(२) अगर तुमच्या वर कोणी आक्रमक केले ,तर तुम्ही सुद्धात्यांच्यावर अक्रमण करा , परंतु त्यांनी केले तितकेच , पण मर्यादित , मर्यादांचे उल्लंघन करू नयेत , अल्लाहला मर्यादांचे उल्लंघन करणारे पसंद नाहीत .( अल -बकरा अ.नं. ९४,१९०,).
(३) त्यांच्याशी युद्ध करा ,जिथे कुठे तुमचा त्यांच्याशी सामना होईल.आणि ,त्या ठिकाणांहून त्यांना हाकलून लावा ,जिथून त्यांनी तुम्हाला हाकलून लावले आहेत.(अल- बकराह आ.नं.१९१).
(४) "परवानगी दिली गेली युद्ध करण्याची ,ज्या लोकांवर वर अत्याचार केले गेले आहेत ,कारण ते अत्याचार पीडित आहेत " (सुरह नं.२२ अल- हशर -आ.नं.३९).
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ ला रात्री स्वातंत्र्य मिळवून ,देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींनी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज उंचावून मानवंदना दिली , ती रात्र ,हो ती रात्र रमजान मुबारक ची लैलतुल -कद्र ची २७ वी रात्र व दिवस शुक्रवार च व तराविह मधील खत्मुल कुराण ( समाप्ती) ही होती ..
दिव्य कुरआन च्या संदेशानुसार एक गोष्ट लक्षात घेतली तर स्पष्ट होते की ,
आम्ही ज्या मातृभुमी मधे ( वतन ) देशात राहतात,त्या( भुमीशी ) , देशाशी ,वतनाशी , प्रामाणिक एकनिष्ठ , वचनबद्ध राहावे ..व त्या देशाशी वतनाशी प्राणपणाने लढावे व त्याचा लढता - लढता वीर मरण ( शहीद ) जरी आले तर वीरश्री( शहीदी ) पत्करावे .शहीद जरी झाले तर शहीद व्हावे ....हे पवित्र दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व सांगितले आहे ..
" वतनाशी , देशांशी , मातृभूमी साठी मरण आले तर शहीद म्हणून मरताल , संबोधले जातिल.".
प्रेषित मुहम्मद स्व , सांगितले की , " शहीद " हा तात्काळ स्वर्गात ( जन्नतुल फिरदौस) मधे मोठं जागा भेटते , " शहीदां" चा रक्ताचा फक्त एक थेंब जमिनीवर पडण्या आगोदर अल्लाहा ( ईश्वर) त्या व्यक्तीस स्वर्गाचे दरवाजे ताबडतोब उघडताच." . शहीदांना पवित्र दिव्य कुरआन मधे खुप मोठा गौरव पुरस्कार असतो ..असे दिव्य कुरआन व हादिस मधे पुष्कळ ठिकाणी नमुद केलेले आहे.
पवित्र कुराण व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या मातृभुमी (आम्ही त्याला वतनपरस्ती म्हणतात.) च्या शिकवणीनुसार , भारतीय स्वातंत्र्य चळवळीत , लढ्यात , लाखों मुस्लिमांनी भाग घेतला .भारत मातेच्या रक्षणासाठी लाखों मुस्लिमांनी (बलिदान)शहीद झाले आहेत .
अल्लाह (ईश्वरा)च्या आदेशानुसार मातृभुमी (वतन ) ना जो कोणी अत्याचार करेल , गिळंकृत करेल , लोकांना नाहक बळी,त्रास देतील , नाहक अत्याचार करतील त्यांच्या विरोधात लढुन , इंग्रजांच्या अत्याचार , आतोनात त्रासातून मुक्तता करण्यासाठी ,
अल्लाहा च्या आदेशानुसार बलिदान शहीद झाले तर बक्षीस म्हणून मुस्लिम लोकांनी स्वीकार केला.
१८५७ च्या पहील्या लढ्याचे नेतृत्व शेवटचे मुघल सम्राट बहादुरशहा जफर यांच्या कडे ,विरगंणा राणी लक्ष्मीबाई , तात्या टोपे , शिंदे , ई. भारतातील बहुतेक राजांनी त्यांच्या कडे नेतृत्व बहाल केले असताना , त्यांना रगुन जेल मधे काळया पाण्याची सजा सुनावली गेली, त्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्या दोन मुलांची मुंडके कलम करुन त्यांच्या समोर आणुन बहादुरशहा जफर यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न वारंवार केली परंतु त्या ब्लॅकमेल चा काहीच परिणाम आपल्या वतनपरस्ती ,मातृभुमीसाठी न होता त्यांनी सजा चा स्विकार केला परंतु देशाशी गद्दारी केली नाही .ऱगून मधील जेल मध्येच मृत्यू पत्करला.
.त्यांची इच्छा होती की , मातृभुमीच्या मातीतच माझा देह दफन करण्यात यावे ..
परंतु इंग्रजांनी ही अट मान्य केली नाही ... बहादूरशहा जफर आजही रंगुनच्या मातीत दफन आहेत .मा.राजीवजी गांधी पंतप्रधान असताना त्यांनी त्या दफनभूमीतील माती आणुन भारतीय मातीत दफन करून त्यांची इच्छापूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे...
अल्लाहा च्या शिकवणीचे महत्व बहादुरशहा जफर यांनी मातृभुमीसाठी " शहीद" होवून जन्नतुल फिरदौस चे हकदार झालेच असतील.
जालियनवाला बाग च्या जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडात , मृत्यू मुखी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात मुस्लिमांची संख्या जास्त प्रमाणात होती .ं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात, साठ टक्के मुस्लिम मोठ मोठ्या पदावर कार्यरत होते त्या सर्व मुस्लिम सरदारांनी आपल्या राजा बरोबरील वतन परस्ती ईमानदारी ने निभावून शहीद झाले ..
म्हैसूर येथील टिपु सुलतान हे कट्टर देशभक्ती निभावताना इंग्रजांनीं त्यांना शहीद केले .
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौज मधे ही प्रमुख पदाधिकारी बहुतेक मुस्लिम सैनिक होते .
राजस्थान मधे महाराजा महाराणा प्रताप , महाराजा पृथ्वीराज चौहान व विविध राजांच्या सैन्यात प्रमुख सरदार हे मुस्लिम होते .
#हा इतिहास आहे , परंतु मुस्लिम विरोधी इतिहास लेखकांनी मुस्लिम द्वेष फैलावण्यासाठी इतिहास ची मांडणी त्यांच्या पध्दतीने केली असो.
जगातील प्रत्येक देशात जिथे मुस्लिम स्थानिक आहे त्या प्रत्येक देशात मुस्लिमांनी आपल्या देशाशी वतन परस्ती प्रमाणिक निभावली आहे .
भारतीय मुस्लिमांनी पारतंत्र्यातील इंग्रजांच्या अत्याचाराला ,त्रास ,छळाचा , कडाडून विरोध करून मुह तोड जबाब उत्तर वेळोवेळी देउन इंग्रजांच्या जोखडातून भारत देशाला मुक्त करण्यासाठी लोखों ,कोटीं मुस्लिमांनी बलिदान देऊन भारतीय मातीतच दफन झाले. आहेत .
आज लैलतुल कद्र २७ रात्र ,व शुक्रवार च्या योगा योगाने , भारतीय स्वातंत्र्यच्या आठवणी जाग्या होऊन .. भारतीय शहीदांना सलाम करावासा वाटतो.
लेखक डॉ सलीम सिकंदर शेख,बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर 9271640014
Post a Comment