सोनई गोळीबार प्रकरण : तिसरा आरोपी अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर प्रतिनिधी - सोनई येथे राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिसरा आरोपी पकडण्यात आला आहे. ही कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ऋषीकेश शेटे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोसई सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकों सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव व चापाहेकॉ उमाकांत गावडे व अर्जुन बडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २३ एप्रिल २०२२ रोजी आरोपी नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा) व संतोष भिंगारदिवे (रा. घोडेगांव, ता. नेवासा) यांनी आरोपी ऋषीकेश वसंत शेटे

(रा. सोनई, ता. नेवासा) याचे सांगणेवरुन, मागील जुने भांडणाचे कारणावरुन, गैरकायद्याची मंडळी जमवुन भाऊ राहुल जनार्धन राजळे (वय २९, रा. लोहगांव, ता. नेवासा) यास शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फायरींग व जबर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, या विकास जनार्धन राजळे (वय २७, रा. लोहगांव, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गु.र.नं. १२३ / २२ भादविक ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४७, १४८, ९४९ सह आर्म अॅक्ट ३/२५ व मपोकाक ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील फायरींग करणारा आरोपी नितीन विलास शिरसाठ व त्याचा साथीदार संतोष उत्तम भिंगारदिवे अशा दोघांना ताब्यात घेऊन सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते.या गुन्ह्यातील आरोपी ऋषीकेश शेटे हा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. पण आरोपी ऋषीकेश शेटे हा त्याचे राहते घरी हनुमानवाडी (ता. नेवासा) येथे येणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हनुमानवाडी (ता. नेवासा) येथे जाऊन आजुबाजूस सापळा लावून आरोपी शेटे यास शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता सोनई पोलीस ठाण्यात हजर केले.गुन्ह्याचा तपास शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्याकडे आहे. त्यांचे कार्यालयातील पोनि विजय क-हे यांनी गुन्ह्याचे तपासात व आरोपी अटकेमध्ये सहकार्य केले आहे. आरोपी ऋषीकेश वसंत शेटे वर या गुन्ह्या व्यतीरिक्त सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करून जातीवाचक शिवीगाळ, जबरी चोरी करुन जातीवाचक शिवीगाळ व दंगा असे एकूण ४ गुन्हे दाखल असुन दोन गुन्ह्यात तो फरार आहे.



Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget