्याही सद्गृहस्थाने त्याना कधीच केव्हाही कोणत्याही परिस्थितीत माफ केलेच नसते व ते माफीचे लायकही नव्हतेच.
असं म्हणतात की "ज्यांच्या जवळ शक्ति,ताकत,सैनिक असूनही जो समोरच्या कट्टर शत्रुंना शरण देतो,माफी देतो,क्षमा करतो तो मनुष्य सर्वाधिक श्रेष्ठ असतो"
एका घटनेचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो,उहुदच्या प्रसिद्ध लढाईमधे प्रेषित मुहम्मद स्व. यांच्यावर अत्यंत ह्रदयाने प्रेम करणारे त्यांचे चुलते हजरत हमजा रजि.हे लढाईत शहीद (हुतात्म्या) झाले,विरोधी प्रमुख सरदार अबु सुफीयान याची पत्नी 'हिंदा"ही पैगंबरांबद्दल वैरभाव बाळगत होती,याच वैरभावापोटी "हिंदा" हिने हजरत हमजा रजि. यांचे काळीज फाडून बाहेर काढुन चावुन खाल्ले, नाका-कानांचा हार करुन गळ्यात घालण्याचे क्रौर्य केले, पैगंबरांच्या मक्का विजय प्राप्त केल्यावर "हिंदा" हिने आपली ओळख न पटावी यासाठी आपल्या चेहऱ्यावर पडदा टाकला होता, तरी ती सार्वजनिक क्षमादानात जीव वाचवण्यासाठी सामील झाली. परंतु पैगंबरांनी तिला ओळखळे , काका हज. हमजा रजि. यांच्या हत्यासंदर्भाचा मुळीच उल्लेख न करता , मोठ्या मनाने क्रुर हिंदा ,ही क्षमा दिली ,.
" हिंदा, जा , आज, तुला सुध्दा माफी"
त्यांचे रक्ताचे वैरी आशा सर्व दुश्मनांना प्रेषित मुहम्मद स्व. यांच्याजवळ आज सर्व लष्करी ताकत,सत्ता असताना, ते काहीही करू शकले असते, परंतु त्यांनी एका झटक्यात उदारमनाने,उदराता दाखवून त्या अल्लाहा (ईश्वरा) च्या शांतीदुताने कधीच घडले नव्हते असं , न्यायदानाचे,क्षमाशीलतेचे जगात एकमेव उदाहरण क्षमा,माफी. अमन,(शांती) दिली,
मक्केच्या पवित्र खाना -ए- काबागृहाच्या जवळच घोषणा दिली गेली की , "" कोणावरही सुड उगविण्यात येणार नाही . ,
जुलम करण्यात येणार नाहीत . ,
कोणाचाही कत्ल (हत्या - खुन) करण्यात येणार नाही,
कोणाचाही बदला घेण्यात येणार नाही .,
जे आपआपल्या घरात आहेत, त्या सर्वांना माफी, अमन देण्यात आले आहेत .,
जे तलवार उचलणार नाही,त्या सर्वांना माफी अमन,सर्व लोकांना, नागरिकांना माफी देण्यात येत आहे. ,
मात्र विरोधकांना वाटले की असे कसे घडत आहे ??? आपण केलेल्या कृत्याची शिक्षा ही तर फक्त फाशीच होती .,
मग हे ..फक्त माफी ? ..हे शब्द ऐकून कसं वाटलं असेलं त्यांना.
परंतु प्रेषित मुहम्मद स्व . यांनी हे करून दाखवले..
तो दिवस २१ रमजानुल मुबारक.०८ हिजरी. .
आज २१ रमजान .१४४३ हिजरी आहेत..
प्रेषित मुहम्मद स्व.म्हणतात की,"' ज्यांच्या जवळ शक्ति असूनही , जो बदल्याची भावना जोपासत नाही, सर्वांना माफ करतो,क्षमाशील असतो तोच माझ्या जवळ आणि मला प्रिय असतो तथा तोच सर्वात मोठाही असतो,कारण तो मोठ्या मनाचा असतो, अल्लाहाला (ईश्वराला) माफ (क्षमा) करणारे लोकं पसंद ((प्रिय) आहेत."लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर.९२७१६४००१४
#@#स @ @ ली@म@
Post a Comment