श्रीरामपूर प्रतिनिधी-सध्या संपूर्ण राज्यभरात भोंगे, झेंडा वाद यासह विविध मुद्द्यांवरून तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान रमजान, अक्षय तृतीया यासारखे सण येत्या काही दिवसांत साजरे होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी श्रीरामपूर शहरातील विविध समाजांचे प्रतिनिधी, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी डी वाय एसपी संदीप मिटके,तालुका पोलीस निरीक्षक मछिंद्र खाडे,पोलीस निरीक्षक संजय सानप आदींसह विविध पक्षांचे, संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सध्या तरुणांची माथी भडकावण्याचे काम सुरू आहे. यातून सामाजिक अशांतता निर्माण होत आहे. तरुणांची माथी भडकवली जात असल्याने अनुचित घटना घडत आहे. या घटनांमधून तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मात्र असे तरुण रेकॉर्डवर आल्यानंतर त्यांची माथी भडकावणारे कोणीही मदतीला येत नाहीत. वर्षानुवर्षे याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्याचा विचार सर्वांनी करावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर म्हणाले, ध्वनिक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे. कायदा तोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर निश्चित कारवाई होईल. सामाजिक अशांतता निर्माण करणार्यांवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. मागील दोन महिन्यांपासून सायबर सेल, गोपनीय शाखांची पथके सतर्क आहेत. शहर शांत ठेवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी जातीय सलोखा राखण्यासाठी इतरांना समजावून सांगणे आवश्यक आहे. तरुणांना अनुचित घटनांपासून परावृत्त करणे आवश्यक आहे. पालकांचीही यात मोठी जबाबदारी आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. वॉर्डांमध्ये, मोहल्ल्यामध्ये ग्रुप, कमिट्या तयार करून पोलिसिंगवर भर देण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोशल मीडियावर अत्यंत चुकीचे व विचित्र प्रकार सुरू आहेत. चुकीच्या बनावट क्लिप पसरविल्या जात आहेत. यातील काही लोकांपर्यंत पोलीस प्रशासन पोहचले आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन करत आहे. कोणावरही चुकीची कारवाई होणार नाही, याची दक्षता आम्ही निश्चितपणे घेऊ आपल्या श्रीरामपूर शहराचे नाव, जिल्ह्याचे नाव खराब होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मात्र, हेतूपुरस्सर कोणी चूक करत असेल, तर त्याला माफी नाही. बेकायदेशीर कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डी वाय एसपी संदीप मिटके म्हणाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आमची नजर आहे.काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.सोशल मीडियांवर काही आक्षेपार्ह पोस्ट जर आढळल्यास पोलिसांशी सम्पर्क करावा कोणीही कायदा हातात घेऊनये या साठी पोलीस तयार आहे अन्यथा याचे परिणाम वाईट होतील याचा नागरिकांनी भान ठेवावा युवकांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी बैठकीतील सूचनांचा विचार सर्वांनी करावा आमच्या कडून निश्चितपणे उपक्रम भविष्यात राबवले जातील.येणारे सण उत्सव या साठी सांततां कमिटीची मिटिंग लवकरच घेणारच आहोत सर्वांना यात सहभागी करून घेतले जाईल. सण उत्सव पार पडल्यानंतर इतर वादांबाबत पुन्हा बैठक घेतली जाईल.


Post a Comment