
भाविकांना आडवून चो-या करणा-या दोघांना मुद्देमालासह पकडले; एलसीबीची कारवाई
अहमदनगर- दर्शनाला जाणारे भाविकांना आडवून जबरी चोरी करणारे दोन आरोपींना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. सचिन गोपिनाथ चव्हाण ( वय २३, रा. चोभा निमगांव, ता. आष्टी, जि. बीड), रघुनाथ बर्डे ( रा. चोभानिमगांव) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ फकिर शेख, देवेंद्र शेलार, पोना विशाल दळवी, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकाॅ आकाश काळे व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २८ जानेवारी २०२२ रोजी देवदर्शनासाठी जात असतांना अज्ञात दोघे दुचाकीवर येऊन वाहन आडवून, शिवीगाळ व मारहाण करुन खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व रोख असा एकूण १७ हजार ४०० रु.किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. या आदित्य अविनाश आळेकर (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बु-हानगर, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६२/२०२२ भावविक ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाक गुन्ह्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना दुचाकी आडवून जबरी चोरी करणारे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत आदेश दिले. या आदेशान्वये पोनि श्री. कटके यांनी विशेष पथकाची नेमणूक करुन रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशीरकुमार देशमुख व पोलीस स्टाफ यांचेसह पेट्रोलिंग फिरुन दुचाकी आडवून जबरी चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असतांना पोनि श्री.कटके यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा आरोपी सचिन चव्हाण ( रा. चोभानिमगांव, ता. आष्टी, जि.बीड ) याने त्याचे साथीदारासह केला असून तो निंबोडी, ता. आष्टी,( जि.बीड) येथे मिळून येईल अशी माहिती मिळाली. पोनि श्री. कटके यांनी मिळालेली माहिती पथकाला दिली. पथकाने निंबोडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन आरोपी सचिन चव्हाण यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सचिन गोपिनाथ चव्हाण, (वय २३ रा. चोभा निमगांव, ता. आष्टी, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्हा हा त्याचा गांवातील साथीदार रघुनाथ बर्डे ( रा. चोभानिमगांव) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. या माहितीनुसार आरोपी रघुनाथ बर्डे याचा राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास भिंगार कॅम्प ठाण्यात स्टेशन गु.र.नं. ९६२/२०२२ भादविक ३९२, ३४ या गुन्ह्यात वापरलेली आरोपींनी वापरलेली दुचाकी, चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाईल व रोख असा एकुण ३७ हजार ५०० रु. किचे मुडेमालासह ताब्यात घेऊनन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येथे हजर केले आहे. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस करीत आहे.

Post a Comment