श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करत असलेले ठिकाणी छापा टाकून 3.40 ब्रास वाळूसह दोन टेम्पो असा एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन नायगाव येथील नदीपात्रात छाप टाकण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पो. नि. मच्छिंद्र खाडे, हेड कॉन्स्टेबल भारत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, चांद पठाण, सुनील दिघे या पथकाने छापा घालून चोरटी वाळू वाहतूक करताना अनिल सोपान शेलार याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 5,07000 रुपयांचा मुद्देमाल आणि फारुख ख्वाजा शेख याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 507000 रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 10,14000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment