
भारतीय लहुजी सेना च्या वतीने एज्युकेशन सोसायटी हायस्कूल प्राथमिक शाळेच्या दुरावस्थे विरोधात उपोषण
श्रीरामपुरात (प्रतिनिधी) येथील भारतीय लहुजी सेना च्या वतीने श्रीरामपुरात मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. सदर उपोषणास श्रीरामपुरात एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व प्राथमिक शाळा आहे त्या शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर शाळा ची वालकॅमपाऊड भिंत खचली व तुटली आहे, मुतारी व शौचालय नाही इत्यादी अनेक मागणी साठी आज आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मा संजीवनदिवे गटशिक्षणाधिकारी व शाळा चे संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आलेले मा गोरे सर मुख्याध्यापक यांच्या हस्ते मा हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय अध्यक्ष मा बाळासाहेब बागुल,रज्जाक भाई शेख जिल्हा अध्यक्ष ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर व सर्व मागण्या त्वरीत पुर्ण करू आसे बोलल्या नंतर उपोषण सोडण्यात आले. सदर उपोषणास रिपई चे जिल्हा अध्यक्ष सुभाष ञिभोवन,आरपीआय जिल्हा अध्यक्ष संदीप मगर, सपा चे जिल्हा अध्यक्ष जोयब जमादार,सलमान पठान शिव स्वराज्य मंच आदी पाठींबा दिला. उपोषण यशस्वी करण्यासाठी युसूफ शेख, सुभाष कुलकर्णी, आमजत कुरेशी, सिकंदर भाई ताबोली, रमेश खामकर, चंदू पवार, मेहमूद पठान, आदी कार्यकरते व पालक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment