नेवासा (प्रतिनिधी)राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पी.ए. राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी लोहगाव येथे जीवघेणा हल्ला केला. यावेळी ३ ते ४ अज्ञातांनी गोळीबार केला.राजळे यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते. घटना काल शुक्रवारी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.राजळे एका यात्रेतून आपल्या घरी परतत असताना आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी डाव साधला. त्यांच्यावर ५ फायर झाले, त्यापैकी २ गोळ्या त्यांना लागल्या.घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.राहुल राजळे यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले. रात्री १२ च्या सुमारास त्यांच्यावर तातडीने शत्रक्रिया करण्यात आली.हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी रात्री परिसराची नाकाबंदी केली होती. हल्लेखोरांचा कसून शोध सुरू होता. हल्लेखोर सराईत आणि परिसरातील असावेत असा कयास आहे.दरम्यान मंत्र्यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. राहुल राजळे यांचा काही वर्षांपासून गडाख परिवारासोबत आहेत. सध्या ते मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए म्हणून काम पाहत आहेत.

Post a Comment