श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच पुनम हॉटेल महादेवाच्या मंदिराजवळ राहत असणारी 70 ते 80 वयाची वयोवृद्ध महिला ज्यांना डोळ्याने दिसण्यास कमी असल्याकारणाने रात्री पाटाच्या कडेने जात असताना पाय सटकून पाण्यात पडल्याने पाण्याच्या प्रवाहने वाहून जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी च्या पाण्याच्या पाईप लाईन ला धरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करून टाकल्यानंतर जिवंत राहण्याची आशा सोडली होती अशातच श्रीरामपूर शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस आपली ड्युटी बजावत असताना श्रीरामपूर कडून टिळक नगर कडे रात्री 02:30 ते 02:45 या सुमारास जात असताना गाडीचा पोलीस सायरन
वाजवला आणि त्या ठिकाणी सायरन चा आवाज ऐकून या वृद्ध महिलेने जीव वाचवण्याकरता मदत करा म्हणून आवाज लावला थोडावेळ काहीतरी आवाज आला म्हणून पोलिस सायरन बंद करून या कर्तव्यदक्ष पोलीस दादा यांनी सायरन बंद करून पुन्हा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला आणि तो आवाज पाटावरील पुलाच्या बाजून येत असल्याचा अंदाज घेत त्यांनी रात्रीच्या वेळी अंधारात मोबाइल टॉर्च मारून पाहिलं तर एक वयोवृद्ध महिला आपला जीव वाचण्याकरिता आवाज देत आहे आणि पाण्याचा प्रवाह त्या आजीला आत मध्ये वढण्याचा प्रयत्न करत आहे हे दृश्य पाहून कुठल्याही क्षणाच विलंब न करता या पो. कॉ.सातकर, पो.कॉ.गावडे ,पो.कॉ.राशीनकर, पो.कॉ.पानसंबळ कर्तव्यदक्ष पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून त्वरित आजीला वाचण्याचा प्रयत्न सुरू केला यामध्ये वीस पंचवीस मिनिटे प्रयत्न करून या आजिला वाचवण्यात आमच्या कर्तव्यदक्ष श्रीरामपूर पोलीस यांना यश आले आणि त्यांनी आजीची चौकशी करत त्यांना अगदी सुखरूप त्यांच्या घरी पोचवले अशा कर्तव्यदक्ष अधिकारी आणि पोलिसांचा नागरिकातून कौतुक होत आहे आणि या आजीने तर जिवंत राहण्याची आस सोडली होती पण ज्याला देव तारी त्याला कोण मारी आणि या म्हणीप्रमाणे या पोलिसांनी या आजीला जीवदान दिले बिनदास न्यूज टीमचा सलाम या कर्तव्यदक्ष पोलिसांना. 

Post a Comment