जकात,घामाच्या, मेहनतीच्या,
कष्टाच्या किंवा चांगल्या कर्माच्या पैशातूनच दिली जाते,घेतली जाते.
एक विशेष गोष्ट म्हणजे मस्जिद बांधण्यासाठी जकातीचा पैसा चालत नाही. मस्जिद बांधकाम हे लोकांच्या कष्टाच्या मेहनतीच्या, घामाच्या स्वखुशीने दिलेल्या पैशातूनच पवित्र मस्जिद चे काम (करतात) चाललेले असते व मजुरीचा खर्चही त्याच पैशातून भागवला जातो,कारण जकातीचा पैसा समाजातील पीडीत,गरीब, गरजुंसाठी आल्लाहाने वेगळाच ठेवला आहे.परंतु आजकल काही मुस्लिमद्वषी मिडियाने इस्लाम धर्माला काही खोट्या-नाट्या कुभांडांद्वारे इस्लामवर अनेक चुकीचे दोष लावत या चांगल्या धर्मासही चुकीची वेगळीच ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे,मुस्लिमाबद्दल खोटं दाखवुन द्वेष पसरविण्याचे काम काही प्रसार माध्यमांतून चालू आहेत.
पवित्र कुरआन मध्ये सांगितले की ,"१) लाच घेतलेला व अवैध मार्गाने केलेल्या कोणत्याही कब्जाचा पैसा ,(सु.नं.२ अल- बकराह अ.नं१८८)
२) बेईमानीने ,बेकायदेशीररित्या कमावलेला पैसा (अल-ईमरान)
३) मूर्ती बनवणारा व मूर्तीचा धंदा करणारा,मूर्ती विकणारा याचा पैसा.(अल-मायदा.अ.नं.९०)
४) चोरी करणारा,चोरी करून त्याचा माल विकणारा,चोरीला सहकार्य करणारे,चोरीचा पैसा गडप करणाऱ्या (अल-मायदा अ.नं.३८)
५) दुकान व व्यावसायिक मापात मध्ये कमी जास्त प्रमाणात घोटाळा केलेला पैसा चालत नाही.(अल-ततफीक नं.१३)
६) अनाथांचा मालामधुन पैसा कमावणारे व अनाथांचा माल गडफ करणाऱ्या लोकांचा.(अल-निसा अ.नं१)
७) अचानकपणे कमावलेला पैसा,धन लाभ,उदाहरणार्थ जुगार,सट्टा,मटका,लॉटरी, कमाईतून आलेला पैसा.(अल-मायदा अ.नं.९०)
८) दारूचा पैसा,दारु दुकानदार, दारु बनवणारा,दारु विकणारा, दारुचा धंदा करणारा,दारुच्या धंद्याला मदत करणारा यांचा पैसा .(अल-मायदा.नं.९०)
९) अश्लीलता आणि वेश्या व्यवसाय किंवा वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देणारा किंवा नाच-गाणे तमाशा डान्स बार इत्यादींचा पैसा चालत नाही .(अल-नूर.अ.नं.१९, ३३)
१०)ज्योतिष व्यवसाय,भविष्य वर्तवणारे,गैरकारभार करणाऱ्यांचा पैसा चालत नाही (अल-मायदाअ.नं. ९०)
(११) यांच्या व्यतिरिक्त पैशासाठी गडगंज संपत्ती गोळा करून घरातच साठवून ठेवणारे याला कंजूस म्हणतात आशांसाठी सक्त मना (मनाई) केलेली आहेत,(सुरह अल-फुरकान अ.नं.६७),
(१२) भरपूर गडगंज पैसा कमावून घरी साठवून ठेवण्याला इस्लामने हराम ठरवलेले आहे. (अत-तौबा अ.नं.३४).
(१३) फिल्मवाले,चुकीचे कृत्य करणाऱ्या पासून जकात बिलकुल घेतली जात नाही.अशा लोकांनी स्वतःहून जकात म्हणून देवु नये कारण काही लोकांना याचे ज्ञान, माहीती नसते.#इत्यादींकडुन जकात चालत नाही व घेतलीही जात नाही,विशेष म्हणजे आशा लोकांनी जकात देऊ देखील नयेत.
## जकात कोणकोणासाठी चालते आणि कोणासाठी खर्च करावा :- --
१) आई वडील, नातेवाईक, अनाथ,पीडित शेजाऱ्यावर खर्च करावा.(अन-निसा अ.नं.३६)
२) निराधार , अपंग लोकांवर खर्च करावा (अल-जारियात अ.नं.१०)
३) कर्ज देणे. बिगर इंटरेस्ट (बिन व्याजी) कर्ज देणे.(कर्ज.हसना (विना व्याजदर) म्हणून देऊ शकतात),
(इस्लाममध्ये कर्ज देणे व घेणे दोन्ही निषेध आहेत, (अल-बकराहा अ.नं.२८).
४) जकात आदा करणे (अल -तौबा १०८)५) सदकात.आदा करणे अल-तौबा अ.नं १०८)
जे लोक पीडित आहेत,एखाद्या नैसर्गिक आपत्तीने,भूकंपग्रस्त, धरणग्रस्त,त्सुनामी,एखादे जीवघेणे साथीचे आजार, दुष्काळी परिस्थिती,संकट परिस्थिती,इत्यादी संकटाने पीडितांसाठी,अनाथांच्या भल्यासाठी,विधवांच्या उद्धारासाठी व विधवांच्या मुलाबाळांच्या सांभाळ करण्यासाठी,.गरीब लोकांच्या उद्धारासाठी जे गरीब आजारी आहेत व ज्यांच्यामध्ये आजारपणाचा उपचारासाठी पैशाच नाहीत,ज्याच्याकडे हॉस्पिटल बिल भरण्याची ऐपत नाही अशांसाठी,ज्याचे कर्जदारांचे कर्ज आहे,.कर्ज भरण्याची ऐपत नाही अशांसाठी व गरीब घरातील मुलां-मुलींचे लग्न करण्यासाठी व त्यांच्या संभाळ करण्यासाठी , # विशेष ,माणूस कितीही मोठा असला तरी तो एखाद्या वेळी संकटात सापडलेल्या असतो व आशा वेळी कोणाकडूनतरी कर्ज घेतलेले असते,म्हणून ते कर्ज फेडण्यासाठी जकातीचा चांगला उपयोग होतो.
भारतामधे इस्लामी शिक्षणासह विविध प्रकारच्या शाळा चालवली जातात .
# त्या शाळांना मदरसा म्हणतात #
आपल्या काही मुस्लिम विरोधी भारतीय सोशल मिडिया आणि काही ठराविक प्रसार माध्यमांमध्ये मुस्लिम समाजासह त्यांच्या मदरशांबददल गैरसमज पसरवून सामाजाची दिशाभुल केली जाते,मात्र सत्य वास्तविकता ही वेगळीच आहे, मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना अरबी,उर्दू भाषेत,शिक्षण दिले जातात,त्यांना देशभक्ती व इस्लामी शिक्षण व ज्या राज्यांंच्या कायद्यानुसार स्थानिक पातळीवरील शिक्षण दिले जातात,.आशा मदरशांची व्यवस्था व बांधकाम करण्यासाठी विनीयोग करण्यात येतो.सोबतच जागोजागी शाळा-कॉलेज चालवली जातात त्यासाठी, त्यांच्या वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांना जेवण वगैरेसाठी.
गरीब मुलींच्या विवाहासाठी. पीडित व अनाथ मुलांच्या सर्व गरजेसाठी जकातीचा वापर करतात.
# जगातल्या बहुतेक राष्ट्रांमध्ये व भारतामध्ये सुध्दा आरबी मदरशांना कुठलेही सरकारी अनुदान देत नाही.दिलेही जात नाही. सरकारने कोणत्याही मदरशांना अजून अनुदान दिलेले नाहीत.हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे ,असो.
परंतु काही ठराविक प्रसार माध्यमांमध्ये मुस्लिम विरोधी गैरसमज पसरवले जातात की सरकारकडून मुस्लिम मदरशांना मुबलक प्रमाणात सरकारी अनुदान दिले जाते. हे चुकीचे आहे.
आज लाखो अरबी मदरशांमध्ये शिक्षणाबरोबरच गरीब,अनाथ, विधवा,तथा मुलांसाठी वस्तीगृह व जेवणा - खाण्याची सोय करून त्या बरोबरच अनाथ, गरीब, विधवा,मुलां- मुलींच्या विवाहसाठी मदरशांमधे सोय केली जाते,अशामध्ये जकातीचा वापर केला जातो.भारतात देवबंद सारखा एक लाख मुलं (विद्यार्थी) असलेला मदरसा सहारनपुर मध्ये आहे,व भारतात असे खुप गरीब मदरसे आहेत ज्यांचा खर्च , होस्टेल , जेवणाची व्यवस्था सह लाखोंनी-कोटींनी असतो, सर्व जकातीच्या माध्यमातून चालवला जातो . त्यामध्ये अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, दिल्लीतील हमदर्द युनिव्हर्सिटी,मौलाना आझाद युनिव्हर्सिटी असे जगात नावाजलेले शिक्षण संस्था, युनिव्हर्सिटी व मदरसे भारतात चालू आहेत .परंतु त्या नावाजलेले मोठमोठाल्या विद्यापीठांचा खर्च स्वतःच्या व्यवस्थापकीय पध्दतीने ,व काही जकातीच्या माध्यमातूनच चालतो,त्यामध्ये गरीब अनाथ विधवांचे मुलं वस्तीगगृहामध्ये असतात व त्यांच्या पुस्तकांचा, कपड्यांचा खर्च मोफत ,मोफत हे कॉलेज,विद्यापीठे ,मदरसे करतात त्यासाठी जकातीचा सुयोग्य वापर केलेला असतो.
## मदशांमधुन :- समाजामध्ये कसे वागावे हे वास्तविक पाहता शिकलेली गरीबांची गरीब मुलं भारताच्या व जगातील विविध ठिकाणी नोकरी करुन आनंदाने आपले जीवन व्यतीत करतात.याच जकातीच्या पैशांद्वारे दुष्काळी परिस्थितीत, नद्याच्या पुरग्रस्त परिस्थितीत, समाजोपयोगी उपक्रमाला हसत हसत मदत होईल म्हणून बरीच लोकं तिथे जाऊन जकात देत असतात..पाणी,अन्नधान्य पुरवणं. आपात्कालीन पुर परस्थितीत नद्या-नाल्यांच्या पुरामधे कोणी वाहून जात असेल तर मदशातील मुलं त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उडी मारून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ सबाब,(पुण्यंच) काम म्हणून समोरच्या पीडीत व्यक्तीला वाचवतात हे अनेक ठिकाणच्या पुरग्रस्त ,करोना मधे ,व विविध ठिकाणच्या आपत्ती निवारण करण्याच्या ठिकाणी बघायला मिळालं ..
आशा जकातीच्या पैशांच्या माध्यमातून विविध गरजूंना मदत व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
Post a Comment