श्रीरामपूर प्रतिनिधी -दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी मुंबई येथे झालेल्या 10 th invitational national level martial arts championship स्पर्धेत श्रीरामपूर शहरातील ग्लोबल मार्शल आर्ट असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष मास्टर कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली 42 विद्यार्थी या नॅशनल लेवल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मुंबई या ठिकाणी रवाना झाले होते या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली यामध्ये कलिम बिनसाद यांना 5 th dan black belt डिग्री सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी शुभम राऊत 2nd dan black belt डिग्री सर्टिफिकेट व किरण वाघ 2nd dan black belt डिग्री सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे ग्लोबल मार्शल आर्ट चे विद्यार्थ्यांनी हजारो मुलांमधून सुवर्णपदके व रौप्य पदके बाजी मारून ग्लोबल मार्शल आर्ट श्रीरामपूर चे नाव उंचावत नॅशनल लेव्हल चे सेकंड प्राईस ट्रॉफी मिळविली सर्वच मुलांनी
सुवर्ण व रौप्य पदक मिळवलेली आहे
तसेच सप्टेंबर 2022 मध्ये थायलंडला होणाऱ्या international level world martial arts championship मध्ये या सर्व टिम ची निवड झाली आहे सप्टेंबर 2022 ला ही टिम थायलंड ला स्पर्धे साठी रवाना होईल या कार्यक्रमाचं आपल्या श्रीरामपूर शहरातील मिनी स्टेडियम याठिकाणी मुलांना मोटीवेट करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मा.स्वाती भोर मँडम , तलाठी भाऊसाहेब राजेश घोरपडे ,अर्थो स्पेशलिस्ट डॉ.मयूर कापसे,महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली, इलेक्ट्रोनिक मिडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित माननीय अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांच्या हस्ते मुलांना मेडल सर्टिफिकेट तसेच थायलँड याठिकाणी जाण्यासाठी मुलांची नियुक्तीचे लेटर या ठिकाणी देण्यात आले याप्रसंगी अप्पर पोलीस
अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या तसेच आजच्या या जगात सध्याच्या वातावरणात गरजेच महाराष्ट्र पोलीस महिलांच्या स्वरक्षणावर जास्तीत जास्त लक्ष देऊन आहे याकरिता महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आम्ही मार्गदर्शन व प्रशिक्षण हे मोफत कॉलेजमध्ये शाळांमध्ये महिला गटांमध्ये कायम करत असतो मात्र आज या ठिकाणी मुलींची संख्या पाहता त्यातच अगदी सात ते आठ वर्षांच्या मुली देखील या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या या स्ट्रेचिंग योगा फाईट आणि स्वसंरक्षणाची कला पाहून मी दंग झाले इतक्या कमी वयात आपण इतके काही केले हे सोपे नाही आणि मी त्या पालकांचे कौतुक करेल ज्यांनी आपल्या मुलांना व मुलींना या खेळासाठी अकॅडमीत पाठवले तसेच मास्टर कलीम बिनसाद त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले प्रशिक्षक या मुलांना मिळाले आणि खूप कमी वेळात ज्या मुलाने तिथे गोल्ड मेडल व थायलँड ला जाण्याची संधी मिळवली त्याबद्दल मास्टर कलीम बिनसाद यांचे कौतुक करत मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे तलाठी भाऊसाहेब यांनी यापूर्वी देखील मुलांनी राज्यस्तरीय स्पर्धेत देखील चांगल्या प्रमाणात गोल्ड मेडल आणले होते असे हे ग्लोबल मार्शल आर्ट चे विद्यार्थी कायमच अशी मेडल मिळवतात आपल्या कार्यालयाच्या शेजारी या मुलांचे प्रशिक्षण पाहून मला खूप आनंद होतो आणि मी मनापासून या मुलांना शुभेच्छा देतो मास्टर कलीम बिनसाद हे अगदी चिकाटीने या मुलांना प्रशिक्षण देतात हे मी कायम पाहत असतो असे बोलून या ठिकाणी मुलांना पाठवणाऱ्या पालकांचे देखील त्यांनी कौतुकच केले
त्याचप्रमाणे शेख बरकत आली यांनी ज्या मुलांनी मुंबई या ठिकाणी जाऊन गोल्ड मेडल तसेच थायलंड याठिकाणी होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेत खेळण्यासाठी मुलांना पाठवावे व ते मुलं आपल्या शहराचे व आपल्या देशाचे नाव देश-विदेशात मोठे करतील यासाठी आपण देखील प्रयत्न करणार असल्याचे व काही अडचण आल्यास आम्ही खंबीर उभे राहू असे त्यांनी यावेळेस मुलांचे कौतुक करतानी व शुभेच्छा देताना बोलले या वेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होकेट अजित डोखे यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे आभार ललित ताथेड यांनी मानले. 

Post a Comment